बांधकाम कामगार योजना 5000: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना तसेच त्यांच्या पाल्यांना 5000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने खालीलप्रमाणे तीन योजना राबविण्यात आलेल्या आहेत. या योजनांची सविस्तर माहिती आम्ही खाली दिलेली आहे.
या योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे 3 प्रकारच्या योजना राबविल्या जातात.
योजना | आर्थिक सहाय्य | |
1. | कामगारांना अवजारे खरेदीसाठी 5 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य | 5000/- रुपये |
2. | कामगारांच्या पाल्यांना प्रतिवर्ष 5 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य | 5000/- रुपये |
3. | बांधकाम कामगारांना बोनस सुविधा | 5000/- रुपये |
योजनेचे उद्दिष्ट:
- बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना अवजारे खरेदी करण्यासाठी, दिवाळीत बोनस च्या माध्यमातून तसेच पाल्यांना शिक्षणासाठीआर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.
- कामगारांचे जीवनमान सुधारणे.
1. कामगारांना अवजारे खरेदीसाठी 5 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य:
बांधकाम कामगार योजना 5000 ही महाराष्ट्र सरकारची कामगारांसाठी राबाविण्यात येणारी उपयुक्त अशी एक योजना आहे. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दर तीन वर्षांनंतर 5,000/- रुपये पर्यंतची आर्थिक मदत करण्यात येते. हे पैसे कामगारांना बांधकाम क्षेत्रात आवश्यक असणारी अवजारे आणि हत्यारे खरेदी करण्यासाठी देण्यात येतात.
नोंदीत बांधकाम कामगारास प्रति कुटुंब दर 3 वर्षातून एकदा बांधकाम क्षेत्रात आवश्यक असणारी अवजारे / हत्यारे खरेदी करण्याकरिता 5,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. जेणेकरून कामगार बांधकाम क्षेत्रात आवश्यक असणारी अवजारे खरेदी करू शकतील व काम काम करताना कामगारांना आवजारांची कमतरता भासणार नाही लाभाची राशी कामगाराच्या बँक खात्यात जमा केली जाते.
योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता, अटी, कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत याच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
योजनेचे एकूण लाभार्थी खालीलप्रमाणे आहेत.
जिल्याचे नाव | योजनेचे एकूण लाभार्थी | |
मालेगांव | 1061 | Click Here |
जळगांव | 1303 | Click Here |
वाशिम | 1998 | Click Here |
नाशिक | 2903 | Click Here |
हिंगोली | 2951 | Click Here |
बार्शी | 3156 | Click Here |
अकोला | 4307 | Click Here |
मुंबई शहर | 4361 | Click Here |
परभणी | 4825 | Click Here |
धुळे | 5673 | Click Here |
रायगड | 6088 | Click Here |
बीड | 6325 | Click Here |
अहमदनगर | 6526 | Click Here |
सातारा | 6674 | Click Here |
नांदेड | 6755 | Click Here |
गडचिरोली | 8328 | Click Here |
वर्धा | 10508 | Click Here |
बुलढाणा | 10715 | Click Here |
इचलकरंजी | 11837 | Click Here |
भंडारा | 12095 | Click Here |
चंद्रपुर | 15185 | Click Here |
सांगली | 17574 | Click Here |
अमरावती | 23631 | Click Here |
यवतमाळ | 32134 | Click Here |
ठाणे | 896 | Click Here |
मुंबई उपनगर पूर्व | 2372 | Click Here |
कल्याण | 2492 | Click Here |
रत्नागिरी | 7531 | Click Here |
पालघर | 9418 | Click Here |
सिंधुदुर्ग | 10826 | Click Here |
भिवंडी | 548 | Click 1 | Click 2 |
गोंदिया | 22407 | Click 1 | Click 2 |
उस्मानाबाद | 34150 | Click 1 | Click 2 | Click 3 |
जालना | 35285 | Click 1 | Click 2 | Click 3 |
औरंगाबाद | 37620 | Click 1 | Click 2 | Click 3 |
लातूर | 42622 | Click 1 | Click 2 | Click 3 | Click 4 |
नागपुर | 44510 | Click 1 | Click 2 | Click 3 | Click 4 |
पुणे | 50789 | Click 1 | Click 2 | Click 3 | Click 4 |
2. कामगारांच्या पाल्यांना प्रतिवर्ष 5 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य:
इयत्ता 8वी ते 10वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या बांधकाम कामगारांच्या पाल्यांना प्रतिवर्ष 5,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. जेणेकरून कामगारांना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागु नये. व मुलांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहण्याची गरज भासू नये. लाभाची राशी कामगाराच्या बँक खात्यात जमा केली जाते.
योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता, अटी, कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत याच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
3. बांधकाम कामगारांना बोनस सुविधा:
दिवाळी सारख्या मुख्य साणासूंदीच्या काळात कामगारांच्या मुलांना तसेच पत्नीस नवीन कपडे व फटाके खरेदी करता यावेत यासाठी बांधकाम कामगारांना प्रतिवर्ष त्यांच्या वेतनानुसार बोनस दिला जातो. लाभाची राशी कामगाराच्या बँक खात्यात जमा केली जाते.
योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता, अटी, कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत याच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
योजनेचा फायदा:
- कामगारांना 5,000/- रुपयांपर्यंत आर्थिक मदत
- हत्यारे आणि साहित्य खरेदीसाठी आर्थिक सहाय्य
- पात्र बांधकाम कामगारांसाठी फायदेशीर योजना
पात्रता:
- अर्जदार कामगार हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराची किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 60 वर्षे असणे आवश्यक आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने गेल्या तीन वर्षांत किमान 90 दिवसांसाठी बांधकाम कामगार म्हणून काम केले पाहिजे.
अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे:
- नोंदणी प्रमाणपत्र: कामगाराचे मंडळात असलेले नोंदणी प्रमाणपत्र
- ओळखीचा पुरावा: आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायविंग लायसेन्स
- रहिवाशी दाखला: डोमेसाइल (आवश्यक असल्यास)
- पत्ता पुरावा: (वीज बिल, टेलिफोन बिल, आधार कार्ड)
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- कायमचा पत्ता पुरावा: रेशन कार्ड, वीज बिल, आधार कार्ड
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
- पासपोर्ट आकारातील 3 फोटो
- बँकेचा तपशील: बँक पासबुक झेरॉक्स
- जन्माचा दाखला: जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला
- ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- घोषणापत्र
अर्ज कसा करावा:
- अर्ज महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करावा किंवा आम्ही खाली अर्ज दिलेला आहे तेथून डाउनलोड करावा.
- भरालेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संबंधित कार्यालयात जमा करावा.
महत्वाच्या बाबी:
- अर्ज करण्यापूर्वी सर्व अटी व नियम जाणून घ्या.
- आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आपल्या जावळ ठेवा.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरा.
- अर्जात खोटी माहिती भरू नका.
- लाभार्थ्याने खोटी माहिती भरून लाभ प्राप्त केल्यास त्याच्यावर कडक कार्यवाही केली जाईल आणि लाभाची संपूर्ण राशी वसुल केली जाईल.
- अर्जसोबत आवश्यक सर्व कागदपत्रे जोडा.
- अंतिम तारखेपूर्वी अर्ज जमा करा.
योजनेअंतर्ग अर्ज रद्द होण्याची मुख्य कारणे:
- अर्जात खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्ज अपूर्ण भरल्यास अर्ज रद्द होण्याची शकता असते.
- अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे न जोडल्यास
- अर्जदार कामगार इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळातील नोंदणीकृत कामगार नसल्यास.
अधिक माहितीसाठी:
सदर योजना आणि योजनेच्या नियमांमध्ये बदल होऊ शकतो त्यामुळे अर्ज करताना तुम्हाला एखादी समस्य येत असल्यास किंवा तुमचे काही प्रश्न असल्यास अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधा.
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |