बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत कामगारांना विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात त्या योजनांपैकी एक योजना ज्या योजनेचे नाव Bandhkam Kamgar Peti Yojana आहे. आपण या लेखात कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना विविध प्रकारच्या अपघातांना सामोरे जावे लागते. कामगार हे आर्थिकदृष्ट्या गरीब असतो व त्यामुळे त्यांच्याजवळ कुठल्याच प्रकारचे सेफ्टी किट उपलब्ध नसते व त्यांना सेफ्टी किट विकत घेणेसुद्धा शक्य नसते त्यामुळे ते कुठल्याच सेफ्टी किट शिवाय काम करत असतात व अशा वेळेस त्यांना अपघात झाल्यास अपंगत्वाचा सामान करावा लागतो किंवा काही वेळेस त्यांना स्वतःचा जीव सुद्धा गमवावा लागतो. कामगारांच्या या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम कामगार पेटी योजना राबविण्याचा निर्णय घेतला.
बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत कामगारांना दिल्या जाणाऱ्या वस्तू
- बॅग
- रिफ्लेक्टर जॅकेट
- सेफ्टी हेल्मेट
- चार कप्प्याच्या जेवणाचा डबा
- सेफ्टी बूट
- सोलर टॉर्च
- सोलर चार्जर
- पाण्याची बॉटल
- मच्छरदाणी जाळी
- सेफ्टी बूट
- हात मोजे
- चटई
- पेटी
बांधकाम कामगार पेटी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता व अटी
- कामगार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- कामगाराचे वय 18 वर्षे ते 60 वर्षे दरम्यान असावे.
- कामगाराने मागील वर्षांमध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे.
- कामगाराचे नाव महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी केलेले असावे
- कामगार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत असावे
- योजने अंतर्गत नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारचा पहिल्या 2 मुलांसाठी योजना लागू होईल
- बांधकाम कामगार केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू एखाद्या योजनेमार्फत लाभ घेत असेल तर अशा परिस्थितीत त्या कामगाराला या योजनेच्या लाभ दिला जात नाही
- इतर क्षेत्रातील कामगारांना या योजनेच्या लाभ दिला जात नाही.
बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर
- इमेल आयडी
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- शपथ पत्र
- वयाचा दाखला
- बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी प्रमाणपत्र
बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत
- अर्जदार कामगाराला आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात किंवा बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मध्ये जाऊन बांधकाम कामगार पेटी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज जमा करावा लागेल.
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्ता | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |