प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर दरमहिना 3,000/- रुपये इतकी पेन्शन रक्कम दिली जाते.
लाभार्थ्यांची पेन्शन रक्कम ही त्याच्या प्रीमियम रकमेवर अवलंबून असेल त्याने जेवढी योगदान रक्कम भरलेली आहे त्या रकमेनुसार सरकार तुमच्या खात्यात दरमहिना पैसे जमा करेल.
योजनेचा लाभ
- वय वर्ष 60 पूर्ण केल्यानंतर दरमहा 3,000/- रुपये मानधन रक्कम दिली जाईल.
- लाभार्थी कामगारांचा मृत्यू झाल्यास त्याच्या वैवाहिक जोडीदारास योजना सुरु ठेवता येईल.
- लाभार्थीस स्वेच्छेने योजनेतून बाहेर पडावयाचे झाल्यास जमा केलेल्या अंशदानासह व्याजाची रक्कम परत दिली जाईल.
बांधकाम कामगार प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना अंतर्गत आवश्यक पात्रता
- असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणारा वय वर्ष 18 ते 40 दरम्यानचा कामगार
- मासिक उत्पन्न 15,000/- रुपयांपॆक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- कर्मचारी राज्य बिमा निगम, भविष्य निर्वाह निधी अथवा राष्ट्रीय पेन्शन योजनेचा सभासद नसावा.
- अर्जदाराने मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे.
केंद्र शासनाचे कामगार व रोजगार मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत नोंदणीची कार्यपध्दती खालीलप्रमाणे आहे.
- योजनेमध्ये असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणारा वय वर्ष 18 ते 40 दरम्यानचा कामगार, मासिक उत्पन्न 15,000/- रुपये पेक्षा कमी असणारा व कर्मचारी राज्य बिमा निगम, भविष्य निर्वाह निधी अथवा राष्ट्रीय पेन्शन योजनेचा सभासद नसणारा कामगार पात्र आहेत.
- 18 ते 40 वयोगटातील लाभार्थीने 55/- रुपये ते 200/- रुपये पर्यंत प्रतिमाह (वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत) अंशदान जमा केल्यानंतर लाभार्थीस वयाची 60 वर्ष पुर्ण केल्यानंतर दरमहा किमान 3000/- रुपये निवृत्तीवेतन देय राहिल.
- योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी लाभार्थीस नजिकच्या नागरी सुविधा केंद्रास (Common Service Centres) भेट दयावी लागेल.
बांधकाम कामगार प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवाशी दाखला
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- कायमचा पत्ता पुरावा
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
- नोंदणी अर्ज
- पासपोर्ट आकारातील 3 फोटो
- बँक पासबुक झेरॉक्स
- जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
- नियोक्त्याचे मागील वर्षभरात 90 दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला (इंजिनिअर/ठेकेदार)
- महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- घोषणापत्र
बांधकाम कामगार प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना अंतर्गत महत्वाच्या बाबी
- नागरी सुविधा केंद्रामार्फत बँक खात्याचा तपशील, ई-मेल आयडी, वारसदार (पती- पत्नी) व भ्रमणध्वणी क्रमांक याबाबतचा तपशील अद्यावत केला जाईल.
- लाभार्थीच्या वयानुसार अंशदानाची रक्कमेची गणना ऑनलाईन सिस्टीमद्वारे करण्यात येईल.
- योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी, पात्र लाभार्थीच्या वयानुसार, पहिल्या मासिक अंशदानाची रक्कम रोखीने अदा करावी लागेल. अंशदानाची रक्कम भरणा केल्याची पावती संबंधीत नागरी सुविधा केंद्राकडून लाभार्थीस देण्यात येईल.
- दुसऱ्या मासिक अंशदानापासून लाभार्थीचे अंशदानाची रक्कम लाभार्थीचे बँक खात्यातुन परस्पर कपात (Auto-Debit) करण्यात येईल.
- लाभार्थीने योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी योजनेच्या अटी व शर्ती मान्य असल्याबाबत स्वाक्षरी केलेले स्वंयघोषणा पत्र व छापील सहमती पत्र, स्कॅन करण्यात येऊन सिस्टीमवर अपलोड करण्यात येईल.
- पहिले मासिक अंशदान जमा केल्यानंतर प्रधान मंत्री श्रम योगी मानधन योजनेंतर्गत LIC द्वारे पेन्शन खाते क्रमांक जारी करण्यात येईल.
- नोंदणीची प्रकिया पुर्ण झाल्यानंतर लाभार्थीस प्रधानमंत्री श्रम योगी मानधन कार्ड व स्वाक्षरी केलेले स्वंयघोषणा पत्र देण्यात येईल.
- प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना खाते सुरू झाल्यानंतर लाभार्थीस लाभार्थीचे बॅंक खात्यातुन परस्पर कपात केलेल्या अंशदानाची माहीती एसएमएस द्वारे देण्यात येईल.
बांधकाम कामगार प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
- कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनांचे अर्ज | |
योजनेचा अर्ज 1 | डाउनलोड |
योजनेचा अर्ज 2 | डाउनलोड |
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्ता | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |