बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो?: राज्य शासनाने कामगारांच्या हितासाठी इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे व या मंडळाअंतर्गत विविध क्षेत्रातील कामगारांना विविध प्रकारचे आर्थिक सहाय्य केले जाते. परंतु बहुतांश कामगारांना या मंडळाची माहिती नाही व ज्या कामगारांना या कल्याणकारी मंडळाची माहिती आहे त्यांना माहिती नाही की बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? त्यामुळे कामगारांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे त्यामुळे या आर्टिकल मध्ये आम्ही त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांच्या प्रश्नांचे समाधान करणार आहोत.
इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील कामगार तसेच (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ च्या कलम (७) अन्वये सदर अधिनियम लागू असलेले सर्व आस्थापना नोंदणी करू शकतात.
मजुरांची संख्या | शुल्क |
50 पर्यंत | 250/- रुपये |
50 पेक्षा अधिक पण 100 पेक्षा कमी | 500/- रुपये |
100 पेक्षा अधिक पण 300 पेक्षा कमी | 1000/- रुपये |
300 पेक्षा अधिक पण 500 पेक्षा कमी | 2000/- रुपये |
500 पेक्षा अधिक | 2500/- रुपये |

खालील क्षेत्रातील कामगार बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो
- इमारती बांधकामामध्ये काम करणारे कामगार
- स्टॉर्म वॉटर ड्रेनेज वर्क्ससह
- निर्मिती क्षेत्रातील कामगार
- रस्त्यावर काम करणारे कामगार
- रस्ते बांधणी / दुरुस्तीचे काम करणारे कामगार
- रेल्वे मध्ये काम करणारे काम करणारे कामगार
- ट्रामवेज
- एअरफील्ड
- सिंचन करणारे कामगार
- ड्रेनेज क्षेत्रातील कामगारटनेल निर्माण क्षेत्राशी निगडित कामगार
- पुल निर्माण क्षेत्राशी निगडित कामगार
- पदवीधर कामगार
- तटबंध आणि नेव्हिगेशन वर्क्स
- नद्या क्षेत्राशी निगडित कामगार
- रक्षक क्षेत्रातील कामगार
- पारेषण आणि पॉवर वितरण मधील कामगार
- पाणी वितरणासाठी चॅनल समाविष्ट करणे
- तेल आणि गॅसची स्थापना कामगार
- इलेक्ट्रिक लाईन्स कामगार
- वायरलेस क्षेत्रात काम करणारे कामगार
- रेडिओ क्षेत्रात काम करणारे कामगार
- दूरदर्शन क्षेत्रातील कामगार
- दूरध्वनी क्षेत्रातील कामगार
- टेलीग्राफ आणि ओव्हरसीज कम्युनिकेशन्स.
- डॅम क्षेत्रातील कामगार
- नद्या क्षेत्राशी निगडित कामगार
- रक्षक क्षेत्रातील कामगार
- पाणीपुरवठा क्षेत्रातील कामगार
- अग्निशमन यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे
- वातानुकूलित यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे
- उद्वाहने, स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे
- सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसविणे
- जलविद्युत क्षेत्राशी निगडित कामगार
- पाइपलाइन क्षेत्राशी निगडित कामगार
- टावर्स क्षेत्राशी निगडित कामगार
- कूलिंग टॉवर्स क्षेत्राशी निगडित कामगार
- ट्रान्समिशन टावर्स आणि अशा इतर कार्य
- दगड कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे
- लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे
- रंग, वॉर्निश लावणे, इत्यादीसह सुतारकाम
- गटार व नळजोडणीची कामे
- वायरिंग, वितरण, तावदान बसविणे इत्यादीसहित विद्युत कामे
- स्वयंपाकखोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोडुलर (आधुनिक) युनिट बसविणे.
- सिमेन्ट काँक्रिटच्या साचेबद्ध वस्तू इत्यादी तयार करणे व बसविणे
- लोखंडाच्या किंवा धातुच्या ग्रिल्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे व बसविणे
- कारखाना अधिनियम, 1948 खाली समावेश नसलेल्या विटा, छप्परांवरील कौल इत्यादी तयार करणे
- सौर तावदाने इत्यादींसारखी ऊर्जाक्षम उपकरण बसविणे
- जलतरण तलाव, गोल्फचे मैदान इत्यादीसह खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम करणे
- माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवाशी निवारे किंवा बसस्थानके, सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे
- रोटरीजचे बांधकाम करणे, कारंजे बसविणे इत्यादी
- सार्वजनिक उद्याने, पदपथ, रमणीय भू-प्रदेश इत्यादींचे बांधकामजलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे
- सुतारकाम करणे, आभाशी छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पेरीस यांसहित अंतर्गत (सजावटीचे) काम
- काच कापणे, काचरोगण लावणे व काचेची तावदाने बसविणे.
बांधकाम कामगार योजनेचा अर्ज भरताना अर्जदाराला आवश्यक सूचना
इमारत व इतर बांधकाम कामावर काम करणारे (दि. 18/08/2017 च्या अधिसूचनेनुसार समाविष्ट 21 प्रकारच्या कामांपैकी) व वय वर्षे 18 ते 60 या वयोगटातील कामगार मंडळाकडे नोंदणी करू शकतात.
नोंदणीकरीता नोंदणी फी 25/- रुपये (एकदाच ) व मासिक वर्गणी 1/- रुपये प्रमाणे 5 वर्षाकरिता 60/- रुपये जमा करणे आवश्यक आहे.
कामाचे स्वरूप : बांधकाम कामगर काम करीत असलेल्या बार बेंडर / विटभट्टी कामगार / सुतारकाम / सेंटरिंग / खोदकाम / वीज जोडणी (वायरमन) / अभाशी छत बसविणारा / फिटर / मदतनीस / अंतर्गत सजावट करणारा / हेवी इंजी. कंस्ट/ संगमरवर व काद्याची कामे करणारे / गवंडी / बांधकामाच्या ठिकाणी मिक्सर किंवा रोलर चालवणारा/ मिक्सर किंवा यंत्रचालक / मोझेक कामगार / पोलीशिंग कामगार / नगरपालिकेचे गटारकाम करणारे / रंगकाम किंवा वार्निश करणारा / गटारकाम किंवा नळजोडणीचे काम करणारा/खाणकामगार/स्पॅरीमॅन किंवा मिक्सर ( रोड सर्फिंग) दगड कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणारे / थॅटचर किंवा लोहार किंवा सेवर किंवा कॉलकर/बांधकामाच्या ठिकाणावरील सुरक्षा रक्षक / वेल्डर/वेल सिंकर/ वुडन किंवा स्टोन पॅकर/समुद्राच्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे काम करणारे / चुनाभट्टीचे काम करणारे / इतर यापैकी योग्य कामाचा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा.
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |