जो पर्यंत कामगारांचे हाथ पाय सुरु असतात तो पर्यंत त्याला आर्थिक उत्पन्न मिळत असते परंतु वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर त्याच्याजवळ उत्पन्नाचे कुठल्याच प्रकारचे साधन नसते व अशा वेळी कामगाराला तो आजारी पडल्यास औषोधोपचारासाठी किंवा अन्य बाबींसाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
त्यामुळे कामगारांना त्यांच्या वृधोपकाळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत अटल पेंशन योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.
योजनेअंतर्गत वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर लाभार्थाला दरमहा 5,000/- रुपये पेन्शन मिळते. त्यामुळे या योजनेतंर्गत अल्पबचत करुन उतार वयात महिन्याचा औषधांचा खर्च भागविता येतो.
- 18 वर्षाच्या पुढील कोणताही कामगार या योजनेत सहभागी होऊ शकतो. वयाच्या 18 व्या वर्षी जास्तीत जास्त 5,000/- महिन्यांच्या पेन्शन मर्यादेसाठी कामगाराला दरमहा 210/- रुपये जमा करावे लागतील.
- वयाच्या 25 व्या वर्षी जोडल्यास योगदान दरमहा 376/- रुपये
- 30 वर्षे वय असलेल्यांसाठी 577/- रुपये
- 35 वर्षांच्या लोकांसाठी 902/- रुपये आणि
- 39 वर्षे वयाच्यांसाठी 1318/- रुपये योगदान आहे.
वयोमर्यादा | भरावयाची रक्कम |
वयाच्या 18 व्या वर्षी | 210/- रुपये |
वयाच्या 25 व्या वर्षी | 376/- रुपये |
वयाच्या 30 व्या वर्षी | 577/- रुपये |
वयाच्या 35 व्या वर्षी | 902/- रुपये |
वयाच्या 39 व्या वर्षी | 1318/- रुपये |
Kamgar Pension Yojana चे उद्दिष्ट
- कामगाराला त्याच्या उतरत्या वयात पेंशन च्या रूपाने आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.
- म्हातारपणी कामगारांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी पैशासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये.
Kamgar Pension च्या अटी व शर्ती
- कामगारांचे वय 40 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये.
- किमान 20 वर्षे मासिक पैसे जमा करणे बंधनकारक आहे.
योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवाशी दाखला
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- कायमचा पत्ता पुरावा
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
- नोंदणी अर्ज
- पासपोर्ट आकारातील 3 फोटो
- बँक पासबुक झेरॉक्स
- जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
- नियोक्त्याचे मागील वर्षभरात 90 दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला (इंजिनिअर/ठेकेदार)
- महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- घोषणापत्र
योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
- कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनांचे अर्ज | |
बांधकाम कामगार अटल पेंशन योजना चा अर्ज 1 | डाउनलोड |
Kamgar Pension Yojana चा अर्ज 2 | डाउनलोड |
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्ता | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |