योजनेअंतर्गत कामगारांचा विमा उतरवला जातो जेणेकरून त्यांचा अपघातात मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य दिले जाईल. या योजनेअंतर्गत कामगाराला महिना फक्त 1/- रुपये भरून 2 लाखांपर्यंत विम्याचा लाभ घेता येईल.
बहुतांश कामगार हे आर्थिक दृष्ट्या गरीब असतात आर्थिक स्थिती कमजोर असल्याकारणामुळे त्यांना आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करता येत नाहीत. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक नागरिकाचा विमा असणे आवश्यक आहे परंतु आर्थिक स्थिती कमजोर असल्याकारणामुळे तसेच विम्याचा प्रीमियम जास्त असल्याकारणामुळे विमा काढणे प्रत्येक नागरिकाला शक्य नसते. त्यामुळे तो विम्यापासून वंचित राहतो परिणामी अपघात झाल्यावर त्याला औषधोपचारासाठी आर्थिक सामना करावा लागतो.
या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य शासनाने राज्यातील बांधकाम कामगारांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला.

बांधकाम कामगार प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना चे उद्दिष्ट:
- कामगाराला 1/- रुपयांत 2 लाखाचा विमा लाभ उपलब्ध करून देणे.
- कामगाराच्या अकस्मात मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये तसेच त्यांना पैशांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज भासू नये.
योजनेचे वैशिष्ट्य:
- या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी कामगाराच्या वारसाच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य:
- एखाद्या कामगाराचा मृत्य झाल्यास त्याच्या वारसाला 2 लाखाचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
योजनेअंतर्गत आकारली जाणारी विमा राशी:
- या योजनेअंतर्गत कामगाराला महिना 1/- रुपये विमा भरावा लागेल. म्हणजेच प्रतिवर्षी 12/- रुपये भरावे लागतील.
योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवाशी दाखला
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- कायमचा पत्ता पुरावा
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
- नोंदणी अर्ज
- पासपोर्ट आकारातील 3 फोटो
- बँक पासबुक झेरॉक्स
- जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
- नियोक्त्याचे मागील वर्षभरात 90 दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला (इंजिनिअर/ठेकेदार)
- महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- घोषणापत्र
योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत:
- कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर सभासद मध्ये योजनांसाठी अर्ज वर क्लिक करावं लागेल.

- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या योजनेसमोर Apply Now बटनावर क्लिक करावे लागेल.

- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भर तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट बटनावर क्लिक करा.

- अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनांचे अर्ज | |
अधिकृत पोर्टल | येथे क्लिक करा |
योजनेचा अर्ज 1 | डाउनलोड |
योजनेचा अर्ज 2 | डाउनलोड |
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्ता | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |