कामाच्या ठिकाणी कामगारास 75% किंवा कायम स्वरूपाचे अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल.
बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना कामाच्या ठिकाणी अनेक धोक्यांना सामोरे जावे लागते यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. अपघातात त्यांना अपंगत्व येते तर कधी कधी त्यांचा मृत्यू देखील होतो. या सर्व गोष्टींचा विचार करून कामगार मंडळाने कामगाराला आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने सदर योजनेची सुरुवात केली.
उद्दिष्ट
- कामगाराला अपंगत्व आल्यास त्याला त्याचे पुढील जीवन जगण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने सदर योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- कामगारांना सुरक्षेची हमी देणे.
- कामगाराला अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबावर आर्थिक ताण पडू नये.
योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी पात्र कामगार
- नोंदणीकृत कामगार
योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य
- नोंदित लाभार्थी कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या नामनिर्देशित केलेल्या वारसास 10,000/- रुपये रक्कम अंत्यविधीसाठी मदत.
- नोंदित लाभार्थी कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराचे विधुर पतीस प्रतीवर्षी 24,000/- रुपये आर्थिक सहाय्य. (फक्त पाच वर्षासाठी)
- नोंदित लाभार्थी बांधकाम कामगाराचा कामावर असताना मृत्यु झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास 5 लाख रूपये आर्थिक सहाय्य.
- नोंदित लाभार्थी कामगारास 75% किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्यास 2 लाख रूपये आर्थिक सहाय्य. तथापि, नोंदीत बांधकाम कामगाराचे विमा संरक्षण असल्यास, विमा रक्कमेची प्रतिपूर्ती अथवा मंडळामार्फत 2 लाख रूपये आर्थिक सहाय्य यापैकी कोणताही एक लाभ अनुज्ञेय राहील.
- वर नमूद योजनेंतर्गत लाभ हे फक्त मंडळातील नोंदीत बांधकाम कामगाराच्या कायदेशीर वारसास दिले जातात.
योजनेच्या अटी व शर्ती
- कामगाराची कामगार मंडळात नोंदणी असणे आवश्यक आहे.
- कामगारास 75% किंवा कायम स्वरूपाचे अपंगत्व असणे आवश्यक आहे.
- योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
- लाभाची राशी कामगाराच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे
- कामगारांचे आधार कार्ड
- कामगार मंडळात नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र
- 75% अपंगत्व असल्याचे सक्षम वैद्यकीय अधिकारी/मंडळाचे प्रमाणपत्र
- वैद्यकीय उपचाराची देयके
अर्ज करण्याची पद्धत
- कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनांचे अर्ज | |
योजनेचा अर्ज 1 | डाउनलोड |
योजनेचा अर्ज 2 | डाउनलोड |
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्ता | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |