अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) 2025 | Maharashtra Bandhkam Kamgar Awas Yojana

Maharashtra Bandhkam Kamgar Awas Yojana: अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारास त्याचे हक्काचे घर बांधण्यासाठी किंवा घराचे नवीनीकरण/दुरुस्तीसाठी 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात येते.

इमारत बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार किंवा इतर क्षेत्रात काम करणारे कामगार हे आर्थिक दृष्ट्या गरीब असतात त्यांना राहायला स्वतःचे घर नसते तसेच कामाच्या मोबदल्यात मिळणारे वेतन हे कमी असल्यामुळे ते स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे ते कच्च्या पडक्या घरात राहतात त्यामुळे त्यांना ऊन, वारा, पाऊस, थंडी यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे कामगारांच्या या सर्व समस्यांचा विचार करून कामगार मंडळाने कामगारांच्या कल्याणासाठी Maharashtra Bandhkam Kamgar Awas Yojana सुरु केली आहे.

अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) च्या अंमलबजावणीसाठी निवडलेले कार्यक्षेत्र व अर्ज करणाऱ्या नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारास अर्ज करावयाचे कार्यक्षेत्र

  • दिनांक 03 फेब्रुवारी 2018 च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेस मान्यता देण्यात आली असून सदर योजनेची अंमलबजावणी ही संचालक, राज्य अभियान संचालनालय (सुकाणू अभिकरण ) यांचे मार्फत करण्यात आलेली असून ही सुकाणू अभिकरण हे शहरी भागात कार्यरत आहे.
  • सदर योजनेंर्तगत शहरी भागातील निवडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पातील सदनिकेसाठी त्याच जिल्ह्यातील नोंदणीकृत (सक्रिय) असलेले बांधकाम कामगार मागणी करु शकतील. मात्र मुंबई, नवी मुंबई व ठाणे क्षेत्रातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील परिघामधील प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेल्या सदनिकेसाठी मागणी करु शकतील.

सदनिका उपलब्ध असणाऱ्या प्रकल्पाची माहिती, पात्रता तपासणी व लाभार्थी निवड

  • महारेरा अधिनियम 216 अन्वये नोंदणीकृत असलेल्या विकासकास प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर गृहनिर्माण प्रकल्पासाठी शासनाच्या वेगवेगळ्या विभागामार्फत सूट व सवलती देण्यात आलेल्या आहेत. त्यास अनुलक्षुन महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेंर्तगत शहरी भागातील प्रकल्पातील सदनिकेची किंमत, सदनिकेचे क्षेत्रफळ प्रमाणीत करणे, तसेच गृहनिर्माण प्रकल्पाचे स्थळ निश्चीत करुन त्याची यादी गृह निर्माण विभाग, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करेल. या यादीतील सदनिकेसाठी इच्छुक व पात्र होणा-या बांधकाम कामगारांची नावे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांनी संचालक, राज्य अभियान संचालनालयाकडे (सुकाणू अभिकरणास )सादर करावीत.
  • प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर प्रकल्पातील सदनिकांसाठी संचालक, राज्य अभियान संचालनालयाकडे (सुकाणू अभिकरणास ) प्राप्त झालेल्या अर्जापैकी नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांचे अर्ज, सदर अर्जाची पात्रता तपासण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे वर्ग करण्याची कार्यवाही संचालक, राज्य अभियान संचालनालय (सुकाणू अभिकरणास)यांनी करावी.
  • महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने संचालक, राज्य अभियान संचालनालय यांचेकडे (सुकाणू अभिकरणास )सादर केलेल्या यादीतील नावातून लाभार्थी म्हणून निवड करण्याचे अधिकार व त्यासाठी आवश्यक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार सुकाणू अभिकरणास राहतील. सुकाणू अभिकरणाने सदनिका वाटपाकरिता अंतिम केलेला नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगार लाभार्थी म्हणून मंडळाच्या अनुदानास पात्र राहील.
अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी)

Atal Bandhkam Kamgar Yojana चे उद्दिष्ट

  • राज्यातील कामगारांना स्वतःचे घर बांधण्यासाठी किंवा घर खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
  • कामगारांचे ऊन, वारा, पाऊस, थंडी यांपासून संरक्षण करणे.
  • कामगारांचे जीवनमान सुधारणे व त्यांचा सामाजिक विकास करणे.

अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) चे वैशिष्ट्य

  • शहरी भागातील बांधकाम कामगारांना स्वस्त घरे उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार द्वारे सुरु करण्यात आलेली अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) एक महत्वाची अशी योजना आहे.
  • योजनेअंतर्गत दिली जाणारी आर्थिक मदत थेट लाभार्थी कामगाराच्या बँक खात्यात जमा केली जाते.

अटल बांधकाम कामगार योजना चे लाभार्थी

  • राज्यातील बांधकाम क्षेत्रात तसेच इतर क्षेत्रात काम करणारे आर्थिक दृष्ट्या गरीब कामगार

Atal Bandhkam Kamgar Awas Yojana अंतर्गत दिला जाणारा लाभ

  • या योजनेअंतर्गत लाभार्थी कामगारांना स्वतःचे घर बांधण्यासाठी किंवा कच्च्या घराचे बांधकाम करण्यासाठी 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

अटल कामगार आवास योजना चे फायदे

  • या योजनेच्या सहाय्याने कामगारांना स्वतःचे घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळेल.
  • कामगार स्वतःच्या कच्च्या घराचे पक्क्या घरात बांधकाम करू शकतील.
  • कामगारांचे व कुटुंबाचे ऊन, वारा, पाऊस, थंडी यांपासून संरक्षण मिळेल.

Maharashtra Bandhkam Kamgar Awas Yojana अंतर्गत अर्ज करण्यासाठी बांधकाम कामगाराची पात्रता

दिनांक 03 फेब्रुवारी 2018 च्या शासन निर्णयान्वये जाहिर केलेल्या शहरी भागातील महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेतील सदनिकेसाठी अर्ज करण्यासाठी बांधकाम कामगारांची पात्रता खालील प्रमाणे राहील.

  • शहरी भागातील महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार हा नोंदणीकृत (सक्रिय) असावा तथापि तो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सलग एक वर्षापेक्षा अधिक, बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असावा.
  • बांधकाम कामगारांच्या नावे अथवा त्यांच्या पती/पत्नीच्या नावे स्वत:ची सदनिका नसेल असेच बांधकाम कामगार, शहरी भागातील महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील. तसे त्यांनी 100/- रुपये च्या मुद्रांकावर ( Stamp Paper) लेख प्रमाणक ( Notary) करुन देणे अनिवार्य राहील.

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र/प्रमाणित यादी
  • पॅन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
  • कायमचा पत्ता पुरावा
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
  • नोंदणी अर्ज
  • पासपोर्ट आकारातील 3 फोटो
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
  • नियोक्त्याचे मागील वर्षभरात 90 दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला (इंजिनिअर/ठेकेदार)
  • महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
  • ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
  • घोषणापत्र

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत अटी व शर्ती

  • अर्जदार कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार कामगार हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत व योजनेंतर्गत पात्र असावा.
  • कामगारांचे महाराष्ट्रातील वास्तव्य 15 वर्ष असावे.
  • तो नोंदीत कामगार असावा व नोंदणी चालू असावी.
  • कामगारांचे वय 18 वर्ष ते 60 वर्ष दरम्यान असावे.
  • सदनिका प्राप्त झाल्यापासून पुढील 5 वर्षापर्यंत कोणत्याही प्रकारे बांधकाम कामगारास सदनिका हस्तांतरीत करता येणार नाही.
  • महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेंर्तगत लाभास पात्र असणारा गृहनिर्माण प्रकल्प महारेरा अधिनियम, 2016 अंतर्गत नोंदणीकृत असावा.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगारास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • मंडळाकडे नोंदणी जिवीत असलेले पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील.
  • बांधकाम कामगार राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरु एखाद्या इतर योजनेचा लाभ घेत असता कामा नये.
  • योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणुन निवडलेला बांधकाम कामगार हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील 2 लक्ष अनुदानास पात्र आहे. मात्र सदर अनुदान संचालक, राज्य अभियान संचालनालय यांच्या अधिनस्त असलेल्या राज्य अभियान संचालनालयाकडे जमा करण्यात येईल.
  • अर्जदाराने मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे.
  • तो नोंदीत कामगार असावा व नोंदणी चालू असावी.

योजनेअंतर्गत कर्ज वितरण कार्यपद्धती

  • कामगारांच्या अर्जाची तसेच त्यांच्या कागदपत्रांची छाननी आणि पडताळणी केली जाते व पात्र कामगारांना आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

  • कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनांचे अर्ज
अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) अर्ज 1डाउनलोड
अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) अर्ज 2डाउनलोड
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्तायेथे क्लिक करा
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णययेथे क्लिक करा

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना

सामाजिक सुरक्षा योजना

कामगाराच्या विवाहाच्या खर्चासाठी 30,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसहाय्य
बांधकाम कामगार योजना अंतर्गत मध्यान्ह भोजन योजना
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
अटल पेन्शन योजना लाभ
कामगारांच्या पाल्यांना पाळणाघर सुविधा
कौशल्यवृद्धी योजना लाभ
बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभ
नोंदीत बांधकाम कामगारांकरिता ट्रांझिट कॅम्प ची सुविधा
प्रधानमंत्री आवास (ग्रामीण) योजना
घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना
कामगार व कामगार कुटुंबियांची लांब पल्ल्याची सहल
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड
योजनांचे अर्ज
सामाजिक सुरक्षा योजनांचे अर्ज 1डाउनलोड
सामाजिक सुरक्षा योजनांचे अर्ज 2डाउनलोड

शैक्षणिक योजना

परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती
क्रीडा शिष्यवृत्ती योजना
साहित्य प्रकाशन अनुदान योजना
इयत्ता 1ली ते 7वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 2500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
इयत्ता 8वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
इयत्ता 10वी व इयत्ता 12वी मध्ये किमान 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
इयत्ता 11वी व इयत्ता 12वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी 10,000/- रुपयाचे आर्थिक सहाय्य
कामगाराच्या मुलांना व पत्नीस पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
कामगाराच्या मुलांना व पत्नीस वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य
वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रतिवर्षी 60,000/- रुपये आर्थिक सहाय्य
शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 25,000/- रुपयाचे आर्थिक सहाय्य
नोंदीत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास MS-CIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती
बांधकाम कामगाराच्या आय आय टी वा तत्सम शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
कामगारांच्या पाल्यांना इंग्रजीच्या ट्युशन फीसाठी आर्थिक सहाय्य
बांधकाम कामगाराच्या पाल्यास पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी तसेच परदेशात उच्च शिक्षण घेण्याकरिता शिष्यवृत्ती
सर्वसाधारण शिष्यवृत्ती
कामगाराच्या पाल्यांना शिक्षणासाठी टॅबलेट व लॅपटॉप चे वितरण
बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक उपयोगाची पुस्तके भेट
योजनांचे अर्ज
शैक्षणिक योजनांचे अर्ज 1डाउनलोड
शैक्षणिक योजनांचे अर्ज 2डाउनलोड

आरोग्य विषयक योजना

नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
गंभीर आजार वैद्यकीय उपचार सहायता योजना
शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य (दोन जीवित अपत्यांसाठी)
लाभार्थी कामगार व त्याच्या कुटुंबाला गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1 लाखाचे आर्थिक सहाय्य
एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1 लाख रुपये मुदत ठेव बंद
अपघातात कामगाराला 75 टक्के अपंगत्व किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 2 लाखाची आर्थिक मदत
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ
कामगार दवाखान्यात भरती झाल्यास भरती काळापुरता त्याच्या पत्नीस दर दिवशी आर्थिक सहाय्य
कामगारांना जननी विमा योजनेचा लाभ
नोंदीत बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी
व्यसनमुक्ती करीता निधी
योजनांचे अर्ज
आरोग्य विषयक योजनांचे अर्ज 1डाउनलोड
आरोग्य विषयक योजनांचे अर्ज 2डाउनलोड

आर्थिक योजना

कामगार योजना ५०००
आत्महत्याग्रस्त कामगाराच्या कुटुंबास अर्थसहाय्य
कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 5 लाखाचे आर्थिक सहाय्य
शिवण मशीन अनुदान योजना
बांधकाम कामगार पेटी योजना
कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कायदेशी वारसास 2 लाखाचे आर्थिक सहाय्य
अनोंदीत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास अर्थसहाय्याचा लाभ
अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) अंतर्गत 2 लाखाचे अर्थसहाय्य
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत 2 लाखाचे अर्थसहाय्य
50 ते 60 वयोगटातील कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरिता 10 हजारांचे सहाय्य
कामगाराचा मृत्यू झाल्यास विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस 5 वर्षाकरिता 24 हजाराचे आर्थिक सहाय्य
नोंदीत बांधकाम कामगारांना घर खरेदी किंवा घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य
बांधकाम कामगारांना बोनस सुविधा
बांधकाम कामगारांना सायकल वाटप
साहित्य खरेदीसाठी आर्थिक सहाय्य
बांधकाम कामगारांना सुरक्षा संच (सेफ्टी किट) चा लाभ
बांधकाम कामगारांना वस्तू संच (Essential Kit) चा लाभ
बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वितरण
कामगार व त्यांच्या कुटुंबियांना स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण योजना
अटल बांधकाम कामगार आवास योजना
वाहन चालक प्रशिक्षण योजना
योजनांचे अर्ज
आर्थिक योजनांचे अर्ज 1डाउनलोड
आर्थिक योजनांचे अर्ज 2डाउनलोड

महत्वाच्या बाबी

कामगार कल्याण योजना
बांधकाम कामगार यादी
बांधकाम कामगार योजना फायदे
बांधकाम कामगार योजना अंतर्गत आवश्यक पात्रता
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे
बांधकाम कामगार योजना आवश्यक अटी व शर्ती
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय
बांधकाम कामगार संपर्क कार्यालय
बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म
बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्रे
Essential Kit Form PDF
Bandhkam Kamgar Safety Kit Form PDF Download
bocw Safety Kit Form PDF Download
Bandhkam Kamgar Nondani Maharashtra

कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे

बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो?
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची?
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का?
असंघटित कामगार म्हणजे काय?
कामगार कल्याण योजना काय आहेत?

बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी

बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा

बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण

आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा

बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा

उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना

सर्वसाधारण शिष्यवृत्ती
परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती
क्रीडा शिष्यवृत्ती
पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य
MS-CIT अर्थसहाय्य
साहित्य प्रकाशन अनुदान
शिवण मशीन अनुदान योजना
गंभीर आजार उपचार अर्थसहाय्य
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
आत्महत्याग्रस्त कुटुंबास अर्थसहाय्य
कामगार व कामगार कुटुंबियांची लांब पल्ल्याची सहल
वाहन चालक प्रशिक्षण
इंग्रजीसह विदेशी भाषा संभाषण प्रशिक्षण
स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
दूरध्वनी क्र022-24306717 / 43226825
फॅक्स क्र022-42210019
ई-मेलmlwbpro53@gmail.कॉम
पत्तामका / ग्रंथालय / 17 -18 / 165
हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन,
सेनापती बापट मार्ग,
एलफिन्स्टन, मुंबई 400013
कामगार योजना लिस्ट