बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना विविध प्रकारच्या अवजारांची आवश्यकता असते परंतु पैशांअभावी साहित्य खरेदी करणे त्यांना शक्य होत नाही त्यामुळे बहुतांश कामगारांना काम करताना विविध समस्यांचा सामना करावा लागतो त्यामुळे कामगारांना साहित्य खरेदी करण्यासाठी सदर योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाते.
नोंदीत बांधकाम कामगारास प्रति कुटुंब दर 3 वर्षातून एकदा अवजारे / हत्यारे खरेदी करण्याकरिता 5,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल.
पुढील तीन वर्षानंतर लाभ घेण्यासाठी अशा बांधकाम कामगारांची मंडळाकडे सलग तीन वषे नोंदणी असणे आवश्यक आहे.
योजनेचे उद्दिष्ट
- कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेणे.
कामगारांना बांधकाम क्षेत्रात उपयुक्त साहित्य
उपकरणे | उपयोग |
हेल्मेट | अपघातात कामगाराच्या डोक्याचा बचाव करण्यासाठी उपयुक्त |
सेफ्टी शूज | अपघातात पायांना होणाऱ्या इजांपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त |
गॉगल्स | वेल्डिंग करताना तसेच धूळ यांपासून डोळ्यांचा बचाव करण्यासाठी उपयुक्त |
हातमोजे | काम करताना अपघात झाल्यास हातांचा बचाव करण्यासाठी उपयुक्त |
मास्क | हवेतील धूळ तसेच विषारी धुरापासून रक्षण करण्यासाठी उपयुक्त |
हातोडा | खिळे ठोकण्यासाठी तसेच स्लॅप व कॉलम ला टोचे मारण्यासाठी उपयुक्त |
करवत | लाकूड तसेच इतर साहित्य कापण्यासाठी उपयुक्त |
सूरी | वस्तू कापण्यासाठी उपयुक्त |
स्क्रू ड्रायव्हर | स्क्रू घट्ट करण्यासाठी तसेच बाहेर काढण्यासाठी |
कलर ब्रश | इमारतीला कलर काढण्यासाठी उपयुक्त |
स्क्रू पाने | नट व बोल्ट कसण्यासाठी |
वेल्डिंग मशीन | लोखंडी तसेच स्टील च्या वस्तू जोडण्यासाठी |
ग्राइंडर | लोखंड, स्टील व इतर वस्तू घासण्यासाठी |
कटर | वायर कापण्यासाठी तसेच वायरीवरील आवरण काढण्यासाठी |
योजनेचे लाभार्थी
- बांधकाम कामगार मंडळात नोंदणीकृत कामगार
आवश्यक पात्रता
- अर्जदार कामगारांचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
- कामगारांचे महाराष्ट्रातील वास्तव्य 15 वर्ष असावे.
- अर्जदाराने मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे.
- कामगार नोंदीत असावा व नोंदणी चालू असावी.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवाशी दाखला
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- कायमचा पत्ता पुरावा
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
- नोंदणी अर्ज
- पासपोर्ट आकारातील 3 फोटो
- बँक पासबुक झेरॉक्स
- जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
- नियोक्त्याचे मागील वर्षभरात 90 दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला (इंजिनिअर/ठेकेदार)
- महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- घोषणापत्र
अटी व शर्ती
- अर्जदार कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगारास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- मंडळाकडे नोंदणी जिवीत असलेले पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील.
- बांधकाम कामगार राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरु एखाद्या इतर योजनेचा लाभ घेत असता कामा नये.
- साहित्य खरेदीचा लाभ मिळवण्यासाठी कामगारांना अर्ज करणे आवश्यक आहे.
लाभ मिळवण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत
- कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनांचे अर्ज | |
योजनेचा अर्ज 1 | डाउनलोड |
योजनेचा अर्ज 2 | डाउनलोड |
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्ता | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |