कामगार व त्यांच्या कुटुंबियांना स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण योजनाअंतर्गत खालीलप्रमाणे लाभ दिला जातो.
कामगारांच्या पाल्यांनी विविध स्पर्धा परिक्षांमध्ये उत्तुंग यश मिळवून प्रशासनातील त्यांचा सहभाग वाढावा या हेतूने कामगारांच्या, स्पर्धा परिक्षांना, पात्र कुटुंबियांसाठी राज्यातील विविध कामगार कल्याण केंद्र वा कामगार कल्याण मंडळाच्या उपलब्ध वास्तूंमध्ये स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनाचे वर्ग सुरु करण्यात येत आहे.
तसेच प्रभारी कल्याण आयुक्तांच्या शिफारशीनुसार सदर योजना राबविण्यासाठी प्रबोधन बहुउद्देशीय संस्था संचलित, स्पेक्ट्रम अकॅडमी, विठ्ठल पार्क, गंगापूर रोड, नाशिक या खाजगी प्रशिक्षण संस्थेस खालील प्रमाणे प्रशिक्षण, कालावधी, शुल्क तथा शुल्क अदा करण्याचे टप्पे इत्यादी तपशीलास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
उद्दिष्ट
- कामगार तसेच त्यांच्या पाल्यांच्या कौशल्याचा विकास करणे.
- कामगार व त्याच्या पाल्यांना प्रशिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देणे.
- कामगार तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे भविष्य उज्वल बनविणे तसेच त्यांचा सामाजिक विकास करणे.
योजनेचे लाभार्थी
- बांधकाम क्षेत्रात काम करणारे नोंदणीकृत जिवंत कामगार
योजनेअंतर्गत कामगार व त्याच्या कुटुंबातील सदस्यांना दिले जाणारे आर्थिक सहाय्य
कामगार व त्याच्या कुटुंबाला स्पर्था परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी 45 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाईल.
कोर्सचे नाव: बँक रिक्रुटमेंट / स्टाफ सिलेक्शन / रेल्वे रिक्रूटमेंट / एमबीए एन्ट्रन्स
कोर्स कालावधी: 3 महिने
कोर्स शुल्क: कोचींग, स्टडी मटेरियल, टेस्ट सिरीज इ. मिळून एकूण 10,000/- रुपये (प्रति विद्यार्थी)
शुल्क अदा करण्याचे टप्पे:
1 ला हप्ता 50% – वर्ग सुरु झाल्यावर
2 रा हप्ता 50% वर्ग संपल्यानंतर
कोर्सचे नाव: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा परीक्षा)
कोर्स कालावधी: 6 महिने
कोर्स शुल्क: कोचींग, स्टडी मटेरियल, टेस्ट सिरीज इ. मिळून एकूण 22,000/- रुपये (प्रति विद्यार्थी)
शुल्क अदा करण्याचे टप्पे:
1 ला हप्ता 40% – वर्ग सुरु झाल्यावर
2 रा हप्ता 40% – (३ रा महिना)
3 रा हप्ता 20% – वर्ग संपल्यानंतर
कोर्सचे नाव: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (PSI/ GST INSPECTOR (STI) / ASO
कोर्स कालावधी: 4 महिने
कोर्स शुल्क: कोचींग, स्टडी मटेरियल, टेस्ट सिरीज इ. मिळून एकूण 15,000/- रुपये (प्रति विद्यार्थी)
शुल्क अदा करण्याचे टप्पे:
1 ला हप्ता 50% – वर्ग सुरु झाल्यावर
2 रा हप्ता 30% – दुसऱ्या महिन्यामध्ये
3 रा हप्ता 20% – वर्ग संपल्यानंतर
कोर्सचे नाव: लिपिक टंकलेखक, पोलिस भरती, तलाठी भरती व इतर सरळसेवा भरती परीक्षा
कोर्स कालावधी: 2 महिने
कोर्स शुल्क: कोचींग, स्टडी मटेरियल, टेस्ट सिरीज इ. मिळून एकूण 8,000/- रुपये (प्रति विद्यार्थी)
शुल्क अदा करण्याचे टप्पे:
1 ला हप्ता 50% – वर्ग सुरु झाल्यावर
2 रा हप्ता 50% – वर्ग संपल्यानंतर
कोर्सचे नाव: केंद्रीय लोकसेवा आयोग, नागरी सेवा परीक्षा
कोर्स कालावधी: 8 महिने
कोर्स शुल्क: कोचींग, स्टडी मटेरियल, टेस्ट सिरीज इ. मिळून एकूण 45,000/- रुपये (प्रति विद्यार्थी)
शुल्क अदा करण्याचे टप्पे:
1 ला हप्ता ४० % – वर्ग सुरु झाल्यावर
2 रा हप्ता 3०% – (4 था महिना)
3 रा हप्ता 3०% – वर्ग संपल्यानंतर
योजनेच्या अटी व शर्ती
- सदर योजना ही महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडील नोंदित कामगार व त्यांच्या कुटूंबियांसाठी राहील.
- सदर स्पर्धा परिक्षांच्या मार्गदर्शन वर्गासाठी विद्यार्थी निवडताना पात्रता धारण करणाऱ्या लाभार्थ्यांमधून गुणवत्तेच्या आधारावर चाचणीच्या माध्यमातून लाभार्थी उमेदवारांची कामगार कल्याण मंडळाने निवड करावी. त्यासाठी संबंधित संस्थेने मंडळास सर्वतोपरी विनामूल्य सहकार्य करावे. कामगार कल्याण मंडळाने उपलब्ध करुन दिलेल्या लाभार्थ्यांनाच संबंधित संस्थेने प्रशिक्षण प्रदान करावे.
- सदर लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा.
- या योजनेचा लाभ फक्त प्रशिक्षणापुरताच असेल, उमेदवारांना निवासाची वा अन्य व्यवस्था स्वतः करावी लागेल.
- नोंदणीकृत कामगारांचे वय 18 ते 45 वर्षे दरम्यान असावे.
- कामगार तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्य किमान इयत्ता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- योजनेअंतर्गत कुटुंबातील फक्त एकाच सदस्यांची निवड केली जाईल.
प्रशिक्षणासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून मंडळाने खालील प्रमाणे नाममात्र दराने फी आकारावी
अ) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षा वर्गासाठी 500/- रुपये
ब) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या व अन्य परिक्षा वर्गासाठी 250/- रुपये
महत्वाच्या बाबी
- एकूण प्रशिक्षणार्थी उमेदवारांपैकी 30 टक्के जागा मुलींसाठी राखीव असतील. जर प्रशिक्षण संस्थेने प्रशिक्षणासाठी विहित केलेल्या मानकांची पूर्तता करणाऱ्या इच्छुक मुली उपलब्ध न झाल्यास सदर मुलींसाठी राखीव जागा नोंदित कामगारांच्या मुलांसाठी उपलब्ध करुन देण्यात येईल.. सदर बाबत कल्याण आयुक्त इच्छुक व पात्र मुलींना डावलले जाणार नाही याची दक्षता घेतील..
- स्पेक्ट्रम अकॅडमी नाशिक या संस्थेस सदर स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन वर्ग सुरु करण्याचे काम हे सन 2018-19 व सन 2019-20 या दोन वर्षांकरिता प्रदान करण्यात येत आहे. शासनाच्या पूर्वमान्यतेशिवाय सदर कालावधी मंडळास वाढविता येणार नाही.
- केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परिक्षांसाठी इच्छुक उमेदवारांच्या संख्येनुसार कामगार कल्याण मंडळाच्या विभागीय स्तरांवर मागर्दर्शन वर्ग सुरु करण्यात यावेत. अन्य स्पर्धा परिक्षंसाठीचे मार्गदर्शन वर्ग हे स्थानिक पातळीवरील पात्र इच्छुक उमेदवारांच्या उपलब्धतेनुसार सुरु करण्यात यावेत.
- एका बॅचमध्ये साधारणतः 30 ते 50 लाभार्थी असावेत. काही अपवादात्मक प्रकरणी लाभार्थ्यांची संख्या 30 पेक्षा कमी असली तरी प्रशिक्षण वर्ग सुरु करणे संबंधित संस्थेवर बंधनकारक राहील. तसेच निवड झालेला लाभार्थी प्रशिक्षण वर्ग सुरु झाल्यावर पहिल्या महिन्यात 10 दिवस गैरहजर राहिल्यास अथवा प्रशिक्षणासाठी इच्छुक नसल्याचे आढळल्यास त्या लाभार्थ्याच्या जागी प्रतिक्षा यादीतील अन्य लाभार्थी मंडळाने उपलब्ध करुन द्यावा.
- सदर योजना राबविताना लाभार्थी हा अन्य शासकीय योजनेचा लाभ घेत नाही याची संबंधित संस्थेने खात्री करावी. तसेच लाभार्थ्याला एकावेळी एकाच परिक्षा मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेता येऊ शकेल.
- सदर योजना राबविताना तिची परिणामकारकता व तिचा लाभार्थ्यांना होणारा फायदा याबाबतचा मुल्यमापन अहवाल दर सहा महिन्यांनी किंवा प्रत्येक प्रशिक्षण वर्ग संपल्यानंतर, यापैकी जो कमी कालावधी असेल त्या कालावधीचा अहवाल लाभार्थ्यांच्या अभिप्रायासह मंडळास व शासनास सादर करण्याची जबाबदारी ही संबंधित संस्थेची राहील.
- योजना मंजूरीनुसार प्रशिक्षणाचे साहित्य प्रशिक्षणाच्या वेळी लाभार्थ्यांना उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी व साहित्य वाटपाचा अहवाल मंडळास सादर करण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहील. [Bandhkam Kamgar Yojna]
- योजना सुरु केल्यानंतर कामगार कल्याण मंडळातील पदाधिकारी / अधिकारी / कर्मचारी तपासणीसाठी / भेटीसाठी प्रशिक्षणाच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना योजना / प्रशिक्षणाबाबतची आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहील.
- सन 2018-2019 या आर्थिक वर्षात सदर योजनेवर कामगार कल्याण मंडळाच्या उपलब्ध अर्थसंकल्पिय तरतूदीतून रुपये 1 कोटी रुपये इतका निधी खर्च करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. सदर योजनेस मोठया प्रमाणावर प्रतिसाद लाभल्यास व अधिक निधीची आवश्यकता भासल्यास सदर तरतूद 3 कोटी रुपये प्रतिवर्ष पर्यंत वाढविता येऊ शकेल. सदर योजनेवर मंजूर रकमेपेक्षा अधिक रक्कम खर्च होणार नाही तसेच प्रत्येक वर्गनिहाय निश्चित केलेल्या शुल्क अदा करण्याच्या टप्यांच्या मर्यादा पाळल्या जातील याची कल्याण आयुक्त यांनी दक्षता घ्यावी. तसेच मंडळाकडे निधीची तरतूद उपलब्ध न झाल्यास अथवा अपरिहार्य कारणास्तव रक्कम अदायगीस विलंब झाल्यास संबंधित संस्थेस कोणत्याही प्रकारचा दावा दाखल करता येणार नाही अथवा त्यावर व्याज मागता येणार नाही. सदर योजना राबविण्यासाठी शासनामार्फत मंडळास कोणतेही अर्थसहाय्य उपलब्ध केले जाणार नाही, सर्व वित्तीय जबाबदारी ही मंडळाची राहील.
- लाभार्थ्यांची यादी त्यांना द्यावयाचे प्रशिक्षण, प्रशिक्षणाचे ठिकाण, उपलब्ध कालावधी इत्यादी बाबत कामगार कल्याण मंडळाने संबंधित संस्थेस कळविल्यानंतरच मार्गदर्शन वर्ग सुरु करण्यात यावेत.
- प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा हजेरीबाबतचा मासिक व तिमाही अहवाल संबंधित संस्थेने मंडळास व शासनास सादर करावा. प्रशिक्षणार्थी उमेदवारांची प्रशिक्षण वर्गातील किमान 85 टक्के उपस्थिती विचारात घेऊन प्रत्यक्षात परिक्षेस बसलेल्या उमेदवारांच्या प्रमाणात उपरोक्त प्रमाणे विहित करण्यात आलेल्या दरानुसार व टप्पानिहाय शुल्काचे वितरण मंडळामार्फत संबंधित प्रशिक्षण संस्थेस करण्यात यावे.
- प्रशिक्षीत उमेदवारांचा आधारकार्ड क्रमांकासह डाटाबेस ठेवणे, उमेदवारांशी संपर्क व समन्वय ठेवणे, निवड झालेल्या उमेदवारांच्या नावांची यादी मंडळास व शासनास सादर करणे, प्रशिक्षण वर्गाच्या लाभार्थ्यास त्याच्या प्रशिक्षण कालावधीत वाचनालयाची सुविधा विनामुल्य उपलब्ध करुन देणे इ. जबाबदारी संबंधित संस्थेची राहील. तसेच त्याचप्रकारच्या प्रशिक्षणासाठी लाभार्थी पुन्हा प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असल्यास सदर लाभार्थ्यास स्टेशनरी चार्जेस पोटी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी 1000/- रुपये व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या व इतर परिक्षांसाठी 500/- रुपये इतकी रक्कम त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेकडे भरावी लागेल.
- संबंधित संस्थेकडून प्रशिक्षणार्थीना नियमानुसार व त्यांच्या आवश्यकतेनुसार अद्ययावत प्रशिक्षण दिले गेले नाही किंवा तशा तकारी प्राप्त झाल्यास व सदर तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्यास सदर संस्थेची मान्यता रद्द करण्यात येईल व अशा प्रकरणी झालेला मंडळाचा खर्च हा संबंधित संस्थेकडून वसूल करण्यात येईल. याबाबत अंतिम निर्णयाचा अधिकार शासनाचा राहील.
- प्रस्तुत स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण वर्गांसंदर्भात लाभार्थी निवडी संदर्भात तसेच निधी खर्च करण्याबाबत कोणताही मुद्दा उपस्थित झाल्यास त्याचे संपूर्ण उत्तरदायित्व कामगार कल्याण मंडळाचे राहील.
- वरील प्रमाणे सर्व अटी व शर्ती मान्य असल्याबाबत व सदर योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास कटिबद्ध असल्याबाबत 100/- रुपये च्या स्टॅम्पपेपर वर संबंधित संस्थेने कामगार कल्याण मंडळाशी करारनामा करणे अनिवार्य असेल.
योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- कामगारांचे कामगार मंडळात नोंदणी प्रमाणपत्र
- वयाचा दाखला
- शपथपत्र
योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत
- कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनांचे अर्ज | |
योजनेचा अर्ज 1 | डाउनलोड |
योजनेचा अर्ज 2 | डाउनलोड |
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्ता | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |