महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याणकारी कार्यक्रम

मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत कामगार कल्याण निधीची वर्गणी भरणाऱ्या कामगार व कामगार कुटुंबियांसाठी मंडळाचे कल्याणकारी कार्यक्रम खलीलप्रमाणे.

रोजगार, स्वयंरोजगारवव्य व सायप्रशिक्षण:

कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी विभागीय व गट कार्यालयांच्या स्तरावर “व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे” प्रतिवर्षी आयोजन करण्यात येत असते. या शिबिरात सहभागी होणाऱ्या शिबिरार्थींना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आदी ठिकाणच्या तज्ज्ञ व्यक्तींना निमंत्रित करण्यात येते. त्यांच्याकडून विविध उद्योग तसेच लघु व गृह उद्योगांच्या संदर्भात शिबिरार्थीना सविस्तर माहितीपूर्ण मार्गदर्शन करण्यात येते.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानमाला:

युपीएससी, एमपीएससी या स्पर्धा परीक्षेत बसलेल्या कामगारांच्या पाल्यांकरिता मंडळाच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तिंना निमंत्रित करून विध्यार्थ्याना मार्गदर्शन दिले जाते.

गुणवत्ताप्राप्त कामगारांचेपाल्य / पालक व गुणवंतचा सत्कार:

माध्यमिक व उच्च माध्यमिक (१० वी व १२ वी) परीक्षेत सर्वोत्कृष्ट गुण मिळवून उतीर्ण झालेल्या कामगार पाल्य, पालक आणि गुरुजनांचा सत्कार समारंभ प्रतिवर्षी महाराष्ट्रातील सर्व विभागीय स्तरावर आयोजित करण्यात येतो. यामध्ये कामगार कुटुंबिय पाल्यांना रुपये ५०००/- ची विशेष शिष्यवृत्ती देण्यात येते.

माध्यमिक शालांत परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी उजळणी वर्ग:

कामगार कुटुंबातील विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत परीक्षा सुलभ जावी व परीक्षा तंत्रातील योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून मंडळाच्या वतीने जानेवारी ते मार्च या कालावघीत महाराष्ट्रतील १८ गट कार्यालयांच्या स्तरावर माध्यमिक शालांत परीक्षा विद्यार्थ्यांसाठी उजळणी वर्गाचे तज्ज्ञ शिक्षकांच्या सहकार्याने आयोजन करण्यात येते.

“शालांत परीक्षेनंतर पुढे काय?” प्रदर्शन व व्याख्यानमाला:

माध्यमिक शालांत परीक्षा उतीर्ण झाल्यानंतर मुलांना पुढील शिक्षण / व्यवसाय याबाबत मार्गदर्शन दिले जाते.

पत्तामहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ
कल्याण आयुक्त यांचे कार्यालय
हु. बा. गे. मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन
सेनापती बापट मार्ग
प्रभादेवी रेल्वे स्टेशन जवळ
मुंबई ४०००१३
दूरध्वनी क्र०२२-६९३२८१११ / ६९३२८११८/६९३२८१८१
ई-मेलmlwbconteeg[at]gmail[dot]com
संकेतस्थळpublic.mlwb.in