बांधकाम कामगाराच्या पाल्यास पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी तसेच परदेशात उच्च शिक्षण घेण्याकरिता प्रतिवर्षी 2 लाखाची शिष्यवृत्ती देण्यात येते.
आर्थिक दृष्ट्या गरीब कामगार पैशाअभावी आपल्या पाल्यांना पीएचडी शिक्षण देण्यासाठी असमर्थ असतात व त्यामुळे कामगारांच्या मुलांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करता येत नाही व ते स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहतात. त्यामुळे कामगाराच्या तसेच त्यांच्या मुलांच्या या सर्व समस्यांचा विचार करून कामगार मंडळाने कामगार कल्याण योजना शिष्यवृत्ती सुरु करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून मुले स्वतःचे शिक्षण पूर्ण करून स्वतःसाठी एखादी चांगली नोकरी मिळवू शकतील किंवा स्वतःचा एखादा उद्योग सुरु करू शकतील व परिणामी राज्यातील बेरोजगारी कमी होऊन रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना चे उद्दिष्ट
- कामगारांच्या पाल्यांना उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करणे तसेच त्यांना आर्थिक सहाय्य करणे.
- कामगाराच्या पाल्यांच्या शिक्षणात खंड पडू नये.
- या योजनेचा उद्देश, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे हा आहे.
कामगार कल्याण शिष्यवृत्ती अंतर्गत अर्थसहाय्याची रक्कम
- पी एच.डी अभ्यासक्रमाकरीता परदेशातील नामांकित विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या नोंदीत बांधकाम कामगारांच्या पाल्यास प्रतिवर्ष 2 लाख रुपये प्रमाणे 4 वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रम यापेक्षा कमी कालावधी या वर्षाकरीता अर्थसहाय्य देण्यात येते.
- या योजनेअंतर्गत, निवडक विद्यार्थ्यांना दरवर्षी 2 लाखापर्यंत शिष्यवृत्ती दिली जाईल.
- शिष्यवृत्तीचा वापर शिक्षण शुल्क, पुस्तके, इतर शैक्षणिक खर्च आणि प्रवास खर्चासाठी केला जाऊ शकतो.
अभ्यासक्रम | शिष्यवृत्ती रक्कम |
पीएच.डी.साठी | दरवर्षी 2 लाख रुपये |
परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी | दरवर्षी 3 लाख रुपये |
शैक्षणिक अर्हता
- पीएचडी. अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर परिक्षेत किमान 55% गुण असणे आवश्यक राहील.
अभ्यासक्रमाचा कालावधी
- पीएचडी साठी 04 वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी या पेक्षा कमी असेल तो
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 1 जून 2024
- ऑनलाइन अर्ज शेवटची तारीख: 31 जुलै 2024
- ऑफलाइन अर्ज शेवटची तारीख: 31 जुलै 2024
एकाच कुटूंबातील कमाल पात्रता धारक
- सदर योजनेचा लाभ कामगाराच्या दोन पाल्यांना घेता येईल.
- सदर शिष्यवृत्ती एकाच वेळेस मान्य करता येईल.
- एकापेक्षा जास्तं वेळेस विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार नाही.
योजनेच्या अटी व शर्ती
- अर्जदार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत असावा व अर्जदाराची नोंदणी मंडळात सक्रिय (जिवीत) असावी.
- अर्जदाराच्या पाल्यांना परदेशातील नामांकित शैक्षणिक संस्था / विद्यापीठामध्ये प्रवेश मिळालेला असावा.
- अर्जदाराने पाल्याच्या विद्यावाचस्पती (पीएच.डी.) करीता अर्ज करताना यापूर्वी इतर कोणत्याही राज्य शासनाची अथवा केंद्र शासनाची परदेशी शिष्यवृत्ती घेतलेली नसावी.
- परदेशातील विद्यापीठ / शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पूर्ण वेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा.
- प्रवेशित अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना नमूद केलेल्या विहीत कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करणे विद्यार्थ्यावर बंधनकारक असेल, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मान्य केली जाणार नाही.
- योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
- कामगाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असता कामा नये.
अर्ज करण्याची पद्धत
- कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
टीप:
- अर्ज करण्याची अंतिम तारीख दरवर्षी बदलू शकते. कृपया अधिकृत माहितीसाठी कामगार कल्याण विभागाच्या वेबसाइटला भेट द्या.
योजनांचे अर्ज | |
योजनेचा अर्ज 1 | डाउनलोड |
योजनेचा अर्ज 2 | डाउनलोड |
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्ता | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |