कामगारांना घर खरेदी किंवा घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य 2024 | Bandhkam Kamgar Gharkul Yojana

राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार हे आर्थिक दृष्ट्या कमकुवत असतात त्यामुळे कामगारांजवळ रहायला स्वतःचे घर उपलब्ध नसते तसेच ते स्वतःचे घर खरेदी करण्यासाठी असमर्थ असतात तसेच बहुतांश कामगार हे कच्च्या पडक्या घरात राहतात तसेच पक्के घर बांधण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेशे पैसे नसतात त्यामुळे कामगार बँक, वित्त संस्था, पतपेढी मधून घर बांधण्यासाठी जास्त व्याज दराने कर्ज घेतात परंतु कामगारांना मिळणारे वेतन हे कमी असते त्यामुळे त्यांना कर्जाची रक्कम फेडणे अशक्य होते त्यामुळे कर्जावरील व्याजदर वाढत जातो याचा आर्थिक ताण त्यांना सहन करावा लागतो. तयामुळे राज्यातील ज्या कामगारांजवळ रहायला स्वतःचे घर नाही तसेच ते कच्य्या पडक्या घरात राहतात अशा कामगारांनी स्वतःचे घर खरेदी करण्यासाठी तसेच घर बांधण्यासाठी कर्ज घेतले आहे अशा कामगारांना कर्जावरील व्याजाची रक्कम महामंडळामार्फत बँकेला दिली जाते.

नोंदित बांधकाम कामगारांच्या घर खरेदी किंवा घर बांधणीकरीता बँकेकडून घेतलेल्या 6 लाख रक्कमेच्या मर्यादेत गृहकर्जावरील व्याजाची रक्कम मंडळामार्फत देण्यात येईल. मंडळामार्फत द्यावयाची गृहकर्जावरील व्याजाची रक्कम बांधकाम कामगाराच्या बँकेच्या कर्ज खात्यात जमा केली जाईल.

Bandhkam Kamgar Gharkul Yojana चे उद्दिष्ट

  • राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कामगारांनी घेतलेल्या गृहकर्जावरील व्याजाची रक्कम अदा करणे.
  • कामगारांच्या डोक्यावरील आर्थिक ताण कमी करणे.
Bandhkam Kamgar Gharkul Yojana

योजनेचे लाभार्थी

  • इमारत व बांधकाम कामगार मंडळात नोंदणीकृत कामगार

योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता व अटी

  • अर्जदार कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • बांधकाम कामगार मंडळाकडे सलग 3 वर्षे नोंदीत असावा.
  • बांधकाम कामगाराचे वय 18 ते 52 वर्षे या दरम्यान असावे.
  • बांधकाम कामगाराने घरबांधणीकरीता कर्ज घेताना स्वतःच्या मालकीची जागा, सक्षम प्राधिकाऱ्याने मंजूर केलेला आराखडा सादर करणे आवश्यक राहील.
  • घरखरेदी करताना विकासकासोबत केलेला नोंदणीकृत करारनामा सादर करणे अनिवार्य राहिल.
  • बांधकाम कामगाराने कर्ज घेतलेल्या घराची मालकी पती-पत्नीची संयुक्त असावी.
  • सदर मालमत्तेवर बांधकाम कामगाराचा पूर्ण हक्क असावा. सदर मालमत्तेबाबत कोणताही वाद (Dispute) असू नये.
  • घरखरेदी किंवा घर बांधणी करीता घेतलेल्या कर्जाबाबत बँकेचे कर्जमंजूरीचे आदेश आवश्यक राहतील.
  • सदर योजनेचा लाभ कूटुंबाच्या एकाच घरासाठी (एकदाच) देय रहील.
  • उपरोक्त अटींचे पालन करणाऱ्या नोंदित बांधकाम कामगारांस गृहकर्जावारील व्याजाची रक्कम मंडळामार्फत थेट बांधकाम कामगारांच्या बँकेकडील कर्ज खात्यात जमा करण्यात येईल.
  • कामगारांचे वार्षिक उत्पन्न कामगार मंडळाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • कामगारांकडे रहायला स्वतःचे पक्के घर नसावे.

आर्थिक मदत:

  • ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी: 2 लाख रुपये
  • शहरी भागात घर बांधण्यासाठी: 3 लाख रुपये
  • कच्चे घर पक्के करण्यासाठी: 1 लाख रुपये

मंडळातील नोंदित बांधकाम कामगारांसाठी पक्के घर बांधण्यासाठी खालीलप्रमाणे प्रस्ताव मंडळाच्या विचारार्थ सादर करण्यात येत आहे.

  • योजनेचे स्वरूप व अर्थसहाय्य: मंडळाकडील नोंदित बांधकाम कामगारांना ग्रामीण / शहरी भागात स्वतःच्या जागेवर नवीन घर बांधण्यासाठी किंवा अस्तीत्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रुपांतर करण्यासाठी 2 लाख रुपये अर्थसहाय्य देणे.
  • घराचे क्षेत्रफळ: घराच्या बांधकामाचे चटई क्षेत्र किमान 269 चौ. फूट व जास्तीत जास्त 300 चौ.फु.इतके असावे. या पेक्षा कमी क्षेत्रफळाची जागा निवडल्यास जागेच्या उपलब्धतेनुसार घराचे बांधकाम करण्याची मुभा राहील. मात्र एकूण बांधकाम क्षेत्र हे 30 मीटरपेक्षा अधिक असू नये.

लाभार्थीची पात्रता

अ) मंडळाकडे नोंदित व सक्रिय (जिवित) बांधकाम कामगारांना सदर अर्थसहाय्य देय राहिल.
) नोंदित बांधकाम कामगराचे स्वतःच्या नावे महाराष्ट्र राज्यात पक्के घर (सिमेंट व वाळूने बांधलेले घर नसावे.
क) नोंदित बांधकाम कामगाराच्या कुटूंबातील एकाच व्यक्तीस सदर अर्थसहाय्य देय राहिल.
ड) सदर नोंदित बांधकाम कामगाराने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देय अनुदानाचा / मंडळाकडून देय गृहकर्जावरील व्याज परताव्याकरीता अनुज्ञेय अर्थसहाय्यचा अथवा केंद्र शासन / राज्य शासन / मंडळाच्या अन्य कोणत्याही समांतर योजनेचा लाभ घेतलेला नसावा. त्याबाबत त्याना स्वयंघोषणापत्र / शपथपत्र सादर करणे आवश्यक राहिल.
इ) नोंदित बांधकाम कामगारास स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी त्याच्या स्वत:च्या/ पत्नीच्या / अविवाहित मुलाच्या नावे मालकीची जागा असणे आवश्यक राहिल व त्यासाठी मालकी हक्काचे दस्तऐवज पुरावा (ग्रामपंचायतीने/ तलाठयाने प्रमाणित केलेले) म्हणून जोडणे आवश्यक आहे.
ई) लाभार्थ्यास त्याचे कच्च्या घराचे पक्कया घरात रूपांतर करण्यासाठी स्वत:च्या मालकीची किंवा पत्नीचे किंवा अविवाहीत मुलांच्या नावे कच्चे घर असणे आवश्यक आहे.

अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे

  • रेशन कार्ड/निवडणूक मतदार ओळखपत्र / विद्युत देयक
  • जमीन ताबापत्र, 7/12 उतारा, पी. आर. कार्ड, मालमत्ता कर आकारणी नोदवहीचा उतारा इ.
  • सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला
  • आधार कार्ड
  • जनधन योजनेअंतर्गत अथवा अन्य खाते असलेल्या बँकेचे आणि शाखेचे नाव व खाते क्रमांक
  • लाभार्थी म्हणून नोंदणी झाल्यानंतर सक्षम प्राधिकाऱ्याने नोंदित बांधकाम कामगार म्हणून दिलेल्या ओळखपत्राची प्रत.
  • प्रस्तावित घराच्या बांधकामाचा स्थानिक प्राधिकरणने मंजूर केलेला नकाशा / आराखडा
  • नोदणीकृत अभियंता यांनी दिलेल्या प्रस्तावित घराच्या बांधकामाचे अंदाजपत्रक

योजनेअंतर्गत आवश्यक घराची रचना

घराच्या नकाशा / आराखडयाच्या धर्तीवर असावा. घराची रचना शक्यतो पुढील प्रमाणे असावी.

  • संपूर्ण बांधकाम विटा, वाळू व सिमेंटमध्ये असावे.
  • घरकुलामध्ये तीन खोल्या बांधण्यात याव्या त्यामध्ये एक बैठक हॉल, एक शयन कक्ष व एक स्वयंपाक घर असावे. तसेच त्यामध्ये एक शौचालय व स्वच्छतागृह / स्नानघर असणे अनिवार्य राहील.
  • घराच्या जोत्याचे दगडी बांधकाम असावे. घराची उंची कमीत कमी 9 फूट असावी. घरामध्ये फर्शी बसविणे आवश्यक राहिल. घराच्या सर्व भिंतीना आतून व बाहेरून प्लास्टर करणे आवश्यक आहे.
  • छताकरीता स्थानिक गरजेनुसार मजबूत चांगल्या प्रकारचे लोखंडी किंवा सिमेंट पत्रे अथवा कौलांचा वापर करण्यास मुभा राहील.
  • लाभार्थीला त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या जागेच्या क्षेत्रफाळानुसार एक मजली अथवा दुमजली घर बांधण्याची मुभा रहील. मात्र त्यामध्ये शौचालय व स्वच्छता / स्नान घराची सुविधा असणे बंधनकारक राहील.

अर्थसहाय्य मिळण्याची कार्य पध्दत

  • नोंदणीकृत बांधकाम कामगारापैकी सदर योजनेचा लाभ घेण्यास इच्छूक लाभार्थ्यांची यादी मंडळाकडून मंजूर करून घेण्यात येईल.
  • मंडळाने मंजुर केलेल्या यादीतील लाभार्थ्यांकरीता सदर योजना ग्रामविकास विभागाअंतर्गत जिल्हा पातळीवरील DRDA मार्फत राबविण्यात येईल.
  • सदरील योजनेअंतर्गत लाभार्थ्यास बॅकेडून कर्ज घेऊन घर बांधण्याची किंवा स्वतःच्या पैशाने घर बांधण्याची मुभा राहील. बॅकेडून कर्ज घेतल्यास अर्थसहाय्याची रक्क्म बँकेस अदा करण्यात येईल व स्वतःच्या पैश्याने घर बांधल्यास अर्थसहाय्याची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
  • बँकेने मंजूर केलेल्या कर्जाच्या रकमेपैकी 2 लाख रुपये पर्यंतची रक्कम महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून बँकेकडे अनुज्ञेय असलेल्या हप्त्या प्रमाणे लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात येईल. उर्वरित कर्जाची रक्कम लाभार्थ्यास परस्पर बँकेस भरावी लागेल. त्यास महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ जबाबदार राहणार नाही.
  • लाभार्थिने घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही नोंदणीकृत अभियंत्याकडून घराचे पूर्णत्वाचे प्रमाणपत्र अणि मुल्यांकन प्रमाणपत्र प्राप्तकरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे सादर करावे.
  • अर्थसहायाची रक्कम बांधकामाच्या प्रगतीनुसार खालीलप्रमाणे 4 टप्प्यात मंजुर करण्यात येईल.
बांधकाम स्थितीअर्थसहाय्याची हफ्त्याची राशी
1जागा उपलब्धतेचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर व
मंजूर बांधकाम आराखड्याची प्रत सादर केल्यानंतर
तसेच बांधकामासाठी पाया खोदल्यानंतर व
बांधकाम साहित्य जमा केल्यानंतर / साठविल्यानंतर
पहिला हफ्ता
30,000/- रुपये
2Lintle Level पर्यंतचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरदुसरा हफ्ता
60,000/- रुपये
3छतापर्यंतचे काम पूर्ण झाल्यानंतरतिसरा हफ्ता
60,000/- रुपये
4घर पूर्ण झाल्यावर अंतिम पूर्णत्वाचा दाखला सादर केल्यानंतरचौथा हफ्ता
50,000/- रुपये

योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

  • कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनांचे अर्ज
योजनेचा अर्ज 1डाउनलोड
योजनेचा अर्ज 2डाउनलोड
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्तायेथे क्लिक करा
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णययेथे क्लिक करा

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना

सामाजिक सुरक्षा योजना

कामगाराच्या विवाहाच्या खर्चासाठी 30,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसहाय्य
बांधकाम कामगार योजना अंतर्गत मध्यान्ह भोजन योजना
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
अटल पेन्शन योजना लाभ
कामगारांच्या पाल्यांना पाळणाघर सुविधा
कौशल्यवृद्धी योजना लाभ
बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभ
नोंदीत बांधकाम कामगारांकरिता ट्रांझिट कॅम्प ची सुविधा
प्रधानमंत्री आवास (ग्रामीण) योजना
घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना
कामगार व कामगार कुटुंबियांची लांब पल्ल्याची सहल
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड
योजनांचे अर्ज
सामाजिक सुरक्षा योजनांचे अर्ज 1डाउनलोड
सामाजिक सुरक्षा योजनांचे अर्ज 2डाउनलोड

शैक्षणिक योजना

परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती
क्रीडा शिष्यवृत्ती योजना
साहित्य प्रकाशन अनुदान योजना
इयत्ता 1ली ते 7वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 2500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
इयत्ता 8वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
इयत्ता 10वी व इयत्ता 12वी मध्ये किमान 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
इयत्ता 11वी व इयत्ता 12वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी 10,000/- रुपयाचे आर्थिक सहाय्य
कामगाराच्या मुलांना व पत्नीस पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
कामगाराच्या मुलांना व पत्नीस वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य
वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रतिवर्षी 60,000/- रुपये आर्थिक सहाय्य
शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 25,000/- रुपयाचे आर्थिक सहाय्य
नोंदीत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास MS-CIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती
बांधकाम कामगाराच्या आय आय टी वा तत्सम शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
कामगारांच्या पाल्यांना इंग्रजीच्या ट्युशन फीसाठी आर्थिक सहाय्य
बांधकाम कामगाराच्या पाल्यास पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी तसेच परदेशात उच्च शिक्षण घेण्याकरिता शिष्यवृत्ती
सर्वसाधारण शिष्यवृत्ती
कामगाराच्या पाल्यांना शिक्षणासाठी टॅबलेट व लॅपटॉप चे वितरण
बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक उपयोगाची पुस्तके भेट
योजनांचे अर्ज
शैक्षणिक योजनांचे अर्ज 1डाउनलोड
शैक्षणिक योजनांचे अर्ज 2डाउनलोड

आरोग्य विषयक योजना

नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
गंभीर आजार वैद्यकीय उपचार सहायता योजना
शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य (दोन जीवित अपत्यांसाठी)
लाभार्थी कामगार व त्याच्या कुटुंबाला गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1 लाखाचे आर्थिक सहाय्य
एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1 लाख रुपये मुदत ठेव बंद
अपघातात कामगाराला 75 टक्के अपंगत्व किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 2 लाखाची आर्थिक मदत
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ
कामगार दवाखान्यात भरती झाल्यास भरती काळापुरता त्याच्या पत्नीस दर दिवशी आर्थिक सहाय्य
कामगारांना जननी विमा योजनेचा लाभ
नोंदीत बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी
व्यसनमुक्ती करीता निधी
योजनांचे अर्ज
आरोग्य विषयक योजनांचे अर्ज 1डाउनलोड
आरोग्य विषयक योजनांचे अर्ज 2डाउनलोड

आर्थिक योजना

कामगार योजना ५०००
आत्महत्याग्रस्त कामगाराच्या कुटुंबास अर्थसहाय्य
कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 5 लाखाचे आर्थिक सहाय्य
शिवण मशीन अनुदान योजना
बांधकाम कामगार पेटी योजना
कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कायदेशी वारसास 2 लाखाचे आर्थिक सहाय्य
अनोंदीत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास अर्थसहाय्याचा लाभ
अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) अंतर्गत 2 लाखाचे अर्थसहाय्य
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत 2 लाखाचे अर्थसहाय्य
50 ते 60 वयोगटातील कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरिता 10 हजारांचे सहाय्य
कामगाराचा मृत्यू झाल्यास विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस 5 वर्षाकरिता 24 हजाराचे आर्थिक सहाय्य
नोंदीत बांधकाम कामगारांना घर खरेदी किंवा घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य
बांधकाम कामगारांना बोनस सुविधा
बांधकाम कामगारांना सायकल वाटप
साहित्य खरेदीसाठी आर्थिक सहाय्य
बांधकाम कामगारांना सुरक्षा संच (सेफ्टी किट) चा लाभ
बांधकाम कामगारांना वस्तू संच (Essential Kit) चा लाभ
बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वितरण
कामगार व त्यांच्या कुटुंबियांना स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण योजना
अटल बांधकाम कामगार आवास योजना
वाहन चालक प्रशिक्षण योजना
योजनांचे अर्ज
आर्थिक योजनांचे अर्ज 1डाउनलोड
आर्थिक योजनांचे अर्ज 2डाउनलोड

महत्वाच्या बाबी

कामगार कल्याण योजना
बांधकाम कामगार यादी
बांधकाम कामगार योजना फायदे
बांधकाम कामगार योजना अंतर्गत आवश्यक पात्रता
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे
बांधकाम कामगार योजना आवश्यक अटी व शर्ती
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय
बांधकाम कामगार संपर्क कार्यालय
बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म
बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्रे
Essential Kit Form PDF
Bandhkam Kamgar Safety Kit Form PDF Download
bocw Safety Kit Form PDF Download
Bandhkam Kamgar Nondani Maharashtra

कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे

बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो?
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची?
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का?
असंघटित कामगार म्हणजे काय?
कामगार कल्याण योजना काय आहेत?

बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी

बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा

बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण

आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा

बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा

उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना

सर्वसाधारण शिष्यवृत्ती
परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती
क्रीडा शिष्यवृत्ती
पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य
MS-CIT अर्थसहाय्य
साहित्य प्रकाशन अनुदान
शिवण मशीन अनुदान योजना
गंभीर आजार उपचार अर्थसहाय्य
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
आत्महत्याग्रस्त कुटुंबास अर्थसहाय्य
कामगार व कामगार कुटुंबियांची लांब पल्ल्याची सहल
वाहन चालक प्रशिक्षण
इंग्रजीसह विदेशी भाषा संभाषण प्रशिक्षण
स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
दूरध्वनी क्र022-24306717 / 43226825
फॅक्स क्र022-42210019
ई-मेलmlwbpro53@gmail[dot]com
पत्तामका / ग्रंथालय / 17 -18 / 165
हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन,
सेनापती बापट मार्ग,
एलफिन्स्टन, मुंबई 400013