कामगार साहित्य संमेलन:
साहित्यविषयक कलागुण जोपासणाऱ्या नवोदित कामगार लेखक / कवी / साहित्यिक आणि सर्वसाधारण कामगार वर्ग यांच्यासाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून सन १९९२ पासून कामगार साहित्य संमेलन हा उपक्रम मंडळाने सुरू केला. पहिले कामगार साहित्य संमेलन कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे संपन्न झाले. साहित्य संमेलनात साहित्य दिंडी, साहित्य विषयक प्रदर्शन, विविध प्रबोधनात्मक विषयावर मान्यवर वक्त्यांचे परिसंवाद, कथाकथन, निमंत्रितांचे कवी संमेलन, नवोदित कामगार कवीचे कवी संमेलन आदि कार्यक्रमांचा अंतर्भाव असतो.
कामगार साहित्य लेखन स्पर्धा:
कामगारांच्या साहित्यिक कलागुणांना वाव देण्यासाठी मंडळाच्या वतीने सदर स्पर्धा आयोजित केली जाते. यात कथा (हरी नारायण आपटे पुरस्कार), कविता (नारायण सुर्वे पुरस्कार), कांदबरी (अण्णाभाऊ साठे पुरस्कार), वैचारिक लेख (लोकहितवादी पुरस्कार), नाटक (मामा वरेरकर पुरस्कार), एकांकिका (ग. त्र्य. माडखोलकर पुरस्कार) अशा सहा विभागात स्पर्धा घेण्यात येते. कामगार साहित्य संमेलनात विजयी स्पर्धकांना गौरविण्यात येते.
कवी संमेलन:
कामगारांच्या साहित्य विषयक कलागुणांना चालना मिळावी या उद्देशाने गटस्तरावर कवी संमेलनाचे आयोजन केले जाते. तसेच कामगार साहित्य संमेलनात नवोदित कामगार कवीचे कवी संमेलन व निमंत्रित कवी संमेलनाच्या माध्यमातून व्यासपीठ निर्माण करून दिले जाते.
साहित्य प्रकाशन अनुदान योजना:
कामगारांच्या साहित्य विषयक सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांच्याकडून चांगले साहित्य निर्माण व्हावे या उद्देशाने सदर योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. कामगारांच्या प्रकाशित साहित्यासाठी रुपये १० हजार अनुदान दिले जाते.
पत्ता | महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कल्याण आयुक्त यांचे कार्यालय हु. बा. गे. मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन सेनापती बापट मार्ग प्रभादेवी रेल्वे स्टेशन जवळ मुंबई ४०००१३ |
दूरध्वनी क्र | ०२२-६९३२८१११ / ६९३२८११८/६९३२८१८१ |
ई-मेल | mlwbconteeg[at]gmail[dot]com |
संकेतस्थळ | public.mlwb.in |