आत्महत्याग्रस्त कामगाराच्या कुटुंबास अर्थसहाय्य: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ च्या अन्वये मंडळाला त्रिपक्ष वर्गणी देणाऱ्या कामगाराने कारखाने / गिरणी बंद पडल्यामुळे आर्थिक दुराव्यस्थेमुळे व मानसिक परिस्थितीने खचून जाऊन आत्महत्या केली असल्यास त्यांच्या दुदैवी कामगारांच्या कुटुंबियांना मंडळाकडून 1 लाख रुपये (रुपये एक लाख) फक्त आर्थिक मदत म्हणून मंजुर करण्याची मंडळाची योजना आहे.
आत्महत्याग्रस्त कामगाराच्या कुटुंबास अर्थसहाय्य योजनेचे उद्दिष्ट:
- कामगाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करणे.
योजनेचे वैशिष्ट्य:
- योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी कामगाराच्या वारसाच्या बँक खात्यात जमा केली जाते.
योजनेचे लाभार्थी:
- कामगाराचा वारस
योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य:
- कामगाराने आत्महत्या केल्यास त्याच्या वारसाला 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता व अटी:
- कामगाराच्या कुटुंबाजवळ आत्महत्या ही आर्थीक अडचणीतून झालेली असल्याचे पुरावे असावेत.
- आत्महत्या केलेल्या कामगारांवर अवलंबून असलेली त्यांची मुले अल्पवयीन (वय वर्षे १८ खालील) असावीत.
- आत्महत्या केलेल्या कामगारांच्या पती/पत्नीला नोकरी नसावी.
- पेन्शन / ग्रॅच्युईटी / प्रॉव्हीडंड फंड इत्यादी कायदेशीर (ड्युज) देय रक्कमा त्याला वेळेवर न मिळाल्यामुळे तो कर्जबाजारी झाला असेल व आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केलेली असावी.
- आत्महत्या केलेल्या कामगारांच्या कायदेशीर वारसांना नियमित आर्थिक उत्पन्नाचे साधन नसावे.
- नोकरीस असताना तो कामगार महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची सहामाही वर्गणी भरणारा असायला हवा.
- व्यसन, कौटुंबिक कलह, अगर अन्य कारणांमुळे कामगाराने आत्महत्या केलेली नसावी.
- हत्या, अपघाती मृत्यू अशा कारणांमुळे मृत्यु आलेला नसावा.
- मेडीकल, पोलीस व जिल्हाधिकारी यांचा अहवाल आत्महत्या केली असा असायला हवा,
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:
- कामगारांचे कामगार कल्याण मंडळात नोंदणी प्रमाणपत्र
- वारसाचे आधार कार्ड
- वारसाच्या बँक खात्याचा तपशील
- रहिवाशी प्रमाणपत्र
- मेडीकल, पोलीस व जिल्हाधिकारी यांचा अहवाल
- वारसाचे पासपोर्ट आकाराचे फोटो
- वैद्यकीय प्रमाणपत्र
- पोलीस अहवाल
- जिल्हाधिकारी प्रमाणपत्र
- ई-मेल आयडी
- मोबाईल क्रमांक
- वारसाचे पॅन कार्ड
- कामगाराने भरलेली कामगार कल्याण निधी वर्गणी पावती (माहे, जून किंवा डिसेंबर)
योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून किंवा आपल्या क्षेत्रातील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळात जाऊन या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज जमा करावा लागेल.
योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर सभासद मध्ये योजनांसाठी अर्ज वर क्लिक करावं लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या योजनेसमोर Apply Now बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भर तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट बटनावर क्लिक करा.
- अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनेअंतर्गत अर्जाची कार्यवाही:
मंडळाने विहित केलेल्या सोबत नमुन्यात फॉर्म भरुन घेऊन त्यासोबतच्या कागदपत्रांची छाननी करुन अर्ज | मध्यवर्ती कार्यालयात सदार करावा त्यानंतर मंडळाची मान्यता घेवून मंजुरी देण्यात येईल.
इतर सरकारी योजना:
- कर्मचारी राज्य विमा योजना (ESIC): जर मृत व्यक्ती ESIC अंतर्गत विमाधारक असेल तर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळू शकते. अधिक माहितीसाठी, तुम्ही ESIC च्या वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा तुमच्या जवळच्या ESIC कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
- कर्मचारी कामगार विमा योजना (EPF): जर मृत व्यक्ती EPF सदस्य असेल तर त्यांच्या कुटुंबाला विमा आणि पेंशन लाभ मिळू शकतात. अधिक माहितीसाठी, तुम्ही EPF च्या वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा तुमच्या जवळच्या EPF कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
- राज्य सरकार योजना: काही राज्य सरकारे आत्महत्याग्रस्त कामगारांच्या कुटुंबांसाठी आर्थिक मदत प्रदान करतात. अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या राज्याच्या श्रम विभागाशी संपर्क साधू शकता.
- स्वयंसेवी संस्था: अनेक स्वयंसेवी संस्था आहेत ज्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक आणि भावनिक मदत प्रदान करतात. तुम्ही तुमच्या परिसरातील अशा संस्थांची यादी ऑनलाइन शोधू शकता.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
शासन निर्णय | येथे क्लिक करा |
योजनेचा अर्ज | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail.कॉम |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |