गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार:
साहित्य, समाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आदी क्षेत्रातील विशेष योगदानासाठी सन 1978-79 पासून मंडळाकडून गुणवंत कामगार पुरस्कार कामगारांना दिला जातो. कंपनीत कमीत कमी 5 वर्ष सेवा झालेल्या कामगारांस या पुरस्कारासाठी अर्ज करता येतो. प्राप्त अर्जातून नियम व अटीची पूर्तता केलेल्या तसेच मुलाखतीमध्ये मिळालेल्या गुणवत्तेनुसार 51 अर्जदारांची गुणवंत कामगार पुरस्कारासाठी निवड केली जाते.
पुरस्कार स्वरूप: 15,000/- रुपये स्मुतीचिन्ह व मानपत्र.
कामगार भूषण पुरस्कार:
गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्यानंतर पुढील दहा वर्षे साहित्य, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आदी क्षेत्रात योगदान देणाऱ्या कामगारास कामगार भूषण पुरस्कार मंडळ सन 2000 पासून प्रदान करीत आहे.
पुरस्कार स्वरूप: 25,000/- रुपये स्मुतीचिन्ह व मानपत्र.
रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार:
समर्पित वृत्तीने कार्य करणाऱ्या व्यक्ती / संस्थाना अशा पुरस्कारासाठी अर्ज करायला लावणे उचित नसल्याने समाजातील विविध स्तरातील मान्यवर, उद्योग संस्था, कामगार संघटना यांच्याकडून विहित नमुन्यात माहिती मागवून या कार्यालयास प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे गुणवत्तेनुसार पुरस्कारार्थी संस्था व व्यक्तीची निवड कली जाते. हा पुरस्कार सन 2000 पासून मंडळ प्रदान करीत आहे.
पुरस्कार स्वरूप: 51,000/- रुपये (व्यक्ती), 51,000/- रुपये (संस्था), स्मुतीचिन्ह व मानपत्र
पत्ता | महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कल्याण आयुक्त यांचे कार्यालय हु. बा. गे. मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन सेनापती बापट मार्ग प्रभादेवी रेल्वे स्टेशन जवळ मुंबई ४०००१३ |
दूरध्वनी क्र | ०२२-६९३२८१११ / ६९३२८११८/६९३२८१८१ |
ई-मेल | mlwbconteeg[at]gmail[dot]com |
संकेतस्थळ | public.mlwb.in |