महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याणकारी उपक्रम

महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत कामगार कल्याण निधीची वर्गणी भरणाऱ्या कामगार व कामगार कुटुंबियांसाठी मंडळाचे कल्याणकारी उपक्रम

शिशुमंदिर:

कामगार कल्याण विभागात बाल कल्याणाची पहिली मुहुर्तमेढ शिशुसंस्कार शाळा सन १९४० मध्ये ललित कला भवन, डिलाईल रोड येथे रोवली गेली. शिशुमंदिर हा मंडळाचा एक महत्वाचा उपक्रम असून या उपक्रमांतर्गत शिशुमंदिर बालकांना मराठी बरोबर इंग्रजी विषयाचेही शिक्षण देण्यात येते. शिशुमंदिरातील मुलांना दररोज सकस आहार, मोफ़त गणवेश पुरविण्यात येतो. माहे सेप्टेंबर व डिसेंबर या महिन्यात बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांकडून बालकांची वैद्यकिय तपासणी केली जाते. निसर्गरम्य ठिकाणी मुलांची शैक्षणिक सहल आयोजित करण्यात येते.

शिवणवर्ग / हस्तकला वर्ग:

केंद्र परिसरातील कामगार कुटुंबिय महिलांसाठी शिवण व हस्तव्यवसाय वर्ग चालविण्यात येतात.काही ठिकाणी शासनमान्य शिवण वर्गही सुरू करण्यात आलेले आहेत. नाममात्र प्रवेश शुल्कभरून या वर्गात प्रवेश दिला जातो. परीक्षेत प्रथम येणाऱ्या कामगार कुटुंबिय महिलेस मंडळाच्यावतीने अनुदान तत्वावर शिवणयंत्र देण्यात येते.

फॅशनडिझायनिंग / सौदर्य शास्त्र प्रशिक्षण:

सध्या काळाची गरज लक्षात घेऊन महिलांना स्वतःचा उघोग सुरू करता यावा यासाठी सौंदर्य शास्त्र व फॅशन डिझायनिग (बेसिक) प्रशिक्षणाचे आयोजन मंडळ सातत्याने करीत आहे. गट स्तरावर सर्व ठिकाणी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येतात.

वाचनालय / ग्रंथालय:

कामगार कुटुंबियांना वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांना आजूबाजूला घडणा-या विविधघटनांची व जगातील दैनंदिन घडामोडीची माहिती व्हावी, त्यांच्यामध्ये असलेली वाचनाची आवडव गोडी तसेच जिज्ञासा वाढीस लागावी या उद्देशाने राज्यातील प्रत्येक केंद्रात वाचनालय तसेचजागेच्या उपलब्धतेनुसार केंद्रांमध्ये ग्रंथालय व ज्ञानसंवर्धन विभाग चालविण्यात येतो.

अभ्यासिका:

आजच्या धकाधकीच्या जीवनात विद्यार्थांना अभ्यासासाठी निवांतपणा मिळणे जीकिरीचे झाले आहे. म्हणून मंडळाच्या वतीने कामगारांच्या पाल्यांना गर्दी-गोंगाटापासून शांत ठिकाणी अभ्यासावर लक्ष केंद्रित करता यावे याकरिता कामगार कल्याण भवन व ललित कला भवन येथे अभ्यासिका सुरू केलेल्या आहेत. अभ्यासिकेतील सभासदांकरिता स्पर्धा परीक्षांची पुस्तकेही उपलब्ध करून देण्यात येतात.

संगणकप्रशिक्षण:

मंडळाच्या वतीने कामगार कल्याण भवन, ललित कला भवन व कामगार कल्याण केंद्रातून जागेच्या उपलब्धतेनुसार) कामगार व कामगार कुटुंबियांसाठी माफक शुल्कात संगणक प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या प्रशिक्षण वर्गातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे संगणकीय प्रोग्रामिंग, डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टिम, टॅली, डीटीपी, इंटरनेट, कोरल ड्रॉ, फोटोशॉप, एमएस-सीआयटी(MS-CIT) आदी विविध बिषयांचा अभ्यासक्रम शिकविण्यात येतो.

आरोग्यधाम:

मंडळाच्या वतीने कामगार कल्याण भवन / ललित कला भवन या ठिकाणी व काही प्रमुख कामगार कल्याण केंद्रात आरोग्यधाम (व्यायामशाळा) सुरू केलेल्या अहेत. यात नाममात्र प्रवेश शुल्क भरून प्रवेश दिला जातो. व्यायामशाळे‌‍मध्ये मंडळाच्या वतीने प्रशिक्षक नियुक्त केले जातात.

योगावर्ग:

योगा ही आजच्या जीवनाची एक महत्वपूर्ण प्रणाली म्हणून विकसित होत आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ या क्षेत्रातील तज्ज्ञ व अनुभवी संस्थांच्या सहकार्याने योगा वर्गाचे आयोजन राज्यातील महत्वाच्या कामगार कल्याण केंद्रांतून करत आहे.

कराटेवर्ग:

कामगारांच्या पाल्यांना स्वसंरक्षणाचे धडे गिरविता यावे याकरिता मंडळाच्या वतीने नाममात्र प्रवेश शुल्क आकारून कराटे प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहे.

​संगीतवर्ग:

कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये उपजतच असलेले संगीतबिषयक सुप्त कलागुण अधिक विकसित व्हावेत आणि या क्षेत्रातील मार्गदर्शन मिळावे या हेतूने मंडळाच्या वतीने संगीत वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत. या वर्गातील सभासदांना सूरपेटी, तबला-डग्गा व तत्सम वाद्यांच्या माध्यमातून तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन केले जाते.

पत्तामहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ
कल्याण आयुक्त यांचे कार्यालय
हु. बा. गे. मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन
सेनापती बापट मार्ग
प्रभादेवी रेल्वे स्टेशन जवळ
मुंबई ४०००१३
दूरध्वनी क्र०२२-६९३२८१११ / ६९३२८११८/६९३२८१८१
ई-मेलmlwbconteeg[at]gmail[dot]com
संकेतस्थळpublic.mlwb.in
कामगार योजना लिस्ट