महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी उपयुक्त अशा विविध योजना राबवल्या जातात. व या योजनांसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक असते. परंतु बहुतांश कामगारांना अर्ज कोठे मिळतो याबद्दल माहिती नसते त्यामुळे आम्ही बांधकाम कामगारांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचे अर्ज खाली दिलेले आहेत.
बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म PDF | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार नूतनीकरण फॉर्म | येथे क्लिक करा |
ग्रामसेवक / महानगरपालिका / नगरपरिषदेतर्फे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात 90 किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र नोंदणी व नुतणीकरण करण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले नविन 90 दिवसांचे प्रमाणपत्र वापरण्यात यावे. | येथे क्लिक करा |
बांधकाम कंत्राटदाराचे /ठेकेदाराचे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात 90 किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र | येथे क्लिक करा |
ऑनलाइन नोंदणीसाठी आधार संमती फॉर्म | येथे क्लिक करा |
ऑनलाइन नोंदणीसाठी स्वयंघोषणापत्र | येथे क्लिक करा |
सामाजिक सुरक्षा योजना फॉर्म
नोंदीत बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी 30,000/- रुपये | येथे क्लिक करा |
व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप | येथे क्लिक करा |
नोंदीत बांधकाम कामगारास हत्यारे /अवजारे खरेदी करण्याकरिता 5000/- रुपये अर्थसहाय्य | येथे क्लिक करा |
नोंदीत बांधकाम कामगारांसाठी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना | येथे क्लिक करा |
नोंदीत बांधकाम कामगारासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना | येथे क्लिक करा |
नोंदीत बांधकाम कामगारासाठी कौशल्य वृद्धीकरण योजना | येथे क्लिक करा |
शैक्षणिक योजना फॉर्म
नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना 1ली ते 7वी साठी प्रतिवर्षी 2500/- रुपये किंवा इयत्ता 8वी ते इयत्ता 10वी साठी प्रतिवर्षी 5000/- रुपये | येथे क्लिक करा |
नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता 10वी व 12वी मध्ये 50% किंवा अधिक गुण मिळाल्यास 10,000/- रुपये | येथे क्लिक करा |
नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता 11वी व 12वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी 10,000/- रुपये | येथे क्लिक करा |
नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस पदवी च्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी 20,000/- रुपये | येथे क्लिक करा |
नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी 1,00,000/- रुपये व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता 60,000/- रुपये | येथे क्लिक करा |
नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा पहिल्या दोन पाल्यांना शासनमान्य पदविकेकरिता प्रतिवर्षी 20,000/- रुपये व पदव्युत्तर पदविकेकरिता 25,000/- रुपये | येथे क्लिक करा |
नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना संगणकाचे शिक्षण MSCIT करिता शुल्काची प्रतिपूर्ती | येथे क्लिक करा |
आरोग्य विषयक योजना फॉर्म
नोंदीत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन जीवित अपत्यांच्या नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000/- रुपये व शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी 20,000/- रुपये | येथे क्लिक करा |
नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ 1,00,000/- रुपये (आरोग्यविमा योजना लागू नसल्यासच) | येथे क्लिक करा |
पती/पत्नीने पहिला मुलीच्या जन्मानंतर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत 18 वर्षापर्यंत 1,00,000/- रुपये मुदत बंद ठेव | येथे क्लिक करा |
नोंदीत बांधकाम कामगारास 75% अपंगत्व आल्यास 2,00,000/- रुपये अर्थसहाय्य | येथे क्लिक करा |
नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना | येथे क्लिक करा |
अर्थसहाय्य योजना फॉर्म
नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास 5,00,000/- रुपये | येथे क्लिक करा |
नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2,00,000/- रुपये | येथे क्लिक करा |
नोंदणीकृत बांधकाम कामगाराला घरखरेदी किंवा घरबांधणीकरता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील 6 लाख पर्यतच्या व्याजाची रक्कम अथवा 2 लाख अनुदान | येथे क्लिक करा |
नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधी करिता 10,000/- रुपये | येथे क्लिक करा |
नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस 24,000/- रुपये (5 वर्षांकरिता) (प्रति वर्षी अर्ज करणे आवश्क्य राहील) | येथे क्लिक करा |
अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवाशी पुरावा
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- वयाबाबतचा पुरावा
- बँक पासबुक झेरॉक्स
- रेशन कार्ड
- 90 दिवसापेक्षा जास्त काम केल्याचा पुरावा
- हमीपत्र
- शपथपत्र
- विवाह प्रमाणपत्र (एखाद्या योजनेसाठी आवश्यक)
- पहिल्या विवाहाचे प्रमाणपत्र (एखाद्या योजनेसाठी आवश्यक)
- पाल्याचे शालेय उपस्थिती प्रमाणपत्र (एखाद्या योजनेसाठी आवश्यक)
- बोनाफाईड प्रमाणपत्र (एखाद्या योजनेसाठी आवश्यक)
- वैद्यकीय खर्चाची पावती (एखाद्या योजनेसाठी आवश्यक)
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र (एखाद्या योजनेसाठी आवश्यक)
- अपंगत्वाचे प्रमाणपत्र (एखाद्या योजनेसाठी आवश्यक)
- मृत्यू प्रमाणपत्र (एखाद्या योजनेसाठी आवश्यक)
- एफआयआर प्रमाणपत्र (एखाद्या योजनेसाठी आवश्यक)
काही महत्वाच्या गोष्टी
- फक्त पात्र कामगारच या योजनांसाठी अर्ज करू शकतात.
- अर्ज करण्यापूर्वी, पात्रता निकष आणि योजनांच्या अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचा.
- सर्व आवश्यक कागदपत्रे योग्यरित्या स्कॅन करून अपलोड करा.
- तुमचा अर्ज पूर्णपणे आणि योग्यरित्या भरा.
- अर्जात चुकीची किंवा खोटी माहिती भरू नका.
- तुम्ही तुमचा अर्ज त्रुटीमुक्त आणि पूर्ण असल्याची खात्री करा.
- वेळेवर आवश्यक कागदपत्रे सादर करा.
- अधिक माहितीसाठी तुम्ही महाबोर्डच्या संपर्क क्रमांकावर कॉल करू शकता किंवा जवळच्या कार्यालयाला भेट देऊ शकता.
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |