बांधकाम कामगारांना शिवण मशीन अनुदान योजना: मध्यवर्ती कार्यालयाच्या निर्णयानुसार अनुदान तत्वावर शिवन मशिन पुरविण्याबाबत मंडळाची योजना आहे. या योजनेअंतर्गत मंडळाच्या शिवणवर्गामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण कामगार व कामगार कुटुंबियांना शिवणयंत्राच्या 10 टक्के रक्कम त्यांच्याकडुन घेऊन त्यांना मंडळामार्फत शिवणयंत्र पुरविले जाते.
शासनाच्या निर्णयानुसार सदर योजनेमध्ये सुधारणा करण्यात येत असुन यापुढे वस्तुरुपात मिळणाऱ्या लामाचे हस्तांतर रोख स्वरुपात थेट लाभार्थीच्या बँक खात्यात करण्यात येणार आहे. त्यानुसार शिवण मशिनची (सिंगर ) किंमत 5100/- रुपये निश्चित करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थीना शिवण मशिनच्या किंमतीच्या 90% रक्कम 4590/- रुपये मंजुर करण्यात येईल.
शिवण मशीन अनुदान योजना चे नियम व अटी पुढील प्रमाणे राहतील:
- या योजनेत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडे कामगार कल्याण निधी मरणाऱ्या कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाच लाभ घेता येईल.
- मंडळाच्या शिवणवर्ग व सरकारमान्य शिवणवर्गातील परिक्षेत वर्गात प्रथम येणे आवश्यक आहे.
- शिवण वर्गामध्ये कामगार व कामगार कुटुंबियां व्यतिरीक्त इतरही समासद प्रवेश घेत असल्यामुळे कामगार व कामगार कुटुंबिय सभासदांमधुनच गुणांनुक्रमे एकाची निवड करण्यात येईल.
- अर्जदार हा त्या आर्थीक वर्षातील केंद्राचा व शिवण वर्गाचा समासद असावा.
- लाभार्थ्याने विहित नमुन्यात अर्ज केंद्राच्या प्रमुखाकडे सादर करावा.
- लाभार्थीनी परिमानाप्रमाणे वस्तुची खरेदी करुन पावती सादर करावी त्यानंतर मंजुर रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे:
- अर्जासोबत शिवण वर्गात प्रवेश घेतलेल्या आर्थिक वर्षातील माहे जून ची वेतन पावती / आस्थापनाचा दाखला अर्जासोबत जोडावा.
- शिवण वर्ग उत्तिर्ण केल्याचे प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत सोबत जोडावी.
- अर्जासोबत आधार कार्डची झेरॉक्स प्रत सोबत जोडावी.
- अर्जासोबत आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्याची माहिती सोबत जोडावी.
- शिवण मशीन खरेदी पावती
शिवण मशीन अनुदान योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळात जाऊन या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील व अर्ज महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळात जमा करावा लागेल.
योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर सभासद मध्ये योजनांसाठी अर्ज वर क्लिक करावं लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या योजनेसमोर Apply Now बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भर तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट बटनावर क्लिक करा.
- अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
या योजने अंतर्गत लाभ देतांना पुढिल प्रमाणे कार्यपध्दती अंमलात आणावी:
- सदर योजनेअंतर्गत केंद्र प्रमुखांनी अर्ज प्राप्त करुन घ्यावे व प्राप्त झालेल्या तारखेपासुन 7 दिवसाच्या आत सदरचे अर्ज गट कार्यालयास सादर करावे.
- गट प्रमुखांनी अर्जाची तपासणी करुन त्यांना प्राप्त झालेल्या तारखेपासुन 7 दिवसाच्या आत विभागीय कार्यालयांना सादर करावे.
- विभाग प्रमुखांनी सदर योजनांचे अर्जाची तपासणी करुन विभागीय स्तरावर मंजुरी द्यावी.
- अर्जाना मंजुरी दिल्याबाबत अर्जदारांना कळविण्यात यावे. तसेच वरीलप्रमाणे वस्तुची खरेदी करण्यासाठी कळविण्यात यावे.
- लाभार्थ्यांना खरेदी केलेल्या वस्तुची व सादर केलेल्या पावतिची शहानिशा करुन पुर्णपणे खातरजमा झाल्यावर लाभार्थ्याच्या बँक खात्यावर योजने अंतर्गत सुनिश्चित केलेल्या अनुदानाची रक्कम जमा करावी.
अधिकृत पोर्टल | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail.कॉम |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |
शासन निर्णय | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |