बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना काम करताना विविध प्रकारच्या धोक्यांचा सामना करावा लागतो. कामगारांना उंच इमारतीवर काम करावे लागते त्यामुळे उंचावरून पडण्याचा धोका असतो. कामगारांना जड वस्तू उचलावे लागतात तसेच वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवावे लागतात ज्यामुळे त्यांना कंबरदुखीचा त्रास होतो तसेच स्नायूंना ताण येतो. काम करताना खड्यात पडून जखमी होण्याचा धोका असतो. बांधकाम क्षेत्रात धोकादायक रसायनांचा वापर केला जातो ज्यामुळे कामगारांना विषबाधा तसेच त्वचेचे विकास, डोळ्यांना त्रास होण्याचा धोका असतो तर कधी कधी विजेचा धक्का बसण्याचा धोका असतो तसेच यांत्रिक उपकरणे हाताळताना जखमी होण्याचा धोका असतो. तसेच कामगारांना ऊन, वारा, मुसळधार पाऊस, वादळात काम करावे लागते. या सर्व गोष्टींमुळे कामगारांना अपंगत्व येण्याचा किंवा मृत्यू होण्याची शक्यता असते व एखाद्या कामगाराला अपंगत्व आल्यास त्याच्या उपचारासाठी कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामान करावा लागतो तसेच अपघातात कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला जीवन जगण्यासाठी खूप साऱ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे कामगार तसेच त्याच्या कुटुंबाच्या या सर्व समस्यांचा विचार करून इमारत व बांधकाम कामगार मंडळाने या योजनेची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.
कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास अथवा अंपगत्व आल्यास त्याची पत्नी अथवा पती अथवा कायदेशीर वारसास 5 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.
उद्दिष्ट
- कामगारांचा अपघात होऊन अपंगत्व आल्यास उपचारासाठी आर्थिक सहाय्य देऊन पुनर्वसनासाठी मदत करणे.
- अपघातात कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी आर्थिक आधार देणे.
- कामगारांना वैद्यकीय उपचार आणि कृत्रिम अवयव खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे.
- कामगारांचे भविष्य सुरक्षित करणे.
योजनेचे लाभार्थी
- राज्यातील नोंदणीकृत कामगार
योजनेअंतर्गत कामगारांना दिले जाणारे आर्थिक सहाय्य
- नोंदित लाभार्थी कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या नामनिर्देशित केलेल्या वारसास 10000/- रुपये रक्कम अंत्यविधीसाठी मदत.
- नोंदित लाभार्थी कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराचे विधुर पतीस प्रतीवर्षी 24000/- रुपये आर्थिक सहाय्य. (फक्त पाच वर्षासाठी)
- नोंदित लाभार्थी बांधकाम कामगाराचा कामावर असताना मृत्यु झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास 5 लाख रूपये आर्थिक सहाय्य.
- नोंदित लाभार्थी कामगारास 75% किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्यास 2 लाख रूपये आर्थिक सहाय्य. तथापि, नोंदीत बांधकाम कामगाराचे विमा संरक्षण असल्यास, विमा रक्कमेची प्रतिपूर्ती अथवा मंडळामार्फत 2 लाख रूपये आर्थिक सहाय्य यापैकी कोणताही एक लाभ अनुज्ञेय राहील.
- वर नमूद योजनेंतर्गत लाभ हे फक्त मंडळातील नोंदीत बांधकाम कामगाराच्या कायदेशीर वारसास दिले जातात.
अपघात | आर्थिक सहाय्य |
कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या नामनिर्देशित केलेल्या वारसास | 10,000/- रुपये |
कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराचे विधुर पतीस प्रतीवर्षी | 24,000/- रुपये (फक्त पाच वर्षासाठी) |
कामगाराचा कामावर असताना मृत्यु झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास | 5 लाख रूपये |
कामगारास 75% किंवा कायमचे अपंगत्व आल्यास | 2 लाख रूपये |
अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता
- अर्जदार कामगारांचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
- कामगारांचे महाराष्ट्रातील वास्तव्य 15 वर्ष असावे.
- अर्जदाराने मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे.
- तो नोंदीत कामगार असावा व नोंदणी चालू असावी.
अटी व शर्ती
- अर्जदार कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- सदर बांधकाम कामगार संबंधित बांधकामाच्या ठिकाणी 90 दिवसापेक्षा जास्त दिवस काम करीत असल्याचा ठोस पुरावा उदा. हजेरीपत्रक, बांधकाम कामगारांना अदा करण्यात आलेला वेतनाचा तपशील प्राप्त झाल्यास सदर बांधकाम कामगार नोंदीत आहे असे समजून मंडळाकडील नोंदीत बांधकाम कामगाराप्रमाणे सर्व लाभ देय राहतील.
- कामगारांचे महाराष्ट्रातील वास्तव्य 15 वर्ष असावे.
- तो नोंदीत कामगार असावा व नोंदणी चालू असावी.
- कामगारांचे वय 18 वर्ष ते 60 वर्ष दरम्यान असावे.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगारास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- मंडळाकडे नोंदणी जिवीत असलेले पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील.
- बांधकाम कामगार राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरु एखाद्या इतर योजनेचा लाभ घेत असता कामा नये.
- योजनेअंतर्गत लाभ मिळवण्याची अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे
- सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यू दाखला
- बांधकाम कामगार कामावर असताना मृत्यू झाल्याबाबतचा पुरावा.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवाशी दाखला
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- कायमचा पत्ता पुरावा
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
- नोंदणी अर्ज
- पासपोर्ट आकारातील 3 फोटो
- बँक पासबुक झेरॉक्स
- जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
- नियोक्त्याचे मागील वर्षभरात 90 दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला (इंजिनिअर/ठेकेदार)
- महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- घोषणापत्र
अर्ज करण्याची पद्धत
- कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनांचे अर्ज | |
योजनेचा अर्ज 1 | डाउनलोड |
योजनेचा अर्ज 2 | डाउनलोड |
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्ता | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |