कामगार कल्याण मंडळ कामगारांच्या उज्वल भविष्यासाठी तसेच त्यांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने विविध योजनांची सुरुवात करत असते.
बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारावर संपूर्ण कुटुंबाची जबादारी असते व कुटुंबातील कमावती व्यक्तीचा म्हणजेच कामगाराचा एखाद्या कारणामुळे नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवते व त्याच्या कुटुंबाला पैशांअभावी दैनंदिन जीवन जगणे कठीण होते. त्यामुळे कामगार मंडळाने कामगारांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात केली आहे.
कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास अथवा अंपगत्व आल्यास त्याची पत्नी अथवा पती अथवा कायदेशीर वारसास 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल.
उद्दिष्ट
- कामगारांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे:
कामगारांच्या एकाएकी मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर आर्थिक संकट येते व त्यामुळे त्यांना दैनंदिन जीवन जगणे, मुलांचे शिक्षण, आजारपण यांसारख्या खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो त्यामुळे कुटुंबाला आर्थिक सुरक्षा पुरविण्याच्या उद्देशाने योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. - सामाजिक सुरक्षा प्रदान करणे:
या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्याने कामगार स्वतःच्या अपंगत्वार मात करू शकतो तसेच मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करण्याची वेळ येत नाही. - कामगारांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करणे:
कामगाराचा एकाएकी मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळेल याची भावना कामगारांच्या मनात निर्माण होते.
योजनेचे लाभार्थी
- कामगार मंडळात नोंदणीकृत कामगार
योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य
- एखाद्या कामगाराचा नैसर्गिक मृत्य झाल्यास किंवा अपघातात अपंगत्व आल्यास 2 लाखांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
योजनेचा फायदा
- कामगारांना अपंगत्व आल्यास उपचारासाठी तसेच मृत्यू झाल्यास कुटुंबाला तात्कालिक आर्थिक सहाय्य दिले जाते.
- कामगाराच्या कुटुंबाला सामाजिक सुरक्षा दिली जाते.
- कामगारांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होते
- कामगारांचे तसेच त्यांच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित होते.
अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता
- अर्जदार कामगारांचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
- कामगारांचे महाराष्ट्रातील वास्तव्य 15 वर्ष असावे.
- अर्जदाराने मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे.
- तो नोंदीत कामगार असावा व नोंदणी चालू असावी.
योजनेअंतर्गत आवश्यक अटी व शर्ती
- अर्जदार कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- कामगाराचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाला पाहिजे.
- कामगारास अपघातात अपंगत्व आल्यास निश्चित टक्केवारीपेक्षा जास्त अपंगत्व असणे आवश्यक आहे.
- सदर बांधकाम कामगार संबंधित बांधकामाच्या ठिकाणी ९० दिवसापेक्षा जास्त दिवस काम करीत असल्याचा ठोस पुरावा उदा. हजेरीपत्रक, बांधकाम कामगारांना अदा करण्यात आलेला वेतनाचा तपशील प्राप्त झाल्यास सदर बांधकाम कामगार नोंदीत आहे असे समजून मंडळाकडील नोंदीत बांधकाम कामगाराप्रमाणे सर्व लाभ देय राहतील.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगारास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- मंडळाकडे नोंदणी जिवीत असलेले पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील.
- बांधकाम कामगार राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरु एखाद्या इतर योजनेचा लाभ घेत असता कामा नये.
- योजनेअंतर्गत लाभ मिळवण्याची अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे
- सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यू दाखला
- बांधकाम कामगार कामावर असताना मृत्यू झाल्याबाबतचा पुरावा.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवाशी दाखला
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- कायमचा पत्ता पुरावा
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
- नोंदणी अर्ज
- पासपोर्ट आकारातील 3 फोटो
- बँक पासबुक झेरॉक्स
- जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
- नियोक्त्याचे मागील वर्षभरात 90 दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला (इंजिनिअर/ठेकेदार)
- महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- घोषणापत्र
अर्ज करण्याची पद्धत
- कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनांचे अर्ज | |
योजनेचा अर्ज 1 | डाउनलोड |
योजनेचा अर्ज 2 | डाउनलोड |
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्ता | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |