महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत बांधकाम कामगारांची संख्या व महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणाऱ्या बांधकाम कामगारांची संख्या यामध्ये तफावत आहे.सदर तफावत कमी करण्यासाठी मंडळाकडील नोंदीत बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना जाहीर करुन, बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, तरीपण राज्यातील अजूनही मोठ्या प्रमाणात बांधकाम संस्थाकडे कार्यरत बांधकाम कामगारांची मंडळाकडे नोंदणी होण्याचे प्रमाण समाधानकारक नाही. तसेच, अशा बहुतेक बांधकाम संस्थांमध्ये कार्यरत बांधकाम कामगार हे ग्रामीण भागातून रोजगार मिळविण्यासाठी शहराकडे येतात. अशा बांधकाम कामगारांजवळ दैनंदिन वापराच्या अत्यावश्यक वस्तुंची कमतरता असते. अशा अत्यावश्यक वस्तू संच (Essential Kit) पुरविणे या योजनेच्या माध्यमातून दैनंदिन वापराच्या वस्तुंची कमतरता भरुन काढण्यास तसेच बांधकाम कामगारांना मंडळाकडे नोंदणी करण्यासाठी आकर्षित करण्यासाठी अत्यावश्यक वस्तू संच (Essential Kit) पुरविणे ही योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने सुरु केली आहे.
नोंदीत बांधकाम कामगार व त्याच्या पाल्यांना खालीलप्रमाणे Kamgar Safety Kit देण्यात येईल.
प्लॅस्टिक चटई | 1 |
मच्छरदानी | 1 |
सोलर टॉर्च | 1 |
जेवणाचा डबा | 1 |
पाण्याची बाटली | 1 |
खांद्यावरील बॅग | 1 |
गमबूट | 1 |
पत्र्याची पेटी | 1 |
अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता
- अर्जदार कामगारांचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे.
- योजनेअंतर्गत Safety Kit मिळवण्यासाठी कामगाराला अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवाशी दाखला
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- कायमचा पत्ता पुरावा
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
- नोंदणी अर्ज
- पासपोर्ट आकारातील 3 फोटो
- बँक पासबुक झेरॉक्स
- जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
- नियोक्त्याचे मागील वर्षभरात 90 दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला (इंजिनिअर/ठेकेदार)
- महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- घोषणापत्र
Bandhkam kamgar safety kit अंतर्गत अटी व शर्ती
- मंडळाकडे नोंदणी जिवीत असलेले पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील. या पात्रताधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे भरुन दिल्यानंतर अत्यावश्यक वस्तू संच (Essential Kit) पुरविण्यात येतील.
- पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तू संच (Essential Kit) पुरविण्याबाबत ई-निविदा पध्दतीचा अवलंब करुन, नोंदणीकृत, नामांकीत व अनुभवी संस्थेची निवड केली जाईल.तसेच या संदर्भात उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णयामधील तरतूदींचे काटेकोर पालन करण्यात येईल. तसेच निविदा स्विकृती नंतर प्रस्ताव शासन मान्यतेस्तव सादर केला जाईल.
- अत्यावश्यक वस्तू संच (Essential Kit) मधील पुरविण्यात येणाऱ्या वस्तूंचे दर, पुरवठा, वाहतूक, वितरण व सर्व करांसह निश्चित करण्यात येईल.
- अत्यावश्यक वस्तू संच (Essential Kit) च्या निविदा स्विकृत करण्यापूर्वी अत्यावश्यक वस्तू संच (Essential Kit) मधील वस्तूंच्या दर्जाची शासन मान्य प्रयोग शाळेकडून तपासणी व खात्री करून घेण्यात येईल व तसे प्रमाणपत्र तद्नंतरच अशा वस्तूंची पात्र लाभार्थ्यास वितरणाची कार्यवाही केली जाईल.
- संबंधित सहाय्यक कामगार आयुक्त यांनी रितसर प्रमाणित केलेल्या पात्र नोंदीत बांधकाम कामगारांच्या यादीनुसारच विहीत मुदतीचे आत अत्यावश्यक वस्तू संच (Essential Kit) चा पुरवठा करण्यात येईल.
- पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तू संच (Essential Kit) प्राप्त झाल्याचे सरकारी कामगार अधिकारी खात्री करतील व पुरवठा केल्याची पोचपावती उपायुक्त कामगार यांना सादर करतील. उपायुक्त कामगार अशा सर्व लाभार्थ्यांचे साहीत्य प्राप्त झाल्याबाबतच्या पोच पावत्या पाहून खात्री करुन त्याबाबतचा अहवाल देयकाची अदायगी करण्याच्या प्रमाणपत्रासह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई यांना सादर करतील व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सदरहू अहवाल व उप आयुक्त कामगार यांचे देयक अदायगी करण्याचे प्रमाणपत्र पाहून,खात्री करुन पुरवठादाराचे देयके नियमानुसार प्रदान करतील.
- अत्यावश्यक वस्तू संच (Essential Kit) पुरवठ्याचा खर्च मंडळाकडील जमा उपकर निधीतून भागविण्यात येईल.
- सदर योजनेच्या परिणामकारक अंमलबजावणी व देखरेखीचे काम कामगार आयुक्त पाहतील.
- पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तू संच (Essential Kit) पुरवठा करण्याची कार्यवाही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करतील. कालावधी वाढविण्यास मान्यता देण्याचे अधिकार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळास राहतील.
योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
- कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनांचे अर्ज | |
योजनेचा अर्ज 1 | डाउनलोड |
योजनेचा अर्ज 2 | डाउनलोड |
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्ता | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |