नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पत्नीस शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल.
शस्त्रक्रियेद्वारे केल्या जाणाऱ्या प्रसूतीमध्ये डॉक्टरांचे शुल्क, रुग्णालयाचा खर्च, शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला आवश्यक औषधे आणि इतर इतर खर्च यांचा समावेश असतो आणि यासाठी जास्त खर्च असतो. आणि कामगारांचे मासिक उत्पन्न हे अत्यंत कमी असते जे कामगाराला परवडण्यासारखे नसते त्यामुळे कामगाराला पैसे जमा करण्यासाठी खूप साऱ्या परिस्थितींना सामोरे जावे लागते तसेच स्वतःचे दागिने गहाण ठेवावे लागतात. त्यामुळे कामगारांच्या या सर्व समस्यांचा विचार करून इमारत व बांधकाम कामगार मंडळाने सदर योजनेची सुरुवात केली आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थी कामगाराला दिली जाणारी लाभाची राशी कामगाराच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा केली जाते.
उद्दिष्ट
- कामगाराला त्याच्या पत्नीच्या शस्त्रक्रियेद्वारे केल्या जाणाऱ्या प्रसूतीसाठी आर्थिक सहाय्य देणे.
- कामगारांवरचा आर्थिक भर कमी करणे.
- बाळाचे आरोग्य सुधारणे.
- कामगारांची सुरक्षा वाढवणे.

योजनेचे लाभार्थी
- आर्थिकदृष्ट्या गरीब कामगारांच्या पत्नीला या योजनेचा लाभ दिला जातो.
योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य
- या योजनेअंतर्गत कामगाराच्या पत्नीस शस्त्रक्रियेद्वारे केल्या जाणाऱ्या प्रसूतीसाठी 20 हजारांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
अर्ज मंजूर होण्यासाठी लागणारा कालावधी
- अर्ज मंजूर होण्यासाठी साधारणपणे 15 दिवसांचा कालावधी लागतो.
योजनेचा फायदा
- प्रसूतीनंतर माता आणि त्याच्या बाळाला आवश्यक पोषक आहार देणे कामगाराला शक्य होईल त्यामुळे बाळ कुपोषित राहणार नाही व त्याचे आरोग्य सुदृढ राहील.
- योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे कामगारावरचा आर्थिक भार कमी होईल व हॉस्पिटल चा खर्च देणे शक्य होईल.
योजनेच्या अटी व शर्ती
- अर्जदार कामगार हा बांधकाम कामगार मंडळात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
- कामगाराच्या पत्नीची शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झालेली असणे आवश्यक आहे.
- कामगाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा जास्त नसावे.
- योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
- पत्नीची पहिली किंवा दुसरी प्रसूती असणे आवश्यक आहे.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड (कामगार / कामगाराची पत्नी)
- कामगारांचे मंडळात नोंदणी प्रमाणपत्र
- शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झाल्याबाबतचे प्रमाणपत्र
- डिस्चार्ज कार्ड
- विवाह प्रमाणपत्र
- कामगाराच्या बँक खात्याची माहिती
अर्ज करण्याची पद्धत
- कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनांचे अर्ज | |
योजनेचा अर्ज 1 | डाउनलोड |
योजनेचा अर्ज 2 | डाउनलोड |
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्ता | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |