अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2024

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारास त्याचे हक्काचे घर बांधण्यासाठी किंवा घराचे नवीनीकरण/दुरुस्तीसाठी 2 लाख रुपयांपर्यंत बांधकाम कामगार अनुदान देण्यात येते.

  • महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वत:च्या जागेवर नवीन घर बांधण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) मंडळामार्फत 1,50,000/- रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येते.
  • बांधकाम कामगार घरकुल योजना अंतर्गत लाभार्थ्याने खरेदी केलेल्या जमीन व इतर तदनुषंगिक बाबींसाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येते.
  • अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा (ग्रामीण) लाभ घेऊन घराचे बांधकाम पूर्ण करुन घर बांधणीच्या पूर्णत्वाचा दाखला देऊन अर्ज केलेला आहे अशा लाभार्थ्यास जमीन खरेदी व घरबांधणीच्या अनुषंगीक बाबीसाठी केलेल्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून 50,000/- रुपये पर्यंतचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात येते. हे मंजूर अर्थसहाय्य थेट लाभार्थ्यांच्या बँक बचत खात्यात जमा करण्यात येईल.
  • अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) ला Atal Gharkul Yojana या नावाने देखील ओळखण्यात येते.
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण)

योजनेचे स्वरूप:

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारापैकी ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांसाठी मंजुर अटल बांधकाम कामगार आवास योजनेचे (ग्रामीण) स्वरुप खालील प्रमाणे आहे.

  • मंडळाकडील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वत:च्या / पती / पत्नीच्या नावावरील जागेवर नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी 1.50 लक्ष अनुदान महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून उपलब्ध करुन देण्यात येईल.
  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर( MGNREGA) अनुज्ञेय असणारे 18,000/- रुपये तसेच स्वच्छ भारत अभियानद्वारे शौचालय बांधण्यासाठी अनुज्ञेय असलेले 12,000/- रुपये असे एकूण 30,000/- रुपये अनुदान 1,50 लक्ष मध्ये समाविष्ट असल्याने संबधित योजनांचा दुबार लाभ देय राहणार नाही.

Atal Bandhkam Kamgar Awas Yojana Gramin अंतर्गत पात्र कामगार:

  • महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रीय) बांधकाम कामगारांनी अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) चा लाभ घेऊन घराचे बांधकाम पूर्ण करुन घरबांधणीच्या पूर्णत्वाचा दाखला सादर केला आहे असे बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून अर्थसहाय्य मिळण्यास पात्र राहतील.

Maharashtra Bandhkam Kamgar Awas Yojana अंतर्गत घराचे क्षेत्रफळ:

  • अटल बांधकाम कामगार आवास योजना ( ग्रामीण ) अंतर्गत पात्र ठरलेल्या बांधकाम कामगारांनी किमान 269 चौ. फुट इतके चटई क्षेत्र असलेले घर बांधकाम करणे आवश्यक आहे. त्याकरिता रु. 1.50 ल्क्ष एवढे अनुदान देय राहील. मात्र लाभार्थ्यास त्यापेक्षा जास्त क्षेत्राचे बांधकाम स्व खर्चाने करण्यास मुभा राहील.

बांधकाम कामगार घरकुल योजना 2024 अंतर्गत घराची रचना:

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारापैकी ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेतील (ग्रामीण) घराची रचना खालील प्रमाणे आहे.

  • संपूर्ण बांधकाम विटा, वाळू व सिमेंटचे असणे आवश्यक आहे. घरकुलामध्ये एक स्वयंपाकघर व बैठक हॉल यांचा समावेश असावा. शौचालय व स्नानघर बांधणे अनिवार्य राहिल.
  • जोत्यापासून घराची उंची कमीत कमी 10 फूट असावी.
  • छतासाठी स्थानिक गरजेनसार मजबूत लोखंडी किंवा सिमेंट पत्रे अथवा कौलांचा वापर करण्यास मुभा राहील.
  • घराच्या दर्शनीभागावर मंडळाचे बोधचिन्ह (लोगो) लावणे आवश्यक आहे.

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी पात्रता:

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांपैकी ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा (ग्रामीण) लाभ प्रति कुटुंबासाठी असून त्याचा लाभ घेण्यासाठीची पात्रता खालील प्रमाणे आहे

  • योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार हा नोंदणीकृत (सक्रिय) असावा तथापि अर्ज करतांना तो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सलग एक वर्षापेक्षा अधिक, बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असावा.
  • नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांचे स्वत:च्या /पती / पत्नीच्या नावावर महाराष्ट्र राज्यात पक्के (सिमेंट, वाळूने बांधलेले) घर नसावे. तशा आशयाचे स्वयंघोषणापत्र/ शपथपत्र सादर करणे आवश्यक राहील.
  • नोंदीत बांधकाम कामगारास पक्के घर बांधण्यासाठी स्वत:च्या / पती/पत्नीच्या नावे मालकीची जागा असावी अथवा मालकीचे कच्चे घर असलेल्या त्या ठिकाणी घर बांधता येईल.
  • बांधकाम कामगारानी शासनाच्या इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनांचा लाभ घेतलेला नसावा. मंडळाकडील देय गृहकर्जावरील व्याज परतावा करीता अनुज्ञेय अर्थसहाय्याचा/ अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. याबाबत त्यांनी स्वयंघोषणापत्र / शपथपत्र सादर करणे आवश्यक राहील.
  • अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा (ग्रामीण) लाभ प्रति कुटुंबासाठी आहे.
  • एकदा लाभ घेतल्यानंतर बांधकाम कामगार पुनश्च: या योजनेच्या लाभास पात्र राहणार नाही.
  • नोंदणीकृत (सक्रिय) बांधकाम कामगार हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या कायमस्वरुपी प्रतिक्षा यादीमध्ये (PWL) समाविष्ट नसावा.

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत अटी:

  • अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थ्याकडे जमिन असणे आवश्यक आहे.

योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे:

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांपैकी ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा ( (ग्रामीण) लाभ घेण्यासाठी विहीत अर्जासह खालील कागदपत्र देणे आवश्यक आहे:

  • सक्षम प्राधिकाऱ्याने नोंदीत बांधकाम कामगार म्हणून दिलेल्या ओळखपत्राची प्रत
  • आधारकार्ड
  • 7/12 चा उतारा/ मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र/ग्रामपंचायतीमधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा
  • लाभधारकाचे स्वत:च्या नावे कार्यरत असलेल्या बचत खात्याच्या पासबुकाची छायांकीत प्रत
  • प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र/प्रमाणित यादी

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत अर्ज करण्याची व त्याची छाननी करण्याची आणि अर्थसहाय्य देण्याची कार्यपध्दती

  • नोंदणीकृत (सक्रिय) बांधकाम कामगारानी प्रथम जिल्हा कार्यकारी अधिकारी / उप जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचेकडे मंडळानी विहीत केलेल्या नमुन्यात अर्ज करावा.
  • बांधकाम कामगाराकडून प्राप्त झाले ल्या अर्जाची छाननी करुन अर्जदाराची पात्रता तसेच अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्राची जिल्हास्तरीय लाभार्थी निवड समिती तपासणी करेल व त्यात पात्र झालेल्या बांधकाम कामगाराची अटल बांधकाम कामगार आवास योजनेमध्ये (ग्रामीण) लाभार्थी म्हणून निवड करेल.
  • उप जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तथा सदस्य सचिव सनियंत्रण समिती हे सनियंत्रण समितीच्या छाननीत पात्र झालेल्या आणि मंजुरी दिलेल्या बांधकाम कामगारांची तालुका निहाय यादी तयार करतील. सदर यादी सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांना सादर करतील आणि त्याची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तथा अध्यक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना उपलब्ध करुन देतील.
  • सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे ग्राम विकास विभाग यांच्या अधिपत्याखालील संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृह निर्माण विभाग, नवी मुंबई याचेकडे पात्र बांधकाम कामगार यांचे घरकुल बांधकामा पोटी निधी वर्ग करतील.
  • घराच्या बांधकामाच्या प्रगतीनुसार संचालक, राज्य व्यवस्थापन कक्षाकडून टप्प्या टप्प्याने ठरवुन दिलेले बांधकाम पुर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणाली (PFMS) प्रणालीद्वारे बांधकाम कामगारांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येईल.
  • योजनेअंतर्गत उपलब्ध करुन दिलेल्या अनुदानातून 4% एवढी रक्कम राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयास प्रशासकीय खर्चासाठी देय राहील.

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

  • कामगाराला आपल्या क्षेत्रातील कामगार कामगार कार्यालयात जाऊन किंवा अधिकृत पोर्टल वरून किंवा आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनांचे अर्ज
Atal Kamgar Yojana Form 1डाउनलोड
अटल बांधकाम कामगार योजना (शहरी) अर्ज 2डाउनलोड
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्तायेथे क्लिक करा
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णययेथे क्लिक करा

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना

सामाजिक सुरक्षा योजना

कामगाराच्या विवाहाच्या खर्चासाठी 30,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसहाय्य
बांधकाम कामगार योजना अंतर्गत मध्यान्ह भोजन योजना
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
अटल पेन्शन योजना लाभ
कामगारांच्या पाल्यांना पाळणाघर सुविधा
कौशल्यवृद्धी योजना लाभ
बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभ
नोंदीत बांधकाम कामगारांकरिता ट्रांझिट कॅम्प ची सुविधा
प्रधानमंत्री आवास (ग्रामीण) योजना
घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना
कामगार व कामगार कुटुंबियांची लांब पल्ल्याची सहल
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड
योजनांचे अर्ज
सामाजिक सुरक्षा योजनांचे अर्ज 1डाउनलोड
सामाजिक सुरक्षा योजनांचे अर्ज 2डाउनलोड

शैक्षणिक योजना

परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती
क्रीडा शिष्यवृत्ती योजना
साहित्य प्रकाशन अनुदान योजना
इयत्ता 1ली ते 7वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 2500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
इयत्ता 8वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
इयत्ता 10वी व इयत्ता 12वी मध्ये किमान 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
इयत्ता 11वी व इयत्ता 12वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी 10,000/- रुपयाचे आर्थिक सहाय्य
कामगाराच्या मुलांना व पत्नीस पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
कामगाराच्या मुलांना व पत्नीस वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य
वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रतिवर्षी 60,000/- रुपये आर्थिक सहाय्य
शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 25,000/- रुपयाचे आर्थिक सहाय्य
नोंदीत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास MS-CIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती
बांधकाम कामगाराच्या आय आय टी वा तत्सम शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
कामगारांच्या पाल्यांना इंग्रजीच्या ट्युशन फीसाठी आर्थिक सहाय्य
बांधकाम कामगाराच्या पाल्यास पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी तसेच परदेशात उच्च शिक्षण घेण्याकरिता शिष्यवृत्ती
सर्वसाधारण शिष्यवृत्ती
कामगाराच्या पाल्यांना शिक्षणासाठी टॅबलेट व लॅपटॉप चे वितरण
बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक उपयोगाची पुस्तके भेट
योजनांचे अर्ज
शैक्षणिक योजनांचे अर्ज 1डाउनलोड
शैक्षणिक योजनांचे अर्ज 2डाउनलोड

आरोग्य विषयक योजना

नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
गंभीर आजार वैद्यकीय उपचार सहायता योजना
शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य (दोन जीवित अपत्यांसाठी)
लाभार्थी कामगार व त्याच्या कुटुंबाला गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1 लाखाचे आर्थिक सहाय्य
एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1 लाख रुपये मुदत ठेव बंद
अपघातात कामगाराला 75 टक्के अपंगत्व किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 2 लाखाची आर्थिक मदत
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ
कामगार दवाखान्यात भरती झाल्यास भरती काळापुरता त्याच्या पत्नीस दर दिवशी आर्थिक सहाय्य
कामगारांना जननी विमा योजनेचा लाभ
नोंदीत बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी
व्यसनमुक्ती करीता निधी
योजनांचे अर्ज
आरोग्य विषयक योजनांचे अर्ज 1डाउनलोड
आरोग्य विषयक योजनांचे अर्ज 2डाउनलोड

आर्थिक योजना

कामगार योजना ५०००
आत्महत्याग्रस्त कामगाराच्या कुटुंबास अर्थसहाय्य
कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 5 लाखाचे आर्थिक सहाय्य
शिवण मशीन अनुदान योजना
बांधकाम कामगार पेटी योजना
कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कायदेशी वारसास 2 लाखाचे आर्थिक सहाय्य
अनोंदीत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास अर्थसहाय्याचा लाभ
अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) अंतर्गत 2 लाखाचे अर्थसहाय्य
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत 2 लाखाचे अर्थसहाय्य
50 ते 60 वयोगटातील कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरिता 10 हजारांचे सहाय्य
कामगाराचा मृत्यू झाल्यास विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस 5 वर्षाकरिता 24 हजाराचे आर्थिक सहाय्य
नोंदीत बांधकाम कामगारांना घर खरेदी किंवा घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य
बांधकाम कामगारांना बोनस सुविधा
बांधकाम कामगारांना सायकल वाटप
साहित्य खरेदीसाठी आर्थिक सहाय्य
बांधकाम कामगारांना सुरक्षा संच (सेफ्टी किट) चा लाभ
बांधकाम कामगारांना वस्तू संच (Essential Kit) चा लाभ
बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वितरण
कामगार व त्यांच्या कुटुंबियांना स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण योजना
अटल बांधकाम कामगार आवास योजना
वाहन चालक प्रशिक्षण योजना
योजनांचे अर्ज
आर्थिक योजनांचे अर्ज 1डाउनलोड
आर्थिक योजनांचे अर्ज 2डाउनलोड

महत्वाच्या बाबी

कामगार कल्याण योजना
बांधकाम कामगार यादी
बांधकाम कामगार योजना फायदे
बांधकाम कामगार योजना अंतर्गत आवश्यक पात्रता
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे
बांधकाम कामगार योजना आवश्यक अटी व शर्ती
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय
बांधकाम कामगार संपर्क कार्यालय
बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म
बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्रे
Essential Kit Form PDF
Bandhkam Kamgar Safety Kit Form PDF Download
bocw Safety Kit Form PDF Download
Bandhkam Kamgar Nondani Maharashtra

कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे

बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो?
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची?
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का?
असंघटित कामगार म्हणजे काय?
कामगार कल्याण योजना काय आहेत?

बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी

बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा

बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण

आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा

बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा

उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना

सर्वसाधारण शिष्यवृत्ती
परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती
क्रीडा शिष्यवृत्ती
पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य
MS-CIT अर्थसहाय्य
साहित्य प्रकाशन अनुदान
शिवण मशीन अनुदान योजना
गंभीर आजार उपचार अर्थसहाय्य
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
आत्महत्याग्रस्त कुटुंबास अर्थसहाय्य
कामगार व कामगार कुटुंबियांची लांब पल्ल्याची सहल
वाहन चालक प्रशिक्षण
इंग्रजीसह विदेशी भाषा संभाषण प्रशिक्षण
स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
दूरध्वनी क्र022-24306717 / 43226825
फॅक्स क्र022-42210019
ई-मेलmlwbpro53@gmail.कॉम
पत्तामका / ग्रंथालय / 17 -18 / 165
हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन,
सेनापती बापट मार्ग,
एलफिन्स्टन, मुंबई 400013