इमारत व इतर बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार विविध आजारांना सामोरे जावे लागते. बांधकाम कामगारांचे आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत असल्याने आजारावरील औषधोपचार वेळीच घेतले जात नाहीत. परिणामी, काही आजार गंभीर स्वरुप धारण करतात असे निदर्शनास आले आहे.बांधकामाच्या ठिकाणी काम करत असलेल्या कामगारांची नियमित आरोग्य तपासणी करून त्यावर वेळीच उपचार केल्यास बांधकाम कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करणार नाही.
आरोग्य तपासणीमध्ये निदर्शनास आलेल्या किरकोळ आजारावरील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात येईल व गंभीर आजाराबाबत संस्थेच्या पथकाद्वारे महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मंजूर रुग्णालयात रूजू करण्यात येईल.
गंभीर आजार असलेल्या रुग्णांची नियमित तपासणीचे वेळापत्रक तयार करण्यात येईल.
रूग्णाच्या आजारावरील उपचारानंतर डिस्चार्ज समरीची नोंद संगणकीय प्रणालीमध्ये घेण्यात येईल व त्याचा वापर पुढील कार्यवाहीकरीता (Follow up) करण्यात येईल.
रूग्णाच्या उपचारावरील खर्चाची प्रतिपूर्ती महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेमार्फत करण्यात येईल.
महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेमार्फत उपचार करताना खर्चाच्या मर्यादेपक्षा जास्त होणाऱ्या खर्चाची प्रतिपूर्ती मंडळामार्फत करण्याता येईल.
नोंदीत बांधकाम कामगारांना गंभीर आजारावरील उपचाराकरीता रुग्णालयात रहावे लागेल त्या कालावधीतील वेतन नुकसान भरपाई मंडळामार्फत देण्यात येईल.
योजनेचे उद्दिष्ट
- राज्यातील नोंदीत बांधकाम कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे.
- कामगारांना विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या विनामूल्य उपलब्ध करून देणे.
- कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणे.
योजेनचे लाभार्थी
- राज्यातील नोंदीत बांधकाम कामगार
सर्व साधारण कामगारांकरीता खालीलप्रमाणे आरोग्य तपासणी प्रस्तावित आहे.
- Physical Examination (Head to Bottom)
- CBC
- Blood Sugar
- Liver Function Test
- Renal Function Test
- TRADESH
- Lipid ProfilePins
- Malaria Parasite
- ESR
- Urine Test
- Occupational History
- Social History
- Family History
- Lung Function Test
- Audio Screening Test
- Vision Screening
- Snellen General Employees
- Fit for employment Certificates
- Individual Reports PPPI
- Excutive Company Reports
- Baseline Medicals-2 X Audio Test
- General medicals is done by- Occupational Health Nurse
- Medicals is reviewed by- Occupational health Practitioner
- रक्तदाब
- रक्तातील साखर तपासणी
- डोळे आणि कान तपासणी
- मूत्र तपासणी
- तसेच इतर आवश्यक तपासण्या
आवश्यक पात्रता व अटी
- कामगार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- कामगाराची कामगार मंडळात नोंदणी असणे आवश्यक आहे.
अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे
- शासकीय/निमशासकीय व्यसनमुक्ती केंद्रातून उपचार घेतल्याचे शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
- कामगारांचे नोंदणी प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- रहिवाशी दाखला
अर्ज करण्याची पद्धत
- कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनांचे अर्ज | |
योजनेचा अर्ज 1 | डाउनलोड |
योजनेचा अर्ज 2 | डाउनलोड |
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्ता | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |