औद्योगिक व व्यावसायिक कामगारांसाठी राज्यस्तरीय व महिलांसाठी खुली कबड्डी स्पर्धा:
मंडळाच्या वतीने औद्योगिक आणि व्यावसायिक पुरुष कर्मचा-यांसाठी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे 1994 पासून व महिलांसाठी खुल्या कबड्डी स्पर्धेचे सन 2000 पासून प्रतिवर्षी आयोजन केले जाते, स्पर्धेत भाग घेणारे पुरुष विभागातील संघ हे महाराष्ट्र कामगार कल्याण अधिनियम 1953 अन्वये कामगार कल्याण निधी भरणारे औद्योगिक कारखाने, उधोग धंदे व व्यावसायिक व्यवस्थापनेतील कामगारांचे असतात. महिलांसाठी हि अट शिथील करण्यात आलेली आहे.
कामगार केसरी व कुमार केसरी स्पर्धा:
मंडळाच्या वतीने औद्योगिक आणि व्यावसायिक कामगारांसाठी स्वतंत्र राज्यस्तरीय कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्पर्धकांची प्रवेशिका आस्थापनेमार्फत स्वीकारली जाते. कामगार व कुमार केसरी विजेत्यांना रोख पारितोषिकासह चांदीची गदा, मानाचा पट्टा व प्रशस्तीपत्र दिले जाते. कामगार केसरी, कुमार केसरी स्पर्धे व्यतिरिक्त पाच वजनी गटातही या स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्पर्धकांना कमीतकमी दराचा प्रवास खर्च व दैनिक भत्ता दिला जातो.
पत्ता | महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कल्याण आयुक्त यांचे कार्यालय हु. बा. गे. मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन सेनापती बापट मार्ग प्रभादेवी रेल्वे स्टेशन जवळ मुंबई ४०००१३ |
दूरध्वनी क्र | ०२२-६९३२८१११ / ६९३२८११८/६९३२८१८१ |
ई-मेल | mlwbconteeg[at]gmail[dot]com |
संकेतस्थळ | public.mlwb.in |