कामगार आजारी पडून दवाखान्यात भरती झाल्यास भरती काळापुरता त्याच्या पत्नीस दर दिवशी 100/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल.
बांधकाम क्षेत्रातील कामगार वर्गाला मिळणारे वेतन हे कमी असते तसेच कामगाराच्या एकट्याच्या जीवावर कुटुंबाचे सर्व जीवन अवलंबून असते आणि अशा वेळेला एखाद्या कामगार आजारी पडला आणि तो दवाखान्यात भरती झाला तर अशा वेळेला त्याचा दवाखान्याचा खर्च, औषधांचा खर्च करणे कठीण होते. व अशा वेळी कुटुंबाचे संपूर्ण जीवनमान बिघडते व त्यांना आपल्या दैनंदिन गरज पूर्ण करणे मुश्किल होते. त्यामुळे कामगाराच्या कुटुंबाच्या या सर्व समस्यांचे समाधान करण्यासाठी राज्य शासनाने सदर योजनेची सुरुवात केली आहे.
योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी कामगारास किंवा त्याच्या पत्नीस अर्ज करणे आवश्यक आहे.
योजनेचे उद्दिष्ट
- कामगार दवाखान्यात भरती असल्यास त्याच्या पत्नीस आर्थिक सहाय्य देणे.
- कामगारांचे जीवनमान सुधारणे.
- कामगाराचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
- कामगार आजारी असल्यावर त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये.
योजनेचे वैशिष्ट्य
- योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी कामगाराच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा केली जाते.
योजनेचे लाभार्थी
- कामगाराची पत्नी किंवा इतर वारस
योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य
- कामगार आजारी पडून दवाखान्यात भरती झाल्यास भरती काळापुरता त्याच्या पत्नीस दर दिवशी 100/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता
- अर्जदार कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
योजनेच्या अटी व शर्ती
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगारास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदार कामगारांचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
- कामगारांचे महाराष्ट्रातील वास्तव्य 15 वर्ष असावे.
- अर्जदाराने मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे.
- तो नोंदीत कामगार असावा व नोंदणी चालू असावी.
- अर्जदार कामगार हा ESIC मध्ये नोंदणीकृत असावा.
- मंडळाकडे नोंदणी जिवीत असलेले पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील.
- बांधकाम कामगार राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरु एखाद्या इतर योजनेचा लाभ घेत असता कामा नये.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रुग्णालयात भरती झाल्याचे प्रमाणपत्र
- कामगार / पत्नीचे बँक खाते क्रमांक
- पॅन कार्ड
- रहिवाशी दाखला
- कायमचा पत्ता पुरावा
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
- नोंदणी अर्ज
- पासपोर्ट आकारातील 3 फोटो
- बँक पासबुक झेरॉक्स
- नियोक्त्याचे मागील वर्षभरात 90 दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला (इंजिनिअर/ठेकेदार)
- घोषणापत्र
योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
- कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल किंवा आपल्या क्षेत्रातील कामगार विभाग मंडळातून किंवा अधिकृत पोर्टल वरून अर्ज डाउनलोड करावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
किंवा
- कामगाराला अर्ज भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज कामगार कल्याण विभागात (ESIC) जमा करावा लागेल.
योजनांचे अर्ज | |
योजनेचा अर्ज 1 | डाउनलोड |
योजनेचा अर्ज 2 | डाउनलोड |
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्ता | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |