अनोंदीत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास अर्थसहाय्याचा लाभ: अनोंदीत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास या योजनेअंतर्गत त्यांच्या कुटुंबाला 2.5 लाखांपर्यंत अर्थसहाय्याचा लाभ देण्यात येईल.
बांधकाम क्षेत्रात किंवा अन्य क्षेत्रात काम करणारा कामगार हा कुटुंबातील एक कमावती व्यक्ती असते व त्याच्या एकट्यावर सर्व कुटुंबाचे जीवन अवलंबून असते त्यामुळे कामगाराच्या एकाएकी मुर्त्युमुळे त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते व त्यांना त्यांचे जीवन जगण्यासाठी खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे कामगाराच्या कुटुंबाच्या या सर्व समस्यांचा विचार करून कामगार मंडळाने सदर योजनेची सुरुवात केली आहे.
अनोंदीत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी काम करताना अपघाती मृत्यू अथवा अंपगत्व आल्यास व सदर बांधकाम कामगार संबंधित बांधकामाच्या ठिकाणी 90 दिवसापेक्षा जास्त दिवस काम करीत असल्याचा ठोस पुरावा उदा. हजेरीपत्रक, बांधकाम कामगारांना अदा करण्यात आलेला वेतनाचा तपशील प्राप्त झाल्यास सदर बांधकाम कामगार नोंदीत आहे असे समजून मंडळाकडील नोंदीत बांधकाम कामगाराप्रमाणे सर्व लाभ देय राहतील.
योजनेअंतर्गत मृत कामगाराच्या कुटुंबाला दिले जाणारे आर्थिक सहाय्य:
योजनेचे नाव | लाभाची रक्कम रुपये | |
1 | अनोंदीत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधी करिता अर्थसहाय्य | 10,000/- रुपये |
2 | अनोंदीत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशी वारसास अर्थसहाय्य | 1 लाख रुपये |
3 | अनोंदीत बांधकाम कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशी वारसास अर्थसहाय्य | 2,50,000/- रुपये |
4 | अनोंदीत बांधकाम कामगाराला अपघातात कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास अर्थसहाय्य | 50,000/- रुपये |
योजनेचे उद्दिष्ट:
- कामगाराचा मृत्य झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.
- कामगाराच्या एकाएकी मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये.
- कामगाराच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारणे व त्यांचा आर्थिक विकास करणे.
अनोंदीत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी काम करतांना अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला अर्थसहाय्याचा लाभ मिळण्यासाठी खालील निकष पूर्ण करणे गरजेचे आहे.
- मृत कामगार हा बांधकाम कामात नोंदीत नसलेला कामगार असणे आवश्यक आहे.
- योजनेअंतर्गत अर्थसहाय्याचा लाभ मिळवण्यासाठी कामगाराच्या वारसाला बांधकाम कामगार कार्यालयात अर्ज करणे गरजेचे आहे.
- मृत्युमुखी पडलेल्या कामगाराने बांधकामाच्या ठिकाणी 90 दिवसापेक्षा जास्त काळ काम केलेले असावे.
- कामगाराचा मृत्यू हा तो काम करत असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी कामावर असतानाच झाला पाहिजे.
- कामगाराला/वारसाला अर्जासोबत मृत्यूचा पुरावा, कामगार आणि मृत्यूचा दावा करणारी व्यक्ती (वारस व्यक्ती) यांच्यातील संबंधाचा पुरावा आणि इतर आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
- मृत्यूचा दावा करणारा व्यक्ती हि मृत कामगाराचा कायदेशीर वारस असणे आवश्यक आहे त्या शिवाय अर्थसहाय्याचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठी कोणतीही शुल्क आकारली जात नाही.
- मृत कामगाराची किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 60 वर्षे असावी.
- अर्ज मृत्यूच्या 30 दिवसांच्या आत सादर केला पाहिजे.
अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे:
- नोंदणी अर्ज
- ओळखीचा पुरावा: आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायविंग लायसेन्स
- रहिवाशी दाखला: डोमेसाइल (आवश्यक असल्यास)
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- कायमचा पत्ता पुरावा: रेशन कार्ड, वीज बिल, आधार कार्ड
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
- पासपोर्ट आकारातील 3 फोटो
- बँकेचा तपशील: बँक पासबुक झेरॉक्स
- जन्माचा दाखला: जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला
- ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- घोषणापत्र
- कामगाराचा मृत्यूचा पुरावा:
- आधार कार्ड
- कामगारांचे मृत्यू प्रमाणपत्र, पोलीस प्रथम दर्शनी अहवाल, शवविच्छेदन अहवाल,
- वारसाची कागदपत्रे:
- आधार कार्ड
- मृत कामगार आणि दावा दावा करणारी व्यक्ती यांच्यातील संबंधाचा पुरावा.
- बँक खात्याचा तपशील
अर्थसहाय्य कसे मिळवायचे:
- मृत कामगाराच्या कुटुंबाला किंवा वारसदाराने जवळच्या कामगार कल्याण आयुक्तालय कार्यालयात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज स्वीकारल्यानंतर, दाव्याचा तपास केला जाईल आणि पात्रतेनुसार अर्थसहाय्याची रक्कम मंजूर केली जाईल.
अर्थसहाय्य वितरण कार्यपद्धती:
- कामगाराचा अर्ज स्वीकारल्यानंतर महामंडळाद्वारे त्या अर्जाची आणि जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाते आणि कामगार पात्र असल्यास त्याला अर्थसहाय्य मंजूर केले जाते.
अर्ज करण्याची पद्धत:
- कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
अधिक माहितीसाठी:
- आपण आपल्या राज्याच्या श्रम विभागाशी संपर्क साधू शकता.
- अधिक माहितीसाठी, आपण श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.
योजनांचे अर्ज | |
योजनेचा अर्ज 1 | डाउनलोड |
योजनेचा अर्ज 2 | डाउनलोड |
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्ता | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail.कॉम |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |