महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ क्रीडा शिष्यवृत्ती योजना: राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्राविण्य प्राप्त करणाऱ्या कामगार तसेच कामगार पाल्य खेळाडूंना सदर योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन जमा करण्यात येते. विभागीय कार्यालय स्तरावर अर्थसंकल्पिय तरतुदीच्या अधिन राहून लाभार्थी संख्या निश्चित करण्यात येते.
पुढील ३ प्रकारात क्रीडा शिष्यवृत्ती मंजूर केली जाते.
अ) आंतरराष्ट्रीय/विशेष क्रीडा शिष्यवृत्ती :
राष्ट्रीय किंवा राज्य संघटनेद्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथम / व्दितीय/तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावणाऱ्या खेळाडूस 15,000/- रुपये शिष्यवृत्ती मंजूर केली जाते.
ब) राष्ट्रीय क्रीडा शिष्यवृत्ती :
राज्य संघटनेद्वारे आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्यास रु.७,०००/- व्दितीय क्रमांक मिळवल्यास रु.५,०००/-, तृतीय क्रमांक मिळवल्यास 3,000/- रुपये शिष्यवृत्ती मंजूर केली जाते.
क) राज्यस्तरीय क्रीडा शिष्यवृत्ती :
शालेय/ महाविद्यालय / विद्यापीठ स्तरावर आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्यास
5,000/- रुपये, व्दितीय क्रमांक मिळवल्यास 3,000/- रुपये व तृतीय क्रमांक मिळवल्यास 2,000/- रुपये शिष्यवृत्ती मंजूर केली जाते.
क्रीडा शिष्यवृत्ती योजना अंतर्गत कालमर्यादेचा तपशिल:
कार्यवाहीचा तपशिल | अंतिम मुदत |
केंद्रांत अर्ज स्वीकारणे | ऑक्टोबर अखेरपर्यंत |
केंद्रांनी गट कार्यालयाकडे अर्ज पाठवणे | नोव्हेंबरचा दुसरा आठवडा |
गट कार्यालयाने विभागीय कार्यालयाकडे अर्ज पाठवणे | नोव्हेंबर अखेरपर्यंत |
विभागीय कार्यालयांनी अर्थसंकल्पिय तरतुदीच्या अधीन राहून मंजुरीपत्र निर्गमित करणे | डिसेंबर अखेरपर्यंत |
योजनेचे नियम व अटी:
- अर्जदार खेळाडूने त्याच्या घराजवळील केंद्राचे सभासद होणे बंधनकारक आहे. सभासदत्व स्वीकारलेल्या केंद्रामधून शिष्यवृत्तीचा अर्ज सादर करावा.
- अर्जदार महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 च्या कक्षेत येणारा कामगार कुटुंबीय असला पाहिजे.
- राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत अनेक क्रीडा प्रकार खेळले जातात. त्यामुळे सदर योजनेच्या शिष्यवृत्तीसाठी कोणत्याही एकाच क्रीडा प्रकारासाठी एकच अर्ज सादर करता येईल. अर्जात एकापेक्षा जास्त क्रीडा प्रकारांचा समावेश केल्यास अर्ज बाद करण्यात येईल.
- शिष्यवृत्तीसाठी खेळाडू किंवा त्याच्या पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा नाही. तसेच खेळाडूस शिक्षण व वयोमर्यादेचे बंधन नाही. मात्र, फक्त स्पर्धेत सहभाग घेतला म्हणून सदर शिष्यवृत्तीचा लाभ देता येणार नाही.
- आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारा खेळाडू हा शासन मान्यताप्राप्त राज्य किंवा राष्ट्रीय क्रीडा संघटनेच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेला असावा. त्यास आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळाला असेल तरच शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येईल.
- राष्ट्रीय पातळीवर क्रीडा शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारा खेळाडू हा शासन मान्यताप्राप्त राज्य क्रीडा संघटनेकडून निवड झालेला असावा. त्यास राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळाला असेल तरच शिष्यवृत्ती मंजूर करता येईल.
- राज्यस्तरीय संघातून स्पर्धेकरिता निवड होऊन प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक संपादन केला असेल अशाच खेळाडूंना शिष्यवृत्ती दिली जाईल. अर्जासोबत जोडलेली सर्व प्रमाणपत्रे राज्य क्रीडा संघटनेकडून प्रमाणित केलेली असावीत. मागील 2 वर्षापर्यंतची प्रमाणपत्रे ग्राह्य असतील.
- जूनमध्ये कामगार कल्याण निधी कपात झाल्याची नोंद असलेली पेमेंट स्लीप किंवा आस्थापनेचा दाखला अर्जासोबत जोडावा.
- जूनमध्ये साखर कारखाने बंद असल्याने कामगारांचा जूनमध्ये पगार होत नाही. अशावेळी जूनऐवजी डिसेंबरची वेतनपावती (पे स्लीप) ग्राह्य मानावी. डिसेंबरच्या वेतन पावतीत कामगार कल्याण निधी कपात झाल्याची नोंद असावी.
- कंपनी बंद पडली असल्यास आस्थापनेचा कंपनी बंद पडल्याचा दाखला जोडावा. सदर दाखला तीन वर्षांपर्यंत वैध राहील.
- शिष्यवृत्ती रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यात ऑनलाईन जमा होणार आहे. त्यासाठी कामगार पाल्य खेळाडूचे स्वतःचे (किंवा पालकासह संयुक्त ) खाते बँकेत असणे बंधनकारक आहे. सदर बँक खाते विद्यार्थ्याने त्याच्या आधार क्रमांकाशी लिंक करुन घ्यावे.
- अर्जदाराने शक्यतो बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खाते उघडावे. तसे शक्य नसल्यास आय.एफ.एस.सी क्रमांक व मायकर क्रमांक असलेल्या राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका व शेड्युल्ड को-ऑप बँकामध्ये खाते उघडावे. मात्र, आय.एफ.एस.सी क्रमांक व मायकर क्रमांक नसलेल्या बँकेत अर्जदाराचे खाते असल्यास अथवा अर्जदाराचे बँक खाते बंद स्थितीत असल्यास शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही व याबाबत कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही.
- पडताळणी करण्यासाठी लाभार्थीचे नाव, बँक खाते क्रमांक, आय.एफ.एस.सी. क्रमांक व बँकेचा मायकर क्रमांक यांची नोंद असलेला बँकेचा कॅन्सल चेक (रद्द चेक) किंवा पासबुकची झेरॉक्स अर्जासोबत जोडावी.
- खेळाडूने दाखले/प्रमाणपत्रे यांच्या छायांकित प्रती स्वयं साक्षांकीत केल्या तरी ग्राह्य असतील. त्यासाठी स्वयं घोषणापत्र जोडावे. अथवा सक्षम अधिकाऱ्याने साक्षांकीत केलेली कागदपत्रे सादर करावीत.
- अपंग खेळाडूंना शासनाच्या धोरणानुसार एकूण शिष्यवृत्ती रकमेच्या तीन टक्के प्रमाणात सरसकट शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येईल. त्यासाठी टक्केवारी व पालकाच्या उत्पन्न मर्यादेचे कोणतेही बंधन असणार नाही.
- खेळाडूंनी अर्ज जमा करताना सर्व कागदपत्रे साक्षांकित करुन अर्जासोबत जोडल्याची व बँक तपशिल बरोबर भरल्याची खात्री करावी. अर्ज स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्याकडून पोचपावती अवश्य घ्यावी.
- शिष्यवृत्तीस पात्र न ठरलेल्या अर्जदारांची स्वतंत्र यादी प्रसिद्ध करण्यात यावी. त्यात प्रत्येक अर्जाचे शिष्यवृत्ती न मिळाल्याबाबतचे कारण स्पष्टपणे नमूद करावे.
- विभागीय कार्यालयांनी मंजुरीपत्रकाची प्रत माहितीस्तव मध्यवर्ती कार्यालयास माहितीस्तव सादर करावी.
आवश्यक कागदपत्रे:
- कामगार नोंदणी पुरावा
- प्रथम/द्वितीय/तृतीय पारितोषिक प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- रहिवाशी दाखला
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- बँक खात्याचा तपशील
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- प्रतिज्ञापत्र
योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला आपल्या क्षेत्रातील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयात जाऊन क्रीडा शिष्यवृत्ती योजना चा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जदार विचारलेली सर्व माहीत भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयात जाऊन जमा करावा लागेल.
योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर सभासद मध्ये योजनांसाठी अर्ज वर क्लिक करावं लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या योजनेसमोर Apply Now बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भर तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट बटनावर क्लिक करा.
- अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail.कॉम |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Bandhkam Kamgar Scholarship Form | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |