इंग्रजीच्या ट्युशन फीसाठी आर्थिक सहाय्य: या योजनेअंतर्गत बांधकाम कामगाराच्या पाल्यांना इंग्रजीच्या ट्युशन फीसाठी 1,500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.
राज्यातील कामगार वर्ग हा कमी पगारात काम करत असतो त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असते व अशा परिस्थितीत ते स्वतःच्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी कमी पडतात. तसेच सध्याच्या युगात इंग्लिश भाषा बोलणाऱ्याला जास्त महत्व दिले जाते तसेच अनेक नोकऱ्यांमध्ये इंग्रजी भाषा बोलणे अतिशय महत्वाचे झाले आहे.कारण इंग्रजी भाषा ही जागतिक स्तरावर बोलली जाणारी भाषा आहे. त्यामुळे प्रत्येक पालकांचे स्वप्न असते कि आपल्या मुलांना चांगल्या प्रतीचे इंग्लिश बोलता यावे व भविष्यात त्यांना चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात परंतु इंग्लिश ट्युशन शुल्क जास्त असते जे कामगारांना परवडण्यासारखे नसते त्यामुळे कामगार मंडळाने कामगारांच्या मुलांना इंग्लिश ट्युशन फी साठी आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला.
योजनेचे उद्दिष्ट:
- कामगार व त्याच्या पाल्यांना इंग्रजीच्या ट्युशन फी साठी आर्थिक सहाय्य देणे.
- कामगार तसेच त्यांच्या मुलांना इंग्रजी भाषा शिक्षण्यासाठी मदत करणे.
- कामगार तसेच त्यांच्या मुलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
- इंग्रजी भाषा शिकवून त्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ करणे व रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे.
- जागतिक स्तरावरील नोकरीसाठी वाव निर्माण करणे.
योजनेचे वैशिष्ट्य:
- लाभाची राशी कामगाराच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
प्रशिक्षणाचा कालावधी:
- 3 महिने ते 6 महिने
योजनेअंतर्गत कामगाराच्या पाल्यांना दिले जाणारे आर्थिक सहाय्य:
- या योजनेअंतर्गत कामगारांच्या पाल्यांना 1500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख दरवर्षी 31 ऑगस्ट आहे.
पात्रता व अटी
- अर्जदाराचे पालक नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थी इयत्ता 5वी ते इयत्ता 10वी पर्यंतच्या वर्गात शिकत असावा.
- विद्यार्थ्याचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेत इंग्रजी शिकत असावा.
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे:
- ट्युशन क्लास मध्ये प्रवेश घेतल्याची प्रमाण व शुल्क पावती
- कामगारांचे कामगार मंडळात नोंदणी प्रमाणपत्र
अर्ज करण्याची पद्धत:
- कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर सभासद मध्ये योजनांसाठी अर्ज वर क्लिक करावं लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या योजनेसमोर Apply Now बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भर तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट बटनावर क्लिक करा.
- अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनांचे अर्ज | |
योजनेचा अर्ज 1 | डाउनलोड |
योजनेचा अर्ज 2 | डाउनलोड |
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्ता | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |