असाध्यरोग उपचार सहायता:
उद्दिष्ट व स्वरूप: कामगार किंवा त्यांच्या कुटुंबातील पत्नी, मुलगा, मुलगी, आईवडील यांना मूत्रपिंड, कर्करोग, हृदयरोग, एड्स, क्षय, यांसारख्या असाध्य आजार व शस्त्रक्रियेसाठी सदर योजनेच्या माध्यमातून औषधोपचाराकरिता आर्थिक मदत देण्यात येते.
लाभाचे स्वरूप:
रुग्णांचा झालेला खर्च | आर्थिक साहाय्य |
10,000/- रुपये ते 25,000/- रुपये पर्यंत | 5,000/- रुपये |
25,001/- रुपये ते 50,000/- रुपये पर्यंत | 10,000/- रुपये |
50,001/- रुपये ते 75,000/- रुपये पर्यंत | 15,000/- रुपये |
75,001/- रुपये ते 1,00,000/- रुपये पर्यंत | 20,000/- रुपये |
1,00,000/- पेक्षा जास्त खर्च | 25,000/- रुपये |
अपघात विकलांग झालेल्या कामगारास आर्थिक मदत:
- उद्दिष्ट व स्वरूप: या योजनेमध्ये कंपनीतून घरी किंवा घरून कंपनीत जाताना एखादा कामगार अपघातात सापडून त्यास विकलांगता आल्यास किंवा त्यांच्या शरीराचा कोणताही भाग अपंग झाल्यामुळे उपजीविकेचे कोणतेही काम करण्यास असमर्थ झालेल्या अशा कामगारांना मदत देण्याची योजना आहे.
- लाभाचे स्वरूप: रुपये १० हजारापर्यंत आर्थिक मदत मंडळाकडून देण्यात येते.
आत्महत्या केलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना अर्थसाहाय्य:
- उद्दिष्ट व स्वरूप: कारखाने / गिरणी बंद झाल्याने आर्थिक दुरावस्थेमुळे आत्महत्या केलेल्या कामगाराच्या पत्नीस सदर योजनेद्वारे अर्थसहाय्य देण्यात येते.
- लाभाचे स्वरूप: या योजनेअंतर्गत रुपये १ लाख पर्यंतची मदत कामगार कुटुंबियांना देण्यात येते.
पत्ता | महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कल्याण आयुक्त यांचे कार्यालय हु. बा. गे. मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन सेनापती बापट मार्ग प्रभादेवी रेल्वे स्टेशन जवळ मुंबई ४०००१३ |
दूरध्वनी क्र | ०२२-६९३२८१११ / ६९३२८११८/६९३२८१८१ |
ई-मेल | mlwbconteeg[at]gmail[dot]com |
संकेतस्थळ | public.mlwb.in |