बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार हे जीव धोक्यात घालून कमी पगारात जोखमीचे काम करतात तसेच कामाच्या ठिकाणी त्यांना अपघात होण्याचे प्रमाण जास्त असते आणि एखाद्या कामगाराचा अपघात होऊन त्याला अपंगत्व आल्यास किंवा त्याचा अकस्मात मृत्यू झाल्यास कुटूंबाला दैनंदिन जीवन जगण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे कामगाराच्या तसेच कुटुंबाच्या या सर्व समस्यांचा विचार करून कामगार मंडळाने कामगारांना जननी विमा योजना सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.
नोंदीत कामगारांना जननी विमा योजनेचा लाभ तसेच या योजनेसह एलआयसी द्वारा माफक रक्कम दिल्यास अन्य लाभ सुद्धा दिला जातो.
राज्य कामगार विमा योजना चे उद्दिष्ट
- कामगाराला नैसर्गिक मृत्यू ओढवल्यास, अपघाती मृत्यू ओढवल्यास, अपघातामुळे कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व आल्यास आर्थिक सहाय्य पुरविले जाते.
- योजनेअंतर्गत कामगाराला विमा संरक्षण देणे.
जननी विमा योजनेअंतर्गत खालील लाभ आहेत
- कामगाराचा नैसर्गिक मृत्यू ओढवल्यास वारसास 30,000/- रुपये देण्यात येतील
- कामगाराचा अपघाती मृत्यू ओढवल्यास वारसास 75,000/- रुपये देण्यात येतील.
- कामगारांचे अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 75,000/- रुपये देण्यात येतील.
- कामगारांचे अपघातामुळे कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व आल्यास 37,500/- रुपये देण्यात येतील.
- कामगारांच्या दोन मुलांना शिक्षणासाठी दरमहा 100/- रुपये देण्यात येतील.
नैसर्गिक मृत्यू ओढवल्यास | 30,000/- रुपये |
अपघाती मृत्यू ओढवल्यास | 75,000/- रुपये |
कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास | 75,000/- रुपये |
कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व आल्यास | 37,500/- रुपये |
दोन मुलांना शिक्षणासाठी | 100/- रुपये (दरमहा) |
या लाभासोबत मापक रक्कम भरल्यास एलआयसी द्वारा खालील लाभ उपलब्ध आहेत.
- उपदान योजना: वार्षिक दराने रक्कम देय तसेच मृत्यू ओढवल्यास वारसास पूर्ण रक्कम.
- पेन्शन योजना: निश्चित दराने पेन्शन देय असणे तसेच मृत्यू ओढवल्यास पती / पत्नीस पेन्शन मिळणे.
- गटविमा योजना: अपघाती मृत्यू तसेच नैसर्गिक मृत्यू दोन्हीसाठी लागू
- बालिका योजना : 10 हजार रुपये भरल्यास बालिकेस वयाच्या 18 व्या वर्षी 1 लाख रुपये व विमा सवलत.
एलआयसीच्या योजना घेण्यात विशेष लाभ म्हणजे कार्यालयाचे नोंदणी इत्यादीचे अभिलेख एलआयसी यास पूर्णपणे स्वीकारार्ह आहेत. त्यामुळे कागदपत्र व माहिती अभावी कामगार लाभापासून वंचित राहणार नाहीत. योजनेचे लाभ तर मिळतातच शिवाय जीवन विम्याचे संरक्षण मिळते.
योजनेचा फायदा
- एखाद्या कामगाराचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अंशतः किंवा कायमस्वरुपती अपंगत्व आल्यास आर्थिक सहाय्य दिले जाते.
- योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे कामगार तसेच त्याचे कुटुंब दैनंदिन गरज पूर्ण करू शकतील.
योजनेचे लाभार्थी
- महाराष्ट्र राज्यातील कामगार मंडळात नोंदणीकृत कामगार
योजनेअंतर्गत पात्रता व अटी
- कामगार हा कामगार मंडळात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
- कामगार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- योजनेअंतर्गत लाभ मिळवण्याची अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे
- कामगारांचे आधार कार्ड
- कामगारांचे मंडळात नोंदणी प्रमाणपत्र
- रहिवाशी दाखला.
- उत्पन्नाचा दाखला
- बँक खात्याचा तपशील
अर्ज करण्याची पद्धत
- कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनांचे अर्ज | |
योजनेचा अर्ज 1 | डाउनलोड |
योजनेचा अर्ज 2 | डाउनलोड |
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्ता | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |