महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ शैक्षणिक योजना

सर्वसाधारण शिष्यवृत्ती:

उद्दिष्ट व स्वरूप: कामगार कुटुंबातील विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी पासून पुढील पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या कामगारांच्या पाल्यांना या योजनेचा लाभ मिळतो. मागील परीक्षेत किमान 60 किंवा अधिक गुण मिळणे आवश्यक आहे.

शिष्यवृत्तीचे स्वरूप:

इयत्ता 10वी ते 12वी2,000/- रुपये
इयत्ता 13वी ते 15वी2,500/- रुपये
पदव्युत्तर पदवी3,000/- रुपये
इयत्ता 10वी नंतरचे तांत्रिक/वैद्यकिय/अभियांत्रिकी2,500/- रुपये
इयत्ता 12वी नंतरचे डिग्री कोर्स तांत्रिक/वैद्यकिय/अभियांत्रिकी5,000/- रुपये

क्रीडा शिष्यवृत्ती:

उद्दिष्ट व स्वरूप: कामगार किंवा कामगार कुटुंबिय यांना राज्यस्तरीय, राट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवल्यास शिष्यवृत्ती देण्याची योजना आहे.

शिष्यवृत्तीचे स्वरूप:

राज्यस्तरावरराष्ट्रीयस्तरावरआंतरराष्ट्रीय स्तरावर
प्रथम: 5,000/- रुपयेप्रथम: 7,000/- रुपये15,000/- रुपये
द्वितीय: 3,000/- रुपयेद्वितीय: 5,000/- रुपये
तृतीय: 2,000/- रुपयेतृतीय: 3,000/- रुपये

परदेशी उच्चशिक्षण शिष्यवृत्ती:

  • उद्दिष्ट व स्वरूप: कामगार कुटुंबातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणासाठी वार्षिक परीक्षेत किमान 60 किंवा अधिक गुणांना उतीर्ण झालेल्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना आहे. सदर योजनेचा लाभ एका विद्यार्थ्यास एकदाच दिला जातो.
  • शिष्यवृत्तीचे स्वरूप: 50,000/- रुपये

पाठ्यपुस्तकअर्थसहाय्य:

  • उद्दिष्ट व स्वरूप: कामगार कुटुंबातील विद्यार्थांना इयत्ता ११ वी पासून पदवी, पद्व्युत्तर पदवी तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी, आय.टी.आय इ . अभ्यासक्रमांच्या क्रमिक पाठ्यपुस्तक खरेदीस ५० टक्के रक्कम अर्थसहाय्य म्हणून देण्याची योजना आहे. वार्षिक उत्पन्न रुपये ३,००,०००/ – च्या आत आहे अश्या कामगार कुटुंबिय विद्यार्थांना लाभ घेता येईल.
  • लाभाचे स्वरूप: इयत्ता 10वी / 12वी अभीयांत्रिकी (डिप्लोमा/ डिग्री), तांत्रिक, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 2500/- रुपयांपर्यंत व इतर वर्गासाठी 1500/- रुपयांपर्यंत अर्थ सहाय्य दिले जाते.

एमएस-सीआयटी प्रोत्साहनपर अनुदान:

  • उद्दिष्ट व स्वरूप: महाराष्ट्र शासनाच्या एमएस-सीआयटी परीक्षेची उपयुक्तता/ अनिवार्यता लक्षात घेऊन एमएस-सीआयटी परीक्षा 60 टवके किवा अधिक गुणांनी उतीर्ण होणाऱ्या कामगार/ कामगार कुटुंबियांना (मुलगा, मुलगी, पत्नी) या योजनेद्वारे अर्थसहाय्य दिले जाते.
  • लाभाचे स्वरूप: एमएससीआयटी शुल्काच्या 50 टक्के रक्कम या योजनेअंतर्गत लाभार्थीना देण्यात देते. अपंगांना 100 टक्के अर्थसहाय्य दिले जाते.

स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थांसाठी अर्धसहाय्य:

  • MPSC स्पर्धा परीक्षेचा पहिला टप्पा (पूर्व परीक्षा) उत्तीर्ण होणाऱ्या कामगार कुटुंबिय पाल्यांना या योज़नेअंतर्गत अर्थसहाय्य दिले जाते.
  • लाभाचे स्वरूप: 5000/- रुपये
  • UPSC स्पर्धा परीक्षा पहिला टप्पा (पूर्व परीक्षा) उत्तीर्ण होणा-या कामगार कुटुंबीय पाल्यांना या योज़नेअंतर्गत अर्थसहाय्य दिले जाते.
  • लाभाचे स्वरूप: 8000/- रुपये

शासनमान्य ग्रंथपालन प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्ग:

कामगार व कामगार कुटुंबातील मुलांमुलींकरिता मुंबई, ठाणे, चिपळूण, पुणे, नाशिक, सोलापुर, औरंगाबाद, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर इ. ठिकाणी शासनमान्य “ग्रंथपालन प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्ग” दरवर्षी आयोजित केले जातात.

पत्तामहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ
कल्याण आयुक्त यांचे कार्यालय
हु. बा. गे. मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन
सेनापती बापट मार्ग
प्रभादेवी रेल्वे स्टेशन जवळ
मुंबई ४०००१३
दूरध्वनी क्र०२२-६९३२८१११ / ६९३२८११८/६९३२८१८१
ई-मेलmlwbconteeg[at]gmail[dot]com
संकेतस्थळpublic.mlwb.in