सोप्या भाषेत सांगायचे झाले तर असंघटित कामगार म्हणजे जे कुठल्याही संघटनेचे सदस्य नाहीत.
बहुतांश क्षेत्रात काम करणारे कामगार हे मुख्यतः 2 गटात विभागले जातात त्यामधील पहिला गट म्हणजे संघटित कामगार आणि दुसरा म्हणजे असंघटित कामगार.
संघटित कामगार
संघटित कामगार हे एखाद्या संघटनेचे सदस्य असतात व ती संघटना कामगारांच्या हक्कासाठी, मालकाकडून कामगारांवर होणारा अन्याय, वेतन वाढ तसेच त्यांना विविध फायदे मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. कामगारांसाठी हि कामगार संघटना विविध योजनांचा लाभ देते.
- योग्य पगार / पगार वाढ : एखाद्या कामगाराला त्याच्या कामानुसार योग्य पगार मिळवून देते.तसेच दरवर्षी पगार वाढवून मिळावा यासाठी प्रयत्न करते.
- सुरक्षित वातावरण: बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना कठीण परिस्थितीत काम करावे लागते तसेच त्यांना विविध अपघातांना सामोरे जावे लागते ज्यामध्ये त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो अशा परिस्थितीत कामगार संघटना अशा कामगारांना कामाच्या ठिकाणी योग्य प्रकारचे संरक्षण मिळवून देण्यासाठी मदत करते.
- कामगारांचे हक्क: कामगार संघटना कामगारांच्या विविध हक्कासाठी तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देते.
- कामाचे तास / योग्य मोबदला: मालक हे कामगारांना ठरवून दिलेल्या कामाच्या तासापेक्षा जास्त काम करून घेतात व त्याचा त्यांना कुठल्याच प्रकारचा मोबदला दिला जात नाही त्यामुळे कामगार संघटना कामगारांवर होणाऱ्या या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यास मदत करते व कामगारांना त्यांनी केलेल्या जास्तीच्या कामाचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी मदत करते.
असंघटित कामगार म्हणजे काय?
असंघटित कामगार हे विविध क्षेत्रात काम करतात परंतु ते कुठल्याही संघटनेचे सदस्य नसतात.जसे की:
- शेतकरी
- शेतमजूर
- बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार
- लहान उद्योग/कारखान्यामध्ये काम करणारे मजूर
- सेवा
- घरकाम काम करणारे कामगार
- विक्री
- रिक्षाचालक
- फेरीवाले
- इत्यादी
असंघटित कामगारांना अनेकदा कमी वेतन, कमी सुरक्षा आणि कमी फायदे मिळतात. त्यांना कामाच्या ठिकाणी वाईट वागणूक आणि मालकाकडून शोषणाचा सामना करावा लागतो.
असंघटित कामगारांची वैशिष्ट्ये:
- असुरक्षित रोजगार: त्यांच्याकडे कायमस्वरूपी रोजगार नसतो आणि त्यांना कामातून काढून टाकण्याचा धोका जास्त असतो.
- कमी वेतन: त्यांना कमी वेतनावर काम करावे लागते आणि कमी फायदे मिळतात.
- दीर्घ कामकाजाचा वेळ: त्यांना अनेकदा दीर्घ तास काम करावे लागतात आणि त्यांना अतिरिक्त वेतन देखील दिले जात नाही.
- असुरक्षित कामाचे वातावरण: त्यांना धोकादायक आणि असुरक्षित कामाच्या वातावरणात काम करावे लागते.
- सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य विमा यांचा अभाव: त्यांना सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य विमा यांचा लाभ मिळत नाही.
असंघटित कामगारांच्या समस्या
- कमी वेतन: असंघटित कामगार हे कमी पगारात काम करतात.
- जास्त वेळ काम: असंघटित कामगारांच्या हक्कासाठी कोणी भांडणारे नसल्यामुळे मालक त्यांच्याकडून जास्तीचे काम करून घेतात व त्या जास्तीच्या कामाचा त्यांना योग्य मोबदला देखील देत नाहीत.
- कामाचे वातावरण : असंघटित कामगारांना धोकादायक वातावरणात काम करावे लागते व त्यांच्या हक्कासाठी बोलणारे सुद्धा कोणी नसते.
- विमा सुरक्षा: असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना कुठल्याच प्रकारचे विमा संरक्षण दिले जात नाही त्यामुळे एखाद्या कामगाराला कामाच्या ठिकाणी इजा झाल्यास किंवा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना कुठल्याच प्रकारचे विमा संरक्षण मिळत नाही ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाला विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
- शोषण: असंघटित कामगारांचे मालक आणि नियोक्तांकडून शोषण होण्याची शक्यता जास्त असते.
- भेदभाव: लिंग, जात, धर्म आणि सामाजिक-आर्थिक स्थितीवर आधारित भेदभावाचा सामना करावा लागण्याची शक्यता जास्त असते.
- कामगार कायद्यांचा अभाव: त्यांना कामगार कायद्यांचा लाभ मिळत नाही तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होत नाही.
- संगठनाचा अभाव: त्यांच्याकडे सामूहिकरित्या आपले हक्क मांडण्यासाठी आणि चांगल्या कामाच्या परिस्थितीसाठी लढण्यासाठी कोणतीही संघटना नसते.
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |