योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांना MS-CIT शिक्षणाच्या शुल्काची संपूर्ण रक्कम परत केली जाते. पाल्यांना प्रथम स्वखर्चाने MS-CIT प्रशिक्षण फी भरावे लागेल व प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणात उत्तीर्ण झाल्यावर शुल्काची संपूर्ण रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) या संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एमएससीआयटी हा संगणक अभ्यासक्रम उत्तीर्ण करणाऱ्या कामगार व कामगार कुंटुबियांना MKCL या संस्थेस भरलेल्या 100 टक्के शुल्क रक्कमेच्या 50 टक्के रक्कम सहाय्यता म्हणून मंजूर करण्याची मंडळाची योजना आहे. मध्यवर्ती कार्यालयाच्या उपरोक्त संदर्भिय परिपत्रकान्वये एमएस-सीआयटी परिक्षेबाबत योजनेचे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. सदर योजनेच्या नियम व अटीमध्ये बदल करण्यात येत असून सुधारीत नियम व अटी पुढील प्रमाणे आहेत.
एमएस-सी आयटी (MSCIT) अर्थसहाय्य योजनेचे उद्दिष्ट
- नोंदणीकृत कामगाराच्या दोन पाल्यांना MS-CIT प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे.
- कामगारांच्या पाल्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे.
योजनेचे वैशिष्ट्य:
- लाभाची राशी कामगाराच्या बँक खात्यात जमा केली जाते.
- एका कुटुंबातील कामगाराची दोन पाल्य मोफत संगणक प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाते.
योजनेचे लाभार्थी:
- कामगाराच्या कुटुंबातील दोन मुले/मुली
मोफत MSCIT प्रशिक्षण योजना चे नियम व अटी:
- एमएससीआयटी हा अभ्यासक्रम स्वतः कामगार किंवा कामगार कुटुंबियांनी उत्तीर्ण केल्यास त्यांना योजनेचा लाभ घेता येईल.
- सदर योजनेचा एका कुटुंबातील एका व्यक्तीस एकदाच लाभ घेता येईल.
- या योजनेकरीता अर्ज सादर करणाऱ्या व्यक्तींना कामगार केंद्राचे सर्वसाधारण सभासद होणे आवश्यक आहे.
- या योजनेकरीता एमएससीआयटी अभ्यासक्रमासाठी 6 0टक्के गुण घेवून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
- एमएससीआयटी अभ्यासक्रमासाठी MKCL कडे भरलेल्या शुल्काची पावती जोडणे आवश्यक आहे.
- MKCL च्या मान्यताप्राप्त संस्थेतून एमएससीआयटी अभ्यासक्रम पूर्ण करुन परिक्षा उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
- अर्जदाराची स्वतःची / पालकाची माहे जून / डिसेंबर या महिन्याची वेतन पावती अर्जासोबत जोडावी. सदर पावती मध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा कामगार कल्याण निधी कपात केल्याचा उल्लेख असावा.
- ज्या आस्थापना कामगारांच्या वेतनाच्या पावतीमध्ये कामगार कल्याण निधी कपात केल्याचा उल्लेख करत नसतील अशा कामगारांनी आस्थापनेकडून त्यांच्या पगारातून कामगार कल्याण निधी कपात होत असल्या बाबतचा दाखला अर्जासोबत जोडावा. सदर दाखल्यात मंडळाकडील नोंदणी क्रमांक नमूद केलेला असावा.
- कामगार कुटुंबिय सभासदांनी कामगार कुटुंबिय असल्याचे पुराव्याकरीता रेशनकार्डची प्रत सोबत जोडावी.
- अर्जासोबत ओळखपत्र म्हणून आधारकार्ड / पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र / शाळा किंवा कॉलेजचे ओळखपत्र यापैकी एक जोडणे आवश्यक आहे.
- अर्जदारांनी अर्ज सादर करतांना मागील 1 वर्षामध्ये एमएससीआयटी कोर्स उत्तीर्ण केलेला असावा.
- अर्ज सादर करण्याची मुदत दरवर्षी 1 एप्रिल ते 31 डिसेंबर अशी राहिल.
- अर्जदारांनी एमएस.सीआयटी अभ्यासक्रमासाठी MKCL या संस्थेकडे नियमानुसार प्रत्यक्ष भरलेल्या एकूण शुल्क रक्कमेच्या 50 टक्के रक्कम सहाय्यता म्हणून मंजूर करण्यात येईल.
- या योजनेमध्ये कामगार / कामगार कुटुंबिय अपंग अर्जदार असल्यास त्यांना 50 टक्के ऐवजी 10 टक्के सहाय्यता मंजूर करण्यात येईल.
अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे:
- एमएस-सीआयटी परिक्षा किमान 60 टक्के उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्राची साक्षांकीत झेरॉक्स प्रत.
- MS – CIT शुल्काची पावती
- स्वतः किंवा पालक ज्या आस्थापनेत काम करतात तेथील माहे जुन / डिसेंबर ची पगार स्लीपची साक्षांकीत झेरॉक्स प्रत. ( त्यात कामगार कल्याण निधि कपात असावी. पगार स्लीप मिळत नसेल तर तेथील व्यवस्थापकाच्या सहीचा निधी कपातीचा दाखला मंडळाच्या नोंदणीकृत क्रमांकासह जोडावा.)
- एमएस-सीआयटी परिक्षेकरीता भरलेल्या फीच्या पावतीची साक्षांकीत सत्यप्रत.
- रेशन कार्ड / निवडणुक ओळखपत्र / आधार कार्ड / शाळा किंवा कॉलेजचे ओळखपत्र सत्यप्रत
- रेशन कार्डाची साक्षांकीत सत्यप्रत.
मोफत MSCIT प्रशिक्षण योजना अंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत
- कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
अर्जदाराला सर्वात प्रथम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
होम पेज वर सभासद मध्ये योजनांसाठी अर्ज वर क्लिक करावं लागेल.
आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या योजनेसमोर Apply Now बटनावर क्लिक करावे लागेल.
आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भर तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट बटनावर क्लिक करा.
अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |