नोंदीत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांच्या पाल्यांकरीता शैक्षणिक लाभाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. तथापि मुलांच्या विवाहकरीता कोणतीही योजना राबविली जात नाही.
नोंदीत बांधकाम कामगार, लोकप्रतिनिधी व कामगार संघटनांकडून मंडळास सादर निवेदनामध्ये बांधकाम कामगाराला मिळणारे अल्प वेतनामधून दैनंदिन खर्च भागवून मुलीचे विवाह करताना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. ही बाब विचारात घेता नोंदीत बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहाकरीता 51,000/- रुपये अर्थसहाय्य मंडळातर्फे देण्यात येते.
योजनेचे उद्दिष्ट
- कामगाराला आपल्या मुलीच्या विवाहासाठी पैशांची कमतरता भासू नये.
- कामगाराला मुलीच्या विवासाठी आवश्यक पैशांसाठी कोणाकडून कर्ज घेण्याची गरज भासू नये
योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य
- या योजनेअंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी 51,000/- रुपयाचे अर्थसहाय्य दिले जाते.
योजनेचा कामगारांना होणारा फायदा
- कामगारांना आपल्या मुलीच्या विवाहासाठी आवश्यक पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही तसेच कोणाकडून पैसे उधार घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
- कामगार आपल्या मुलीच्या विवाहासाठी लागणाऱ्या पैशासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
- योजनेअंतर्गत दिले जाणारे अर्थसहाय्य लाभार्थी कामगाराच्या बँक खात्यात जमा केले जाईल.
सादर करावयाचे कागदपत्रे | ||
1 | नोंदीत बांधकाम कामगाराच्या मुलीच्या लग्नाकरिता अर्थसहाय्य | |
2 | नोंदीत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगार असावा. | ओळखपत्र / नूतनीकरण |
3 | एका मुलीच्या विवाहखर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी 51000/- रुपयाचे आर्थिक सहाय्य देय राहील. | ओळखपत्रातील कुटुंबाच्या तपशिलामध्ये मुलीच्या नावाची नोंद असावी. |
4 | मुलीचे वय 18 वर्षापेक्षा जास्त नसावे. | ओळखपत्रामध्ये जन्म तारखेची नोंद असावी. |
5 | मुलीचे शिक्षण कमीत कमी इयता 10वी पर्यंत असावे. | इयत्ता 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र |
6 | मुलीचा विवाह संपन्न झाल्याचा पुरावा सादर करावा. | लग्नपत्रिका / लग्नाचे फोटो / विवाह नोंदणी प्रमाणपत्र |
नोंदीत बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसहाय्य अंतर्गत अटी व शर्ती खालीलप्रमाणे असतील
- अर्जदाराने महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
- कामगार किंवा त्याची पत्नी/पती मागील 3 वर्षांपासून किमान 180 दिवस कामगार म्हणून काम करत असणे आवश्यक आहे.
- विवाहासाठी ही योजना केवळ एकाच मुलीसाठी उपलब्ध आहे.
- मुलीचा विवाह संपन्न झाल्याबाबतचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करावे.
- नोंदीत बांधकाम कामगाराच्या ओळखपत्रातील कुटुंबाच्या तपशीलात मुलीच्या नावाची नोंद असावी.
- फक्त पहिल्या विवाहासाठीच अर्थसहाय्य दिले जाईल.
- लग्न झालेल्या मुलीचे वय 18 वर्षापेक्षा कमी असू नये. याबाबत वयाचा पुरावा (ओळखपत्रातील नोंद/ जन्माचा दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला/ बोनाफाईड सर्टिफिकेट) सादर करावा.
योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे
मुलीचे कागदपत्रे
- मुलीचा विवाह झाल्याचे प्रमाणपत्र
- नोंदीत बांधकाम कामगाराच्या ओळखपत्रातील कुटुंबाच्या तपशीलात मुलीच्या नावाची नोंद असल्याचे प्रमाणपत्र
- मुलीचा वयाचा दाखला
कामगाराची कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवाशी दाखला
- कायमचा पत्ता पुरावा
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
- नोंदणी अर्ज
- पासपोर्ट आकारातील 3 फोटो
- बँक पासबुक झेरॉक्स
- जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
- नियोक्त्याचे मागील वर्षभरात 90 दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला (इंजिनिअर/ठेकेदार)
- ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- घोषणापत्र
योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
- कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनांचे अर्ज | |
योजनेचा अर्ज 1 | डाउनलोड |
योजनेचा अर्ज 2 | डाउनलोड |
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्ता | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |