Bandhkam Kamgar Yojna Scholarship: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कामगारांच्या पाल्यांना इयत्ता 10 वी ते पीएचडी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाते आहे.
Bandhkam Kamgar Yojna Scholarship:
इयत्ता / अभ्यासक्रम | वर्ष | शिष्यवृत्ती रक्कम |
10वी ते 12वी | 2000/- रुपये | |
पदवी: शासन / विद्यापीठ मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून | प्रथम/द्वितीय/तृतीय | 2500/- रुपये |
पदव्युत्तर पदवी: शासन / विद्यापीठ मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून | प्रथम/द्वितीय | 3000/- रुपये |
व्यावसायिक पदविका (डिप्लोमा): शासन / विद्यापीठ मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून | प्रथम/द्वितीय/तृतीय | 2500/- रुपये |
व्यावसायिक पदवी ( डिग्री) / पदव्युत्तर पदवी ( पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री) – शासन / विद्यापीठ मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रम. | प्रथम/द्वितीय/तृतीय | 5000/- रुपये |
एमपीएससी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण | 5000/- रुपये | |
युपीएससी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण | 8000/- रुपये | |
पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी नोंदणी झालेले विद्यार्थी | 5000/- रुपये |
सर्वसाधारण शिष्यवृत्ती योजना अंतर्गत नियम व अटी:
- सदर शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र कामगार कल्याण निधी (Maharashtra Labour Welfare Fund ) भरणाऱ्या कामगारांच्या पाल्यांसाठी आहे.
- अर्ज भरताना कामगाराचा मंडळाने दिलेला LIN नंबर आवश्यक आहे.
- सदर योजना इयत्ता 9वी पास झाल्यानंतर अर्थात इयत्ता 10वी पासून पुढील शिक्षण घेणाऱ्या कामगार पाल्यांसाठी आहे.
- मागील परीक्षेत किमान 60% गुण असणे गरजेचे. (विद्यार्थ्यास चालू शैक्षणिक वर्षात ज्या किमान शैक्षणिक पात्रतेच्या आधारे प्रवेश मिळाला असेल त्या अभ्यासक्रम / इयत्तेत किमान 60% गुण असणे आवश्यक आहे.)
- शिष्यवृत्ती केवळ शासनमान्य अभ्यासक्रमासाठी आहे. शासनमान्य नसलेल्या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू नये.
- मुक्त विद्यापीठ, बहिस्थ विद्यापीठ / दूरस्थ शिक्षण घेणारे / अप्रेंटीसशिप इंटर्नशिप व मानधन, मोबदला, Stipend घेणा-या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- अर्जासोबत जोडव्याची सर्व कागदपत्रे मूळ स्वरूपात स्कॅन (Scan Original Documents) केलेली असावीत. झेरॉक्स स्कॅन करून अर्जासोबत अपलोड केल्यास अर्ज बाद करण्यात येईल.
- शिष्यवृत्ती अर्ज भरताना एकूण गुण प्राप्त गुण व प्राप्त गुणांची टक्केवारी इत्यादी तपशील स्पष्ट नमूद करावा. ज्या विद्यार्थ्यांना ग्रेड / पॉईंट किंवा इतर पध्दतीने गुण प्राप्त असतील त्यांनी मिळालेल्या गुणांची टक्केवारी संबंधित
- महाविद्यालयातुन पत्राद्वारे प्राप्त करावी व ते पत्र देखील अर्जासोबत अपलोड करावे.
- कामगारांच्या दिव्यांग पाल्यांना शासनाच्या धोरणानुसार एकूण शिष्यवृत्ती रक्कमेच्या 3% प्रमाणात सरसकट शिष्यवृत्ती मंजूर केली जाईल. दिव्यांगासाठी 60% गुणांची अट तसेच पालकांच्या उत्पन्नाची अट शिथिल करण्यात आली आहे. शासन नियमानुसार दिव्यांग विद्यार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
- अर्ज भरण्यापूर्वीची पूर्वतयारी कामगारांचा LIN नंबर, कामगारांचा फॉर्म 16 किंवा आस्थापनेणे दिलेला उत्पन्न दाखला, विद्यार्थ्यांची मागील वर्षांची गुणपत्रिका, ग्रेड / पॉईंट असल्यास टक्केवारीत रूपांतर केलेले महाविद्यालयाचे पत्र, चालू शैक्षणिक वर्षांचे बोनाफाईड, शैक्षणिक खंड असल्यास तहसीलदार प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास शासन नियमानुसार प्रमाणपत्र, पालक व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, रेशनकार्ड, विद्यार्थ्यांच्या बँक खात्याचा कॅन्सल्ड चेक किंवा विद्यार्थ्याच्या बँक खात्याच्या पासबुकचे सर्व तपशील असलेले पृष्ठ इत्यादी सर्व संबंधित कागदपत्रे मूळ स्वरूपात स्कॅन केलेली असावीत.
- सदर शिष्यवृत्ती मंडळाची तरतूद आणि कामगार पालकांचा उत्पन्न गट, विद्यार्थ्याची परीक्षेतील टक्केवारी या निकषावर उत्पन्न गटातील गुणानुक्रमे / मेरीट नुसार दिली जाते.
- अपूर्ण माहिती दिलेले व कागदपत्रांची पूर्तता नसलेले अर्ज ऑनलाईन सादर करू नयेत. अर्ज मंडळाने दिलेल्या विहित नमुन्यात व योग्य मूळ कागदपत्रांसह विहित कालावधीत तसेच सुस्पष्ट कागदपत्रांसह सादर करावेत. अन्यथा अर्ज बाद होईल. याची सर्व जबाबदारी विद्यार्थी व पालकांची असेल.
आवश्यक कागदपत्रे:
- मागील वर्षाची गुणपत्रिका (सेमीस्टर पद्धत असल्यास दोन्ही सेमिस्टरची गुणपत्रिका जोडावी)
- चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड सर्टीफिकेट
- रेशनकार्ड / ई.एस.आय.सी. / पालकाचे आधारकार्ड
- विद्यार्थ्याचे आधार कार्ड
- कामगार कल्याण निधी कपात दर्शवणारी पालकाची जून महिन्याची वेतन पावती किंवा वेतन पावती नसल्यास आस्थापनेचा दाखला. (मूळ प्रत )
- कंपनी बंद पडली असल्यास कंपनी बंद पडल्याचा दाखला किंवा कामगाराचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास मृत्यूचा दाखला जोडावा. सदर दाखला तीन वर्षांपर्यंत वैध असेल.
- बँकेचा कॅन्सल चेक/पासबुक ( विद्यार्थीचे नाव, खाते क्रमांक, आय.एफ.एस.सी. क्रमांक व मायकर क्रमांक यांची नोंद असणे आवश्यक)
- स्वयं-साक्षांकन केले असल्यास स्वयं साक्षांकन घोषणापत्र. (मूळ प्रत)
योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत:
आम्ही खाली दिलेला अर्ज डाउनलोड करून अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयात जाऊन जमा करावा.
परिपत्रक | येथे क्लिक करा |
शिष्यवृत्ती फॉर्म | येथे क्लिक करा |
योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर सभासद मध्ये योजनांसाठी अर्ज वर क्लिक करावं लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या योजनेसमोर Apply Now बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भर तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट बटनावर क्लिक करा.
- अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |