मंडळाचे ध्येय:
महाराष्ट्र राज्यात समाजाच्या विविध घटकातील नोंदणीकृत कामगारांना कल्याणकारी योजना, कार्यक्रम व सुविधा पूरवून त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे जीवनमान उंचावणे, मंडळाच्या कल्याणकारी योजनांद्वारे त्यांची सामाजिक, सांस्कृतीक, शैक्षणिक, आर्थिक वा मानसिक उन्नती घडविणे.
मंडळाचे कार्य:
- कामगार वा कामगार कुटुंबियांकरिता कल्याणकारी सेवा उपलब्ध करुन देणे.
- उत्तम खेळ व क्रीडा सुविधा
- अद्यावत ग्रंथालय व वाचनालय
- आधुनिक शैक्षणिक सुविधा
- सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन
- रोजगार व स्वयंरोजगार विषयक कार्यक्रम
- आरोग्य विषयक कार्यक्रम
- इतर आधारित सेवा
कामगार, मालक व शासन अशी द्विपक्षीय वर्गणी 6 महिन्यातून एकदा मंडळाला मिळते. सदर वर्गणी माहे जून व माहे डिसेंबरच्या वेतनातून कपात करण्यात येते. “कारखाने अधिनियम 1948” अंतर्गत येणारे सर्व कारखाने तसेच “बॉंम्बे शॉप्स अँन्ड एस्टब्लिशमेंट अँक्ट 1948” अंतर्गत येणारी सर्व दुकाने व आस्थापना (ज्यामध्ये 5 किंवा जास्त कामगार काम करीत आहेत) “मोटार वाहतूक कामगार कायद्यांतर्गत येणारे कामगार या सर्वाकडून मंडळाला खालीलप्रमाणे अंशदान मिळते.
योगदानाचे जुने दर खालील प्रमाणे:
तपशील | कामगार | मालक | शासन |
अ) दरमहा 3,000/- रुपये पर्यंत पगार घेत असलेले कामगार | 6/- रुपये | 18/- रुपये | 12/- रुपये |
ब) दरमहा 3,000/- रुपयांपेक्षा अधिक पगार घेत असलेले कामगार | 12/- रुपये | 36/- रुपये | 24/- रुपये |
योगदानाचा सुधारित दर जून 2024 पासून लागू: सहामाही अंशदान दर
कामगारांचे अंशदान प्रती कामगार | मालकांचे अंशदान प्रती कामगार | शासन अंशदान प्रती कामगार |
25/- रुपये | 75/- रुपये | 50/- रुपये |
- दंडार्थ मिळणारी व्याजाची रक्कम
- मंडळास मिळणाऱ्या कोणत्याही ऐच्छिक देणग्या
- वळती केलेली कोणतीही निधीची रक्कम
- कर्जाऊ घेतलेली रक्कम
- शासनाकडून कर्ज किंवा मदत म्हणून मिळालेली रक्कम
सदर निधीचा खालील प्रमाणे उपयोग केला जातो:
- वाचनालये व ग्रंथालये यांचा समावेश असणारी सामुदायिक आणि सामाजिक शिक्षण केंद्राची सोय.
- शिशु मंदिरे, शिशु संगोपनालये, अभ्यासिका इत्यादीद्वारे सामुदायिक गरजांकरिता तरतुद
- खेळ व खेळस्पर्धा (शरीरसंवर्धन इ.)
- सहली, सफरी
- मनोरंजनात्मक व इतर करमणुकीचे कार्यक्रम
- कामगार वर्गातील स्त्रियांसाठी व बेरोजगारांसाठी स्वयंरोजगार शिबिर व व्यवसाय प्रशिक्षण केंद्र
- सामाजिक स्वरूपाचे सामुदायिक कार्यक्रम.
- कामगारांची सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी तसेच त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी
मंडळातील केंद्राचे वर्गीकरण:
अ) कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी, मुंबई:
कामगार कल्याण मंडळाचे पहिले सुसज्ज बहुउद्देशीय असे कामगार क्रीडा भवन असून या भवनांचे उदघाटन तत्कालीन राष्ट्रपती श्री. व्ही. गिरी यांचा शुभहस्ते दि. १८ ऑगस्ट १९७१ रोजी झाले. ह्या वास्तूमध्ये ऑलंपीक दर्जा जलतरण तलाव खुला रंगमंच कब्बडी, ऍथलेटिकस इ. मैदानी खेळांसाठी क्रीडांगण, व्योमशाला योगवर्ग, बंदिस्त बॅडमिंटन कोर्ट, टेबलं टेनिस कोर्ट व इतर अंतर्गृह खेळ, सुसज्ज ग्रंथालय, अभ्यासिका, समिती सभागृह, पुरुष व स्त्रीयांसाठी शिवणीवर्ग, शिशुमंदिर इ. सुविधा आहेत.
ब) कामगारकल्याणभवन, राजे रघुजी नगर, नागपुर:
हा मंडळाचा दूसरा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या प्रकल्पात जलतरण तलाव, व्यायामशाला, ग्रंथालय, आभासिका, संगणक प्रषिषण वर्ग, सरकार मान्य व मंडळाचा शिवण वर्ग, फैशन डिज़ायनिंग, शिशुमंदिर, टेबल टेनिस, योगावर्ग, स्वयंरोजगार प्रशिक्षण, समिति सभागृह ईत्यादी सुविधा आहेत.
क) कामगार कल्याण भवन, सहकर नगर पुणे:
हा मंडळाचा तीसरा प्रकल्प असून या ठिकाणी जलतरण तलाव, व्यायामशाळा, ग्रंथालय, अभ्यासिका, संगणक प्रशिक्षण वर्ग, सरकार मान्य मंडळाचा शिवण वर्ग, फैशन डिज़ायनिंग, शिशुमंदिर, टेबल टेनिस, योगावर्ग, स्वयंरोजगार प्रशिक्षण, समिति सभागृह ईत्यादी सुविधा आहेत.
कामगार कल्याण भवन / ललित कला भवन:
विविध मैदानी खेळातील आवश्यक असलेल्या मोकळ्या मैदानात योग्य बांधणीची ईमारत, त्यात बैठ्या व मैदानी खेळाची सोय, तसेच व्यायामशाळा, कुस्तीचे आखाड़े, वाचनालय, ग्रंथालय, अभ्यासिका, शिवणवर्ग, शिशुमंदिर, बालसंगोपन, खुले नाट्यगृह, संगीतवर्ग इ. उपक्रम राबविले जातात.
कामगार कल्याण केंद्र:
स्वमालकीचा अथवा भाड्याने घेतलेल्या जागेत सुरु केलेल्या ह्या केंद्रातून प्रामुख्याने आंतरगृह खेळ, मैदानाची सोय असल्यास मैदानी खेळ, शैक्षणिक इ. उपक्रम राबविले जातात.
कामगार वसाहतीतील कल्याणकार्य:
सर्वच कामगार वसाहतीत जागेच्या व आर्थिक अडचणीमुळे कामगार कल्याण केंद्र उघडणे मंडळाला शक्य होत नाही. अशा ठिकाणी मनोरंज़नात्मक, शैक्षणिक, खेळ व स्पर्धा असे कल्याणकारी कार्यक्रम राबविण्यात येतात. वर्षभरात साधारणपणे ४ प्रासंगिक स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करून मंडळाच्या कल्याणकारी कार्याचा फायदा या वसाहतीतील कामगार व त्यांच्या कुटुंबियांना मिळवून देण्यात येतो.
पत्ता | महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कल्याण आयुक्त यांचे कार्यालय हु. बा. गे. मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन सेनापती बापट मार्ग प्रभादेवी रेल्वे स्टेशन जवळ मुंबई ४०००१३ |
दूरध्वनी क्र | ०२२-६९३२८१११ / ६९३२८११८/६९३२८१८१ |
ई-मेल | mlwbconteeg[at]gmail[dot]com |
संकेतस्थळ | public.mlwb.in |
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |