इंग्रजी व विदेशी भाषा संभाषण / लेखन प्रशिक्षण:
कामगार व कामगार कुटुंबियांना रोजगारभिमुख विदेशी भाषांचे लेखन व संभाषणासाठी आवश्यक ज्ञान व्हावे याकरिता मंडळाने हा उपक्रम नव्यानेच सुरु केला आहे. या वर्गात इंग्रजी, फ्रेंच, जॅपनीज, जर्मन, रशियन, चायनीज या भाषांचे प्रशिक्षण देण्यात येते. सदर प्रशिक्षणाचा कालावधी तीन ते सहा महिन्यांचा आहे. माफक शुल्कात संबंधित क्षेत्रातील ताज्ञामार्फत विद्यार्थ्यांना विदेशी भाषांचे संभाषण व लेखन प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच व्यक्तिमत्व विकासावरही विशेष लक्ष दिले जात आहे. मंडळाच्या राज्यभरातील १९ गट कार्यालयाच्या स्तरावर हे वर्ग सुरु आहेत.
वाहन चालक प्रशिक्षण:
वार्षिक उत्पन्न एक लाख ऐंशी हजार आहे अशा अल्प उत्पन्न गटातील कामगारांच्या पाल्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता चार चाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या करिता नाममात्र रु. ५००/- प्रशिक्षण शुल्क आकारण्यात येते. मारुती सुझुकी या नामवंत संस्थेच्या मदतीने हे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण कालावधी २१ दिवसांचा असतो. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थींना शिकाऊ वाहन चालक परवाना दिला जातो. शैक्षणिक पात्रता किमान इयत्ता ८ वी ते कमाल १२ वी असावी. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, औरंगाबाद, बारामती, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, नाशिक, जळगाव, अमरावती, पुणे व आदी महत्वाच्या शहरामध्ये हे वर्ग सुरु आहेत.
रोजगाराभिमुख प्रशिक्षण:
कामगार पाल्यांना रोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी याउद्देशाने टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस(टीसीएस) या संस्थेमार्फत विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणामध्ये इंग्रजी संभाषण, मुलाखत कौशल्य, व्यक्तिमत्व विकास आणि संगणक ज्ञान यांचा समावेश असतो. [प्रशिक्षण कालावधी २० ते २५ दिवसांचा असतो. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस मार्फत मुलाखत घेऊन उत्तीर्ण विद्यार्थांना रुपये १२ ते १५ हजारापर्यंत मासिक उत्पन्नाची नोकरी देण्यात येते. पदवीच्या शेवटच्या वर्षात अथवा पदवीधर किंवा समक्षक शैक्षणिक पात्रता असलेला कामगार पाल्य या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतो.
पत्ता | महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कल्याण आयुक्त यांचे कार्यालय हु. बा. गे. मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन सेनापती बापट मार्ग प्रभादेवी रेल्वे स्टेशन जवळ मुंबई ४०००१३ |
दूरध्वनी क्र | ०२२-६९३२८१११ / ६९३२८११८/६९३२८१८१ |
ई-मेल | mlwbconteeg[at]gmail[dot]com |
संकेतस्थळ | public.mlwb.in |