योजनेअंतर्गत कामगार व कामगार कुटुंबियांची मोफत लांब पल्ल्याची सहल आयोजित करण्यात येते.
कामगार विविध क्षेत्रात अहोरात्र काम करत असतात. तसेच कधी कधी सुट्टीच्या दिवशी सुद्धा त्यांना कामावर जावे लागते तर कधी कधी ओव्हरटाईम सुद्धा करावा लागतो त्याuमुळे सतत च्या कामामुळे त्यांच्या मानसिकतेवर याचा विपरीत परिणाम होते. त्यामुळे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत कामगार व कामगार कुटुंबियांची लांब पल्ल्याची सहल आयोजित केली जाते. जेणेकरून सहलीच्या माध्यमातून त्यांच्या डोक्यावरचा कामाचा ताण कमी होईल.
मंडळाकडे कामगार कल्याण निधी भरणाऱ्या कामगार, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांकरीता औद्योगिक, भौगोलीक किंवा ऐतिहासीक प्रेक्षनिय स्थळे पाहण्याकरीता दूर पल्ल्याच्या सहली आयोजीत करण्याची मंडळाची योजना आहे.
सहलीच्या नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत.
१) सहलीमध्ये भाग घेणाऱ्या सभासदाचे वय कमीत कमी 18 वर्षे असणे आवश्यक आहे.
२) सहलीमध्ये भाग घेणारा सभासद हा कामगार कल्याण केंद्राचा सहा महिन्यापूर्वीचा सभासद झालेला असावा.
३) सहलीमध्ये एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन सभासदांना सहभागी करण्यात येईल.
४) सहलीमध्ये भाग घेणाऱ्या सभासदांनी सहलीमध्ये स्वतःच्या जबाबदारीवर भाग घेत असल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून देणे आवश्यक आहे.
५) सहलीमध्ये कमीत कमी 25 व जास्तीत जास्त 40 सभासदांना प्रवेश दिला जाईल.
६) सहलीमध्ये एका पेक्षा जास्त आस्थापनांच्या कामगार कर्मचारी व कुटुंबियांचा सामावेश असणे आवश्यक आहे.
७) सहलीमध्ये भाग घेणाऱ्या सभासदांना सहलीच्या ठिकाणापर्यंत परतीसह प्रवासखर्चाची रक्कम 200/- रुपये आणि दैनिक भत्ता व किरकोळ खर्चासाठी प्रत्येकी 120/- रुपये मंजूरी देण्यात येईल.
८) सहल दर वर्षी माहे डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात येईल.
कामगार आणि कामगार कुटुंबांसाठी अनेक लांब पल्ल्याच्या सहली उपलब्ध आहेत. सहलीची निवड करताना, बजेट, आवडीनिवडी आणि कुटुंबातील सदस्यांचे वय यासारख्या अनेक घटकांचा विचार करणे महत्त्वाचे आहे.
सहलीची ठिकाणे:
- राष्ट्रीय उद्याने आणि राज्य उद्याने:हे उद्याने मुलांसह कुटुंबांसाठी उत्तम आहेत, कारण ते हायकिंग, कॅम्पिंग आणि मासेमारी यासारख्या विविध क्रियाकलाप देतात. काही लोकप्रिय राष्ट्रीय उद्यानांमध्ये नॅशनल पार्कचा समावेश आहे.
- थीम पार्क:थीम पार्क सर्व वयोगटातील कुटुंबांसाठी मजा करण्याचे ठिकाण आहे. काही लोकप्रिय थीम पार्कमध्ये युनिव्हर्सल स्टुडिओ आणि सिक्स फ्लॅग्सचा समावेश आहे.
- शहरे:अनेक शहरे कुटुंबांना भेट देण्यासाठी उत्तम ठिकाणे देतात, ज्यात संग्रहालये, ऐतिहासिक स्थळे आणि प्राणीसंग्रहालये आहेत.
- समुद्रकिनारे:समुद्रकिनारे आराम करण्यासाठी आणि सूर्याचा आनंद घेण्यासाठी उत्तम ठिकाण आहेत. काही लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांमध्ये मियामी बीच, हॅम्प्टन्स आणि बीचचा समावेश आहे.
अर्ज करण्याची पद्धत:
- कामगाराला आपल्या क्षेत्रातील कामगार कल्याण मंडळात जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर सभासद मध्ये योजनांसाठी अर्ज वर क्लिक करावं लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या योजनेसमोर Apply Now बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भर तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट बटनावर क्लिक करा.
- अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
कार्यपद्धती:
सहल आयोजीत करण्यासाठी संबंधीत केंद्र प्रमुखांनी वरील नियम व अटी प्रमाणे प्रस्ताव तयार करुन प्रस्तावामध्ये सहलीची तारीख, सहलीचे ठिकाण, सभासदांचे संपूर्ण नाव, आस्थापनेचे नाव, कामगार कुटुंबिय सभासद असल्यास रेशन कार्ड इ. खात्री करुन सभासदांच्या यादीसह संबधित कामगार कल्याण अधिकऱ्यांकडे प्रस्ताव सादर करावा.
कामगार कल्याण अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे आलेल्या प्रस्तावाची तपासणी करुन प्रस्ताव मंजूरीसाठी संबंधीत विभाग प्रमुखांकडे सादर करावा.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
शासन निर्णय | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail.कॉम |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |