Maharashtra Kamgar Kalyan Mandal Scholarship: अभियांत्रिकी शिक्षण हे अत्यंत महाग असते. तसेच शिक्षण शुल्क, आवश्यक पुस्तके, साहित्य आणि इतर खर्च यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज असते तसेच कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणे देखील महत्वाचे असते. परंतु कामगारांना मिळणारे वेतन हे अत्यंत कमी असते त्यामुळे हा आर्थिक भार उचलणे कामगारांना शक्य नसते म्हणून कामगार आपले घर, जमीन, दागिने गहाण ठेवून कर्ज घेतात परंतु कर्जाचे हफ्ते वेळेवर फेडणे त्यांना शक्य होत नाही याचा त्याच्या मानसिकतेवर परिणाम होतो. त्यामुळे कामगारांच्या डोक्यावरचा आर्थिक ताण कमी करण्याच्या उद्देशाने सदर योजना सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.
नोंदीत बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस अभियांत्रिकी पदवीकरिता तसेच महाविद्यालयात किंवा संस्थेत प्रवेशासाठी पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदी इत्यादींसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 60,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.
योजनेचे उद्दिष्ट:
- कामगारांच्या पाल्यांना तसेच पत्नीला त्यांचे अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
- कामगारांच्या पाल्यांचा तसेच पत्नीचा कौशल्य विकास करणे.
- महिलांना अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे.
- कामगारांच्या डोक्यावरचा आर्थिक भार कमी करणे.
योजनेचे वैशिष्ट्य:
- या शिष्यवृत्ती अंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी कामगाराच्या बँक खात्यात जमा केली जाते.
- कामगाराचा मृत्यू झाला असेल तरी देखील त्याच्या मुलांना व पत्नीला या योजनेचा लाभ दिला जाईल.
योजनेचे लाभार्थी:
- कामगारांचे पाल्य व पत्नी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
आवश्यक शैक्षणिक अभ्यासक्रम:
- अभियांत्रिकी अभ्यासक्रम
योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य:
- प्रतिवर्षी 60,000/- रुपये
योजनेअंतर्गत आवश्यक अटी व शर्ती:
- योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कामगारांच्या पाल्यांना किंवा पत्नीस अर्ज करणे आवश्यक आहे.
- कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- कामगार हा कामगार मंडळात नोंदणीकृत असावा.
- कामगाराच्या पाल्याने किंवा पत्नीने राज्यातील मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेत असणे आवश्यक आहे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक/प्रमाणपत्र
- चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची पावती/बोनाफाईड
- कामागचे कामगार मंडळात नोंदणी प्रमाणपत्र
- कामगाराचा मृत्यू झाला असल्यास मृत्यू दाखला
- कुटुंबाचा वांशिक उत्पन्नाचा दाखला
- कामगाराच्या बँक खात्याची माहिती
अर्ज करण्याची पद्धत:
- कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल किंवा कामगार मंडळात जाऊन या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनांचे अर्ज | |
योजनेचा अर्ज 1 | डाउनलोड |
योजनेचा अर्ज 2 | डाउनलोड |
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्ता | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |