Essential Kit Form PDF: राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना उपयुक्त अशा Essential Kit चे वाटप करण्यात येते परंतु Essential Kit चा लाभ मिळवण्यासाठी कामगारांना अर्ज करावा लागतो त्यामुळे आम्ही खाली अर्ज दिलेला आहे.
अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील बांधकाम कामगार मंडळाच्या कार्यालयामध्ये जमा करावा

Bandhkam Kamgar Essential Kit योजनेचे उद्दिष्ट
- योजनेअंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना Essential Kit चा लाभ देणे.
- कामगारांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणे.
- कामगारांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची पूर्तता करणे.
- कामगारांचा आर्थिक ताण कमी करून त्यांचेच जीवनमान सुलभ करणे.
योजनेचे वैशिष्ट्य:
- योजनेअंतर्गत कामगारांना दिल्या जाणाऱ्या Essential Kit चा मोफत लाभ दिला जातो.
- योजनेअंतर्गत कामगारांना पुरवण्यात येणारे Essential Kit उत्कृष्ट दर्जाचे दिले जातात.
योजनेचे लाभार्थी:
- बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार
Essentional Kit मध्ये खालील वस्तूंचा प्रत्येकी एक नग प्रमाणे लाभ देण्यात येईल.
- प्लॅस्टिक चटई
- मच्छरदानी
- सोलर टॉर्च
- जेवणाचा डबा
- पाण्याची बाटली
- खांद्यावरील बॅग
- गमबूट
- पत्र्याची पेटी
योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता:
- अर्जदार कामगारांचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
- कामगारांचे महाराष्ट्रातील वास्तव्य 15 वर्ष असावे.
- अर्जदाराने मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे.
- तो नोंदीत कामगार असावा व नोंदणी चालू असावी.
अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे:
- नोंदणी अर्ज
- ओळखीचा पुरावा: आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायविंग लायसेन्स
- रहिवाशी दाखला: डोमेसाइल (आवश्यक असल्यास)
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- कायमचा पत्ता पुरावा: रेशन कार्ड, वीज बिल, आधार कार्ड
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
- पासपोर्ट आकारातील 3 फोटो
- बँकेचा तपशील: बँक पासबुक झेरॉक्स
- जन्माचा दाखला: जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला
- ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- घोषणापत्र
Essential Kit साठी अर्ज करण्याची पद्धत:
- कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Bandhkam Kamgar Essential Kit Form PDF:
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail.कॉम |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |