बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार हे अंग मेहनतीचे काम करत असतात त्यामुळे दिवसभर काम करून त्यांचे शरीर थकलेले असते आणि त्यामुळे त्यांना अंगदुखी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्यामुळे बहुतांश कामगार हे दारूचे व्यसन करतात आणि सतत दारू प्यायल्यामुळे ते दारूच्या व्यसनी जातात व कालांतराने त्यांना खूप साऱ्या आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होतात तसेच अनेक कुटुंबाला याचा त्रास सहन करावा लागतो. सतत दारू प्यायल्यामुळे काही कामगारांचा दारूच्या व्यसनामुळे मृत्यू देखील होतो. व कामगार हा घरातील एकटी कमावती व्यक्ती असल्यामुळे त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर आर्थिक अडचण येते.
कामगारांच्या तसेच त्याच्या कुटुंबाच्या या समस्यांचा विचार करून सदर योजनेची सुरुवात केली त्यामुळे बांधकाम कामगार कुठल्याही व्यसन मुक्ती केंद्रात उपचार घेत असेल तर सदर कामगाराचा तेथील खर्च मंडळामार्फत देण्यात येईल. व त्याला 60 हजार रुपये लाभ देण्यात येईल.
उद्दिष्ट
- व्यसनाधीन कामगारांना व्यसनापासून मुक्त होण्यास तसेच त्यांना पुन्हा एकदा चांगले जीवन जगण्यास मदत स्वरूपात आर्थिक सहाय्य करणे.
- कामगारांचे जीवनमान सुधारणे तसेच त्यांचा सामाजिक विकास करणे.
योजनेचे लाभार्थी
- व्यसन मुक्ती केंद्रात उपचार घेत असलेले कामगार
योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य
- या योजनेअंतर्गत व्यसन मुक्ती केंद्रात उपचार घेत असलेल्या कामगारांना 60 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
योजनेचा फायदा
- व्यसनाच्या आहारी गेलेल्या कामगारांचे व्यसन सुटून ते पुन्हा एकदा स्वतःचे आनंदी जीवन जगू शकतील.
- कामगारांच्या कुटुंबांना व्यसन मुक्ती केंद्राच्या खर्चासाठी आवश्यक पैशांसाठी चिंता करण्याची गरज भासणार नाही.
- कामगारांचे आरोग्य सुधारेल.
- कामगारांचे कुटुंब सुखी होईल.
अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता व अटी
- अर्जदार कामगारांचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
- कामगारांचे महाराष्ट्रातील वास्तव्य 15 वर्ष असावे.
- अर्जदाराने मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे.
- तो नोंदीत कामगार असावा व नोंदणी चालू असावी.
- योजनेअंतर्गत लाभ मिळवण्याची अर्ज करणे आवश्यक आहे.
- अर्जदार कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगारास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- मंडळाकडे नोंदणी जिवीत असलेले पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील.
- बांधकाम कामगार राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरु एखाद्या इतर योजनेचा लाभ घेत असता कामा नये.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवाशी दाखला
- कायमचा पत्ता पुरावा
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
- नोंदणी अर्ज
- पासपोर्ट आकारातील 3 फोटो
- बँक पासबुक झेरॉक्स
- जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
- नियोक्त्याचे मागील वर्षभरात 90 दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला (इंजिनिअर/ठेकेदार)
- घोषणापत्र
योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
- कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल. किंवा आपल्या क्षेत्रातील बांधकाम कामगार कार्यालयात जाऊन या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनांचे अर्ज | |
योजनेचा अर्ज 1 | डाउनलोड |
योजनेचा अर्ज 2 | डाउनलोड |
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्ता | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |