बांधकाम कामगार घरकुल योजनेअंतर्गत कामगाराकडे कच्चे किंवा पडके घर असल्यास किंवा त्याची स्वतःची जमीन असल्यास घर बांधण्यासाठी ग्रामीण भागासाठी 1 लाख रुपये व नगरपरिषद क्षेत्रासाठी 1.50 लाख रुपये महानगर पालिका क्षेत्रासाठी 2 लाख रुपये व मुंबई महानगर प्रदेशासाठी 2 लाखाचे बांधकाम अनुदान देण्यात येते.
घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कामगाराला अर्ज करणे आवश्यक आहे.
योजनेचा उद्देश:
- महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना स्वस्त आणि परवडणारी घरे उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
आर्थिक मदत:
ग्रामीण भागात | 1 लाख रुपये |
नगरपरिषद क्षेत्रात | 1.50 लाख रुपये |
महानगर पालिका क्षेत्रात | 2 लाख रुपये |
मुंबई महानगर प्रदेशात | 2 लाख रुपये |
कच्चे/पडके घर:
- जर कामगाराकडे कच्चे किंवा पडके घर असेल तर ते नवीन घर बांधण्यासाठी मदत मिळवू शकतात.
स्वतःची जमीन:
- जर कामगाराची स्वतःची जमीन असेल तर त्यांना घरासाठी आर्थिक मदत मिळू शकते.
बांधकाम कामगार घरकुल योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता
- अर्जदार कामगारांचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
- कामगारांचे महाराष्ट्रातील वास्तव्य 15 वर्ष असावे.
- अर्जदाराने मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे.
- तो नोंदीत कामगार असावा व नोंदणी चालू असावी.
बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवाशी दाखला
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- कायमचा पत्ता पुरावा
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
- नोंदणी अर्ज
- पासपोर्ट आकारातील 3 फोटो
- बँक पासबुक झेरॉक्स
- जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
- नियोक्त्याचे मागील वर्षभरात 90 दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला (इंजिनिअर/ठेकेदार)
- महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- घोषणापत्र
बांधकाम कामगार घरकुल योजना चे नियम व अटी
- अर्जदार कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगारास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- मंडळाकडे नोंदणी जिवीत असलेले पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील.
- बांधकाम कामगार राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरु एखाद्या इतर योजनेचा लाभ घेत असता कामा नये.
- 18 ते 60 वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार असणे आवश्यक
- मागील 12 महिन्यांत 90 दिवसांपेक्षा जास्त काळ बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे.
- स्वतःचे पक्के घर असता कामा नये.
बांधकाम कामगार घरकुल योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
- कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनांचे अर्ज | |
बांधकाम कामगार घरकुल योजना अर्ज 1 | डाउनलोड |
बांधकाम कामगार घरकुल योजना अर्ज 2 | डाउनलोड |
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्ता | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |