अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी)
अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारास त्याचे हक्काचे घर बांधण्यासाठी किंवा घराचे नवीनीकरण/दुरुस्तीसाठी 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात येते.
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कामगाराला अर्ज करणे आवश्यक आहे.
योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ
- अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) अंतर्गत 2 लाखांचे आर्थिक सहाय्य
योजनेच्या अटी व शर्ती
- महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेंर्तगत लाभास पात्र असणारा गृहनिर्माण प्रकल्प महारेरा अधिनियम, 2016 अंतर्गत नोंदणीकृत असावा.
लाभार्थी कामगार हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत व योजनेंतर्गत पात्र असावा.
नोंदणीकृत कोणत्याही प्रकल्पातील घरकुल योजनेत सहभागी झाल्यास महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेंर्तगत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून देय प्रती लाभार्थी 2 लाख रुपये अनुदानास पात्र राहील. - योजनेच्या अंमलबजावणीसाठी निवडलेले कार्यक्षेत्र व अर्ज करणाऱ्या नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारास अर्ज करावयाचे कार्यक्षेत्र
- दिनांक 03 फेब्रुवारी 2018 च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेस मान्यता देण्यात आली असून सदर योजनेची अंमलबजावणी ही संचालक, राज्य अभियान संचालनालय (सुकाणू अभिकरण ) यांचे मार्फत करण्यात आलेली असून ही सुकाणू अभिकरण हे शहरी भागात कार्यरत आहे.
- सदर योजनेंर्तगत शहरी भागातील निवडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पातील सदनिकेसाठी त्याच जिल्ह्यातील नोंदणीकृत (सक्रिय) असलेले बांधकाम कामगार मागणी करु शकतील. मात्र मुंबई, नवी मुंबई व ठाणे क्षेत्रातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील परिघामधील प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेल्या सदनिकेसाठी मागणी करु शकतील.
सदनिका उपलब्ध असणाऱ्या प्रकल्पाची माहिती, पात्रता तपासणी व लाभार्थी निवड
- महारेरा अधिनियम 216 अन्वये नोंदणीकृत असलेल्या विकासकास प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर गृहनिर्माण प्रकल्पासाठी शासनाच्या वेगवेगळ्या विभागामार्फत सूट व सवलती देण्यात आलेल्या आहेत. त्यास अनुलक्षुन महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेंर्तगत शहरी भागातील प्रकल्पातील सदनिकेची किंमत, सदनिकेचे क्षेत्रफळ प्रमाणीत करणे, तसेच गृहनिर्माण प्रकल्पाचे स्थळ निश्चीत करुन त्याची यादी गृह निर्माण विभाग, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करेल. या यादीतील सदनिकेसाठी इच्छुक व पात्र होणा-या बांधकाम कामगारांची नावे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांनी संचालक, राज्य अभियान संचालनालयाकडे (सुकाणू अभिकरणास )सादर करावीत.
- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर प्रकल्पातील सदनिकांसाठी संचालक, राज्य अभियान संचालनालयाकडे (सुकाणू अभिकरणास ) प्राप्त झालेल्या अर्जापैकी नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांचे अर्ज, सदर अर्जाची पात्रता तपासण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे वर्ग करण्याची कार्यवाही संचालक, राज्य अभियान संचालनालय (सुकाणू अभिकरणास)यांनी करावी.
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने संचालक, राज्य अभियान संचालनालय यांचेकडे (सुकाणू अभिकरणास )सादर केलेल्या यादीतील नावातून लाभार्थी म्हणून निवड करण्याचे अधिकार व त्यासाठी आवश्यक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार सुकाणू अभिकरणास राहतील. सुकाणू अभिकरणाने सदनिका वाटपाकरिता अंतिम केलेला नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगार लाभार्थी म्हणून मंडळाच्या अनुदानास पात्र राहील.
अर्ज करण्यासाठी बांधकाम कामगाराची पात्रता
- दिनांक 03 फेब्रुवारी 2018 च्या शासन निर्णयान्वये जाहिर केलेल्या शहरी भागातील महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेतील सदनिकेसाठी अर्ज करण्यासाठी बांधकाम कामगारांची पात्रता खालील प्रमाणे राहील.
- शहरी भागातील महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार हा नोंदणीकृत (सक्रिय) असावा तथापि तो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सलग एक वर्षापेक्षा अधिक, बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असावा.
शहरी भागातील महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणुन निवडलेला बांधकाम कामगार हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील २ लक्ष अनुदानास पात्र आहे. मात्र सदर अनुदान संचालक, राज्य अभियान संचालनालय यांच्या अधिनस्त असलेल्या राज्य अभियान संचालनालयाकडे जमा करण्यात येईल.
बांधकाम कामगारांच्या नावे अथवा त्यांच्या पती/पत्नीच्या नावे स्वत:ची सदनिका नसेल असेच बांधकाम कामगार, शहरी भागातील महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील. तसे त्यांनी 100/- रुपये च्या मुद्रांकावर ( Stamp Paper) लेख प्रमाणक ( Notary) करुन देणे अनिवार्य राहील.
सदनिका प्राप्त झाल्यापासून पुढील पाच वर्षापर्यंत कोणत्याही प्रकारे बांधकाम कामगारास सदनिका हस्तांतरीत करता येणार नाही.
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत 2 लाखांचे आर्थिक सहाय्य
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वत:च्या जागेवर नवीन घर बांधण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) मंडळामार्फत 1,50000/- रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येते.
- योजनेअंतर्गत लाभार्थ्याने खरेदी केलेल्या जमीन व इतर तदनुषंगिक बाबींसाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येते.
- अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा (ग्रामीण) लाभ घेऊन घराचे बांधकाम पूर्ण करुन घर बांधणीच्या पूर्णत्वाचा दाखला देऊन अर्ज केलेला आहे अशा लाभार्थ्यास जमीन खरेदी व घरबांधणीच्या अनुषंगीक बाबीसाठी केलेल्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून 50,000/- रुपये पर्यंतचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात येते. हे मंजूर अर्थसहाय्य थेट लाभार्थ्यांच्या बँक बचत खात्यात जमा करण्यात येईल.
योजनेचे स्वरूप
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारापैकी ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांसाठी मंजुर अटल बांधकाम कामगार आवास योजनेचे (ग्रामीण) स्वरुप खालील प्रमाणे आहे.
- मंडळाकडील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वत:च्या / पती / पत्नीच्या नावावरील जागेवर नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी 1.50 लक्ष अनुदान महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून उपलब्ध करुन देण्यात येईल.
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर( MGNREGA) अनुज्ञेय असणारे 18000/- रुपये तसेच स्वच्छ भारत अभियानद्वारे शौचालय बांधण्यासाठी अनुज्ञेय असलेले 12000/- रुपये असे एकूण 30000/- रुपये अनुदान 1,50 लक्ष मध्ये समाविष्ट असल्याने संबधित योजनांचा दुबार लाभ देय राहणार नाही.
पात्र कामगार
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रीय) बांधकाम कामगारांनी अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) चा लाभ घेऊन घराचे बांधकाम पूर्ण करुन घरबांधणीच्या पूर्णत्वाचा दाखला सादर केला आहे असे बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून अर्थसहाय्य मिळण्यास पात्र राहतील.
घराचे क्षेत्रफळ
- अटल बांधकाम कामगार आवास योजना ( ग्रामीण ) अंतर्गत पात्र ठरलेल्या बांधकाम कामगारांनी किमान 269 चौ. फुट इतके चटई क्षेत्र असलेले घर बांधकाम करणे आवश्यक आहे. त्याकरिता रु. 1.50 ल्क्ष एवढे अनुदान देय राहील. मात्र लाभार्थ्यास त्यापेक्षा जास्त क्षेत्राचे बांधकाम स्व खर्चाने करण्यास मुभा राहील.
घराची रचना
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारापैकी ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेतील (ग्रामीण) घराची रचना खालील प्रमाणे आहे.
अ) संपूर्ण बांधकाम विटा, वाळू व सिमेंटचे असणे आवश्यक आहे. घरकुलामध्ये एक स्वयंपाकघर व बैठक हॉल यांचा समावेश असावा. शौचालय व स्नानघर बांधणे अनिवार्य राहिल.
आ) जोत्यापासून घराची उंची कमीत कमी 10 फूट असावी.
इ) छतासाठी स्थानिक गरजेनसार मजबूत लोखंडी किंवा सिमेंट पत्रे अथवा कौलांचा वापर करण्यास मुभा राहील.
ई) घराच्या दर्शनीभागावर मंडळाचे बोधचिन्ह (लोगो) लावणे आवश्यक आहे.
लाभार्थी पात्रता
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांपैकी ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा (ग्रामीण) लाभ प्रति कुटुंबासाठी असून त्याचा लाभ घेण्यासाठीची पात्रता खालील प्रमाणे आहे
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार हा नोंदणीकृत (सक्रिय) असावा तथापि अर्ज करतांना तो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सलग एक वर्षापेक्षा अधिक, बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असावा.
- नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांचे स्वत:च्या /पती / पत्नीच्या नावावर महाराष्ट्र राज्यात पक्के (सिमेंट, वाळूने बांधलेले) घर नसावे. तशा आशयाचे स्वयंघोषणापत्र/ शपथपत्र सादर करणे आवश्यक राहील.
- नोंदीत बांधकाम कामगारास पक्के घर बांधण्यासाठी स्वत:च्या / पती/पत्नीच्या नावे मालकीची जागा असावी अथवा मालकीचे कच्चे घर असलेल्या त्या ठिकाणी घर बांधता येईल.
- बांधकाम कामगारानी शासनाच्या इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनांचा लाभ घेतलेला नसावा. मंडळाकडील देय गृहकर्जावरील व्याज परतावा करीता अनुज्ञेय अर्थसहाय्याचा/ अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. याबाबत त्यांनी स्वयंघोषणापत्र / शपथपत्र सादर करणे आवश्यक राहील.
- अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा (ग्रामीण) लाभ प्रति कुटुंबासाठी आहे.
- एकदा लाभ घेतल्यानंतर बांधकाम कामगार पुनश्च: या योजनेच्या लाभास पात्र राहणार नाही.
- नोंदणीकृत (सक्रिय) बांधकाम कामगार हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या कायमस्वरुपी प्रतिक्षा यादीमध्ये (PWL) समाविष्ट नसावा.
अर्ज करण्याची व त्याची छाननी करण्याची आणि अर्थसहाय्य देण्याची कार्यपध्दती
- नोंदणीकृत (सक्रिय) बांधकाम कामगारानी प्रथम जिल्हा कार्यकारी अधिकारी / उप जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचेकडे मंडळानी विहीत केलेल्या नमुन्यात अर्ज करावा.
- बांधकाम कामगाराकडून प्राप्त झाले ल्या अर्जाची छाननी करुन अर्जदाराची पात्रता तसेच अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्राची जिल्हास्तरीय लाभार्थी निवड समिती तपासणी करेल व त्यात पात्र झालेल्या बांधकाम कामगाराची अटल बांधकाम कामगार आवास योजनेमध्ये (ग्रामीण) लाभार्थी म्हणून निवड करेल.
- उप जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तथा सदस्य सचिव सनियंत्रण समिती हे सनियंत्रण समितीच्या छाननीत पात्र झालेल्या आणि मंजुरी दिलेल्या बांधकाम कामगारांची तालुका निहाय यादी तयार करतील. सदर यादी सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांना सादर करतील आणि त्याची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तथा अध्यक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना उपलब्ध करुन देतील.
- सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे ग्राम विकास विभाग यांच्या अधिपत्याखालील संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृह निर्माण विभाग, नवी मुंबई याचेकडे पात्र बांधकाम कामगार यांचे घरकुल बांधकामा पोटी निधी वर्ग करतील.
- घराच्या बांधकामाच्या प्रगतीनुसार संचालक, राज्य व्यवस्थापन कक्षाकडून टप्प्या टप्प्याने ठरवुन दिलेले बांधकाम पुर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणाली (PFMS) प्रणालीद्वारे बांधकाम कामगारांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येईल.
- योजनेंतर्गत उपलब्ध करुन दिलेल्या अनुदानातून 4% एवढी रक्कम राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयास प्रशासकीय खर्चासाठी देय राहील.
अटी व शर्ती
- अर्जदार कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगारास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- मंडळाकडे नोंदणी जिवीत असलेले पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील.
- बांधकाम कामगार राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरु एखाद्या इतर योजनेचा लाभ घेत असता कामा नये.
कागदपत्रे
- प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र/प्रमाणित यादी
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवाशी दाखला
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- कायमचा पत्ता पुरावा
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
- नोंदणी अर्ज
- पासपोर्ट आकारातील 3 फोटो
- बँक पासबुक झेरॉक्स
- जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
- नियोक्त्याचे मागील वर्षभरात 90 दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला (इंजिनिअर/ठेकेदार)
- महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- घोषणापत्र
अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
- कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनांचे अर्ज | |
अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) अर्ज 1 | डाउनलोड |
अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) अर्ज 2 | डाउनलोड |
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्ता | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail.कॉम |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |