राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार हे आर्थिक दृष्ट्या गरीब असतात तसेच ते कमी वेतनात काम करत असतात त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती कमकुवत असते व आर्थिक स्थिती गरीब असल्या कारणामुळे त्यांना त्यांचा विवाह करण्यासाठी लागणार खर्च परवडण्यासारखा नसतो व त्यामुळे त्यांना स्वतःचा विवाह करण्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो तसेच त्यांना विवाहासाठी आवश्यक पैशांसाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते तसेच त्यांना जास्त व्याज दराने कर्ज घ्यावे लागते त्यामुळे राज्यातील कामगारांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाच्या कामगार विभागाने नोंदीत कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी 30,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचा विचार केला.
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी 30,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. व लाभाची राशी लाभार्थी कामगाराच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.

योजनेचे उद्दिष्ट
- राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या पहिल्या विवाहासाठी आवश्यक पैशांसाठी आर्थिक सहाय्य करणे.
- कामगारांना विवाहासाठी आवश्यक पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची गरज भासू नये.
योजनेचे वैशिष्ट्य
- योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी कामगाराच्या बँक खात्यात जमा केली जाते.
योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य
- योजनेअंतर्गत लाभार्थी कामगाराला त्याच्या पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी 30,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले केले जाते.
अर्जदारासाठी आवश्यक पात्रता व अटी
- अर्जदार कामगार हा नोंदणीकृत कामगार असणे आवश्यक आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराची वार्षिक उत्पन्न मर्यादा ₹6 लाख असावी.
- फक्त पहिल्या विवाहासाठीच अर्थसहाय्य दिले जाईल.
अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- विवाह नोंदणी प्रमाणपत्र
- प्रथम विवाह असल्याबाबतचे प्रमाणपत्र
- रहिवाशी दाखला
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- कायमचा पत्ता पुरावा
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
- नोंदणी अर्ज
- पासपोर्ट आकारातील 3 फोटो
- बँक पासबुक झेरॉक्स
- जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
- ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- घोषणापत्र
योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
- कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनांचे अर्ज | |
योजनेचा अर्ज 1 | डाउनलोड |
योजनेचा अर्ज 2 | डाउनलोड |
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्ता | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय | येथे क्लिक करा |
योजनेअंतर्गत सामान्यतः विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे [FAQ]
प्रश्न: 1. ही योजना कोणासाठी आहे?
उत्तर: जे कामगार इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळांतर्गत नोंदणीकृत आहेत त्या महिला व पुरुष कामगारांसाठी लागू आहे.
प्रश्न: 2. या योजनेअंतर्गत किती आर्थिक सहाय्य मिळते?
उत्तर: या योजनेअंतर्गत पात्र कामगाराला पहिल्या विवाहाच्या प्रतिपूर्ती साठी 30,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
प्रश्न: 3. कोणत्या प्रकारच्या विवाहासाठी हे सहाय्य लागू आहे?
उत्तर: कोणत्याही कायदेशीर विवाहासाठी ही मदत लागू आहे मग तो प्रेमविवाह असो किंवा पारंपारिक विवाह असो
प्रश्न: 4. या योजनेसाठी पात्रता काय आहे?
उत्तर: अर्जदार कामगार हा बांधकाम कामगार मंडळअंतर्गत नोंदणीकृत कामगार असावा आणि त्याने किमान ठरावीक कालावधीसाठी योगदान दिलेले असावे. त्याच्या नोंदणीचे एकदा तरी नूतनीकरण झालेले असणे आवश्यक आहे. तसेच त्याने बांधकाम क्षेत्रात 90 दिवस काम केलेले असणे आवश्यक आहे.
प्रश्न: 5. या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
उत्तर: कामगारांचे आधार कार्ड, विवाहाचा नोंदणी प्रमाणपत्र, कामगार ओळखपत्र किंवा नोंदणी क्रमांक, बँक खात्याचा तपशील (पासबुक किंवा रद्द केलेला चेक)
प्रश्न: 6. अर्ज कुठे आणि कसा करायचा?
उत्तर: अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्थानिक कामगार कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन करता येतो.
प्रश्न: 7. आर्थिक सहाय्य कधी मिळते?
उत्तर: सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर आर्थिक सहाय्य लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.
प्रश्न: 8. जर दोन्ही नवरा-बायको कामगार असतील तर दोघांनाही लाभ मिळेल का?
उत्तर: नाही अशा परिस्थितीत लाभ फक्त एका कामगाराला (नवरा किंवा बायको) दिला जातो.
प्रश्न: 9. अर्ज कोणत्या कालावधीत करावा लागतो?
उत्तर: विवाहानंतर ठरावीक कालावधीमध्ये अर्ज करणे आवश्यक आहे अन्यथा अर्ज फेटाळला जाऊ शकतो.
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |