कामगार हा तुटपुंजा पगारात काम करतो त्यामुळे त्याचे उत्पन्न हे कमी असते व वैद्यकीय शिक्षण हे अतिशय महाग असते. यामध्ये प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क, पुस्तकांचा खर्च आणि साहित्य, परीक्षा शुल्क, तसेच वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी घरापासून दूर जावे लागते तेही हॉस्टेल मध्ये राहण्याचा खर्च, जेवणाचा खर्च आणि इतर खर्च जे कामगाराला परवडण्यासारखे नसतात. त्यामुळे बँक व वित्तसंस्थांनी किंवा इतर मार्गानी जास्त व्याज दराने कर्ज घेणे हा एकच पर्याय त्यांच्याजवळ असतो परंतु कमी पगारात घर चालवणे व कर्जाचे हफ्ते फेडणे व कुटुंबाच्या इतर गरज पूर्ण करणे अशी मोठी आव्हाने कामगारासमोर निर्माण होतात व याचा कुटुंबावर आर्थिक ताण येतो. त्यामुळे कामगारांच्या या सर्व समस्यांचा विचार करून कामगार मंडळाने कामगाराची मुले व पत्नीला वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.
नोंदीत बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस वैद्यकीय पदवीकरिता तसेच महाविद्यालयात किंवा संस्थेत प्रवेशासाठी पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदी इत्यादींसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.
योजनेचे उद्दिष्ट
- कामगारांच्या मुलांना तसेच पत्नीला वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
- कामगाराची मुले व पत्नी यांना स्वतःचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये. व शिक्षण करण्यापासून वंचित राहू नये.
- वैद्यकीय शिक्षण देऊन आरोग्य सेवांमध्ये योगदान देणे.
- कामगाराच्या कुटुंबावरील आर्थिक भार कमी करणे.
- कामगार कुटुंबातील मुलींना आणि पत्नींना वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेण्यास प्रोत्साहन मिळेल.
योजनेचे वैशिष्ट्य
- या शिष्यवृत्ती अंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी कामगाराच्या बँक खात्यात जमा केली जाते.
योजनेचे लाभार्थी
- कामगांची मुले व पत्नी
योजनेअंतर्गत अभ्यासक्रम
- वैद्यकीय पदवी शिक्षण
योजनेअंतर्गत दिली जाणारी आर्थिक मदत
- 1 लाख रुपये
योजनेच्या अटी व शर्ती
- कामगार हा कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
- कामगाराचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या पत्नी/मुलांना या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहे.
- कामगाराच्या मुलाने किंवा पत्नीने वैद्यकीय पदवी शिक्षणासाठी मान्यताप्राप्त महाविद्यालयात प्रवेश घेतला असेल.
- कामगारांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असता कामा नये.
- योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कामगारांच्या पाल्यांना किंवा पत्नीस अर्ज करणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्याने प्रत्येक वर्षी 50% पेक्षा जास्त गुण मिळवणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
- मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक/प्रमाणपत्र
- चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची पावती/बोनाफाईड
- कामगाराचे मृत्यू प्रमाणपत्र (जर कामगार मृत असेल तर)
- कामगाराचे नोंदणी प्रमाणपत्र
- मुलगा/मुलगी जन्म प्रमाणपत्र
- मुलगा/मुलगी शैक्षणिक प्रमाणपत्रे
- मुलगा/मुलगी प्रवेश प्रमाणपत्र
- वार्षिक उत्पन्नाचा दाखला
- पत्नीचे आधार कार्ड
अर्ज करण्याची पद्धत
- कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनांचे अर्ज | |
योजनेचा अर्ज 1 | डाउनलोड |
योजनेचा अर्ज 2 | डाउनलोड |
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्ता | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |