बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का?

बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का?: एखाद्या बांधकाम संस्थांमध्ये 10 किंवा त्या पेक्षा जास्त कामगार कार्यरत असतील तर अशा परिस्थितीत शासकीय नियमानुसार त्या कामगाराला तसेच त्याच्या कुटुंबाला ESI चा लाभ दिला जाईल.

ESI अंतर्गत बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यना संपूर्ण वैद्यकीय देखभाल, आजारपण, तात्पुरत्या स्वरूपाचे किंवा कायमच स्वरूपाचे अपंगत्व, औद्योगिक अपघात किंवा सेवेतील इजेमुळे किंवा व्यावसायिक जोखमीमुळे मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य दिले जाते.

राज्य विमा योजनेचे वैशिष्ट्य असे की त्यातील अंशदान हे वर्गणीदाराच्या क्षमतेवर अवलंबून कामगारांना देय असणाऱ्या वेतनाची ठराविक टक्केवारीच्या स्वरुपात असते तर मिळणारा सामाजिक सुरक्षिततेचा लाभ हा प्रत्येकाच्या गरजेनुसार कोणताही भेदभाव न करता दिला जातो. [बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का?]

बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का

बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का?

राज्य कामगार विमा अधिनियम १९४८ अंतर्गत लागू करण्यात आलेली राज्य कामगार विमा योजना ही आरोग्य विमा योजनांची मातृयोजना आहे. सुरक्षिततेची भावना ही मनुष्य स्वभावात अनुस्युतच आहे. एकत्र कुटुंब पद्धती नष्ट होत चालल्यामुळे, औद्योगिकीकरण, व नागरीकरणामुळे आधुनिक काळात सुरक्षितता आवश्यक झाली आहे. १४ इस्पितळे, व ६१ दवाखान्यांद्वारे राज्य कामगार विमा योजना कामगार वर्गाच्या सेवेत कार्यरत आहे. महाराष्ट्रात सप्टेंबर १९५४ मध्ये ही योजना प्रथम लागू करण्यात आली. सध्या सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू आहे.

अंमलबजावणी केलेल्या क्षेत्रांमध्ये कामगारांना एक वैद्यकीय व समान दराने रोख स्वरुपात अशा दोन पद्धतीने लाभ दिला जातो. दहा किंवा जास्त कामगार असणाऱ्या सर्व कारखान्यांना राज्य विमा योजना अधिनियमाअंतर्गत अंतर्भूत करण्यात आले आहे. वरील सर्व आस्थापनांमध्ये ह्या योजनेत पात्र होण्यासाठी १५०००/- रुपये ही कमाल वेतन मर्यादा (ज्यादा काम वगळून) आहे. [बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का?]

लाभ

  • वैद्यकीय लाभ
  • आजारपणाचे लाभ
  • अपंगत्वाचे लाभ
  • मातृत्वाचे लाभ
  • अवलंबितांचे लाभ
  • अंत्यविधीचे लाभ

अ) वैद्यकीय लाभ:

विमित व्यक्तीला व त्याच्या कुटुंबियांना त्याने सेवेत प्रवेश केल्याच्या पहिल्या दिवसापासून वैद्यकीय देखभाल केली जाते. विमित व्यक्तीच्या किंवा त्याच्या कुटुंबियाच्या उपचाराच्या खर्चावर कोणतीही मर्यादा नाही. निवृत्त आणि कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या विमित व्यक्तींना व त्यांच्या पत्नीला वर्षाला नाममात्र १२०/- रुपये हप्त्यामध्ये वैद्यकीय देखभाल केली जाते. [बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का?]

  1. उपचाराची प्रणाली
  2. वैद्यकीय लाभाचे मोजमाप
  3. निवृत्त विमित व्यक्तींना लाभ
  4. राज्यातील वैद्यकीय लाभाचे प्रशासन
  5. अधिवासी उपचार
  6. विशेषज्ञांकडून तपासणी
  7. अंतर्रुग्ण उपचार
  8. एक्सरे सेवा
  9. कृत्रिम पाय व मदत
  10. विशेष तरतुदी
  11. प्रतिपूर्ती

ब) आजारपणाचे लाभ:

विमित कामगारांना प्रमाणित आजारपणात वर्षामध्ये जास्तीतजास्त ९१ दिवसांपर्यंत वेतनाच्या ७०% दराने रोख स्वरुपात नुकसानभरपाई मिळू शकते. आजारपणाचे लाभ मिळण्यास पात्र होण्यासाठी ६ महिन्यांच्या अंशदान कालावधीमध्ये विमित कामगाराने ७८ दिवसांचे अंशदान दिलेले असले पाहिजे.

विस्तारीत आजारपणाचा लाभ:

३४ प्रकारच्या गंभीर व दीर्घ मुदतीच्या आजारांमध्ये वेतनाच्या ८०% दराने आजारपणाचा लाभ दोन वर्षेपर्यंत वाढविला जाऊ शकतो.
वाढीव आजारपणाचा लाभ:
नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या विमित पुरुष व महिला कामगारांना त्यांच्या वेतनाएवढा आजारपणाचा लाभ अनुक्रमे ७ व १४ दिवसांसाठी मिळू शकतो. [बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का?]

क) मातृत्वाचा लाभ:

मागील वर्षात ७० दिवसांचे अंशदान केल्याच्या अधीन राहून पूर्ण वेतनाएवढ्या रकमेचा मातृत्व लाभ तीन महिन्यांसाठी पात्र असतो व वैद्यकीय सल्ल्यानुसार तो एक महिना वाढविता येऊ शकतो.

ड) अपंगत्वाचे लाभ:

तात्पुरत्या अपंगत्वाचे लाभ : सेवेतील इजा असल्यास अंशदान अदा केले असेल अगर नसेल, तरीसुद्धा विमित सेवेत प्रवेश केल्यापासून तात्पुरत्या अपंगत्वाचे लाभ मिळतील. अपंगत्व कायम असेपर्यंत वेतनाच्या ९०% रक्कम तात्पुरते अपंगत्व लाभ म्हणून देय असेल.
कायम अपंगत्वाचे लाभ :
वैद्यकीय मंडळाने प्रमाणित केलेल्या कमविण्याच्या क्षमतेतील घटीनुसार वेतनाच्या ९०% रक्कम लाभाच्या स्वरुपात दर महा दिली जाते. [बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का?]

ई) अवलंबीतांचे लाभ: विमित व्यक्तीचे सेवेतील इजेमुळे किंवा नोकरीतील जोखिमीमुळे निधन झाले असल्यास मृत व्यक्तीवार अवलंबून असलेल्या अवलंबिताना वेतनाच्या ९०% दराने अवलंबिताचे लाभ दिले जातात.

फ) इतर लाभ: अंत्येष्टीचा खर्च : मृत विमित व्यक्तीवरील अवलंबित किंवा त्याची अंत्येष्टी विधी करणाऱ्याला रु १००००/- पर्यन्त रक्कम दिली जाते. An amount of Rs.10,000/- is payable to the dependents or to the person who performs last rites from day one of entering insurable employment. प्रसुती खर्च : राज्य कामगार विमा योजनेखाली वैद्यकीय सेवा उपलब्ध नसतील अशा ठिकाणी विमित स्त्री किंवा विमित व्यक्तीची पत्नीची प्रसूति झाल्यास प्रसुती खर्च देण्यात येतो.

त्या व्यतिरिक्त विमित कामगारांना गरजेनुसार अन्य लाभ दिले जातात.

व्यावसायिक पुनर्वसन : कायम स्वरूपाचे अपंगत्व आलेल्या व्यक्तींना व्यावसायिक पुनर्वसन प्रशिक्षण केंद्रामध्ये व्यावसायिक पुनर्वसन प्रशिक्षण घेण्यासाठी

शारीरिक पुनर्वसन : सेवेतील इजेमुळे शारीरिक अपंगत्व आल्यास

वृद्धापकाळ वैद्यकीय देखभाल : सेवानिवृत्ती किंवा ऐच्छिक सेवानिवृत्ती योजने अंतर्गत व कायम स्वरूपाच्या अपंगत्वामुळे सेवा त्याग करावा लागलेल्या विमित व्यक्तींसाठी व त्यांच्या पत्नीसाठी वार्षिक रु १२०/- भरून वैद्यकीय देखभाल उपलब्ध आहे.

राजीव गांधी श्रमिक कल्याण योजना : बेरोजगार भत्त्याची ही योजना १.४.२००५ पासून लागू करण्यात आली आहे. विमित झाल्यावर तीन किंवा जास्त वर्षांनी कारखाना / आस्थापना बंद झाल्यावर किंवा कपातीमुळे किंवा कायमस्वरूपी अपंगत्वामुळे तो बेरोजगार झाल्यास :-

  • जास्तीत जास्त एक वर्ष कालावधी पर्यंत वेतनाच्या ५०% रक्कम बेरोजगार भत्ता देण्यात येईल.
  • विमित व्यक्तीला बेरोजगार भत्ता प्राप्त होत असेपर्यंत, त्याला व त्याच्या कुटुंबाला राज्य कामगार विमा योजना रुगानालये / दवाखान्यातून वैद्यकीय देखभाल मिळेल.
  • आपली कौशल्ये अद्ययावत करण्यासाटी व्यावसायिक प्रशिक्षण – शुल्क / प्रवास भत्ता यावरील खर्च राज्य कामगार विमा महामंडळ सोसेल.


अपंग व्यक्तींना नियमित सेवेत घेणाऱ्या खासगी क्षेत्रातील नियोक्त्यांना प्रोत्साहन :

  • राज्य कामगार विमा योजनेचे लाभ घेण्यास पात्र होण्यासाठी वेतनाची कमीतकमी मर्यादा रु २५०००/- आहे.
  • केंद्र सरकारतर्फे नियोक्त्याचे अंशदान ३ वर्षांसाठी दिले जाईल. [बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का?]

लाभ व अन्शादानाच्या शर्ती

राज्य कामगार विमा योजनेचे वैशिष्ट्या म्हणजे त्यातील अंशदान हे देण्याच्या क्षमतेवर अवलंबून कामगारांना देय असणाऱ्या वेतनाची ठराविक टक्केवारीच्या स्वरुपात असते तर मिळणारा सामाजिक सुरक्षिततेचा लाभ हा प्रत्येकाच्या गरजेनुसार कोणताही भेदभाव न करता दिला जातो. महामंडळातर्फे रोख लाभ त्यांच्या शाखा कार्यालयातून / अधिदान कार्यालयातून अंश्दानाच्या शर्तींच्या अधीन राहून केले जाते.

  • वैद्यकीय देखभाल: वैयक्तिक खर्चावर कोणतीही कमाल मर्यादा नसलेली प्राथमिक, दुय्यम, व तिय्यम वैद्यकीय देखभाल
  • आजारपणाचा लाभ: ९१ दिवस
  • विस्तारीत आजारपणाचा लाभ: ३४ विशिष्ट आजारांसाठी ७३० दिवस ( दोन वर्षेपर्यंत )
  • मातृत्वाचा लाभ: ८४ दिवस + १ महिना (प्रसूति, गरोदरपण, मुदतीपूर्वी बाळाचा जन्म झाल्यास इत्यादी)
  • अवलंबिताचे लाभ: विमित व्यक्तीचे निधन झाल्यास त्याच्या पत्नीला ती हयात असेपर्यंत / पुनर्विवाहित होईपर्यंत व कुटुंबियांना विवाह / वया संबंधी असलेल्या शर्तीनुसार
  • राजीव गांधी श्रमिक कल्याण योजना: कारखाना / आस्थापना बंद झाल्यावर किंवा कपातीमुळे किंवा सेवेतील इजेमुळे ४०% पेक्षा कमी नसलेल्या कायमस्वरूपी अपंगत्वामुळे तो बेरोजगार झाल्यास एक वर्षा पर्यंत दैनंदिन सरासरी वेतनाच्या ५०% पर्यंत
  • अपंग व्यक्तींना नियमित सेवेत घेणाऱ्या खासगी क्षेत्रातील नियोक्त्यांना प्रोत्साहन: रु २५०००/- पर्यंत मासिक वेतन घेणाऱ्या अपंग व्यक्तींच्या नियोक्त्यांच्या अंशदान पहिल्या तीन वर्षांसाठी केंद्र सरकार तर्फे देण्यात येईल.
  • निवृत्त विमित व्यक्तींना वैद्यकीय देखभाल: वार्षिक रु १२०/- भरून राज्य कामगार विमा योजने अंतर्गत उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधा. [बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का?]
संपर्क
मुख्य कार्यालयआयुक्त कार्यालय,
राज्य कामगार विमा योजना,
पंचदीप भवन,
सहावा मजला,
ना. म. जोशी मार्ग,
लोअर परळ मुंबई
४०००१३
फोन
गणपतराव कदम मार्ग, पोद्दार रुग्णालया मागे
वरळी – १८
०२२- २४९३३१४२/४३
ठाकूर व्हीलेज्, केलीपाडा कांदिवली पूर्व
मुंबई ४००१०१
२८८७७७६९
लाल बहादूर शास्त्री मार्ग मुलुंड पश्चिम
मुंबई ४०००८०
२५६००६९६
वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम –
४००६०४
२५८२३५५१
सेक्टर ५, वाशी नवी मुंबई जिल्हा ठाणे२७८२१२६४
सेंट्रल हॉस्पिटल जवळ, कॅम्प क्र ३
उल्हासनगर ३ जिल्हा ठाणे
०२५१- २७०१२२२
मोहन नगर चिंचवड
पुणे १८
९५२०- २७४६८६६६
होटगी रस्ता सोलापूर०२१७- २६०१७४७
त्र्यम्बक रस्ता नासिक०२५३- २३५१०४५
एमआयडीसी सिडको,
चिकलठाणा औरंगाबाद
०२४०- २४८०४६५
मानेवाडा रस्ता, सोमवारी पेठ
नागपूर
०७१२- २७४१५३५
डॉ एस एस राव रस्ता, परळ
मुंबई ४०००१२
२४१३००३५

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना

सर्वसाधारण शिष्यवृत्ती
परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती
क्रीडा शिष्यवृत्ती
पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य
MS-CIT अर्थसहाय्य
साहित्य प्रकाशन अनुदान
शिवण मशीन अनुदान योजना
गंभीर आजार उपचार अर्थसहाय्य
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
आत्महत्याग्रस्त कुटुंबास अर्थसहाय्य
कामगार व कामगार कुटुंबियांची लांब पल्ल्याची सहल
वाहन चालक प्रशिक्षण
इंग्रजीसह विदेशी भाषा संभाषण प्रशिक्षण
स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
दूरध्वनी क्र022-24306717 / 43226825
फॅक्स क्र022-42210019
ई-मेलmlwbpro53@gmail[dot]com
पत्तामका / ग्रंथालय / 17 -18 / 165
हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन,
सेनापती बापट मार्ग,
एलफिन्स्टन, मुंबई 400013

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना

सामाजिक सुरक्षा योजना

कामगाराच्या विवाहाच्या खर्चासाठी 30,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसहाय्य
बांधकाम कामगार योजना अंतर्गत मध्यान्ह भोजन योजना
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
अटल पेन्शन योजना लाभ
कामगारांच्या पाल्यांना पाळणाघर सुविधा
कौशल्यवृद्धी योजना लाभ
बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभ
नोंदीत बांधकाम कामगारांकरिता ट्रांझिट कॅम्प ची सुविधा
प्रधानमंत्री आवास (ग्रामीण) योजना
घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना
कामगार व कामगार कुटुंबियांची लांब पल्ल्याची सहल
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड
योजनांचे अर्ज
सामाजिक सुरक्षा योजनांचे अर्ज 1डाउनलोड
सामाजिक सुरक्षा योजनांचे अर्ज 2डाउनलोड

शैक्षणिक योजना

परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती
क्रीडा शिष्यवृत्ती योजना
साहित्य प्रकाशन अनुदान योजना
इयत्ता 1ली ते 7वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 2500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
इयत्ता 8वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
इयत्ता 10वी व इयत्ता 12वी मध्ये किमान 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
इयत्ता 11वी व इयत्ता 12वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी 10,000/- रुपयाचे आर्थिक सहाय्य
कामगाराच्या मुलांना व पत्नीस पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
कामगाराच्या मुलांना व पत्नीस वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य
वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रतिवर्षी 60,000/- रुपये आर्थिक सहाय्य
शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 25,000/- रुपयाचे आर्थिक सहाय्य
नोंदीत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास MS-CIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती
बांधकाम कामगाराच्या आय आय टी वा तत्सम शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
कामगारांच्या पाल्यांना इंग्रजीच्या ट्युशन फीसाठी आर्थिक सहाय्य
बांधकाम कामगाराच्या पाल्यास पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी तसेच परदेशात उच्च शिक्षण घेण्याकरिता शिष्यवृत्ती
सर्वसाधारण शिष्यवृत्ती
कामगाराच्या पाल्यांना शिक्षणासाठी टॅबलेट व लॅपटॉप चे वितरण
बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक उपयोगाची पुस्तके भेट
योजनांचे अर्ज
शैक्षणिक योजनांचे अर्ज 1डाउनलोड
शैक्षणिक योजनांचे अर्ज 2डाउनलोड

आरोग्य विषयक योजना

नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
गंभीर आजार वैद्यकीय उपचार सहायता योजना
शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य (दोन जीवित अपत्यांसाठी)
लाभार्थी कामगार व त्याच्या कुटुंबाला गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1 लाखाचे आर्थिक सहाय्य
एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1 लाख रुपये मुदत ठेव बंद
अपघातात कामगाराला 75 टक्के अपंगत्व किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 2 लाखाची आर्थिक मदत
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ
कामगार दवाखान्यात भरती झाल्यास भरती काळापुरता त्याच्या पत्नीस दर दिवशी आर्थिक सहाय्य
कामगारांना जननी विमा योजनेचा लाभ
नोंदीत बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी
व्यसनमुक्ती करीता निधी
योजनांचे अर्ज
आरोग्य विषयक योजनांचे अर्ज 1डाउनलोड
आरोग्य विषयक योजनांचे अर्ज 2डाउनलोड

आर्थिक योजना

कामगार योजना ५०००
आत्महत्याग्रस्त कामगाराच्या कुटुंबास अर्थसहाय्य
कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 5 लाखाचे आर्थिक सहाय्य
शिवण मशीन अनुदान योजना
बांधकाम कामगार पेटी योजना
कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कायदेशी वारसास 2 लाखाचे आर्थिक सहाय्य
अनोंदीत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास अर्थसहाय्याचा लाभ
अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) अंतर्गत 2 लाखाचे अर्थसहाय्य
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत 2 लाखाचे अर्थसहाय्य
50 ते 60 वयोगटातील कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरिता 10 हजारांचे सहाय्य
कामगाराचा मृत्यू झाल्यास विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस 5 वर्षाकरिता 24 हजाराचे आर्थिक सहाय्य
नोंदीत बांधकाम कामगारांना घर खरेदी किंवा घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य
बांधकाम कामगारांना बोनस सुविधा
बांधकाम कामगारांना सायकल वाटप
साहित्य खरेदीसाठी आर्थिक सहाय्य
बांधकाम कामगारांना सुरक्षा संच (सेफ्टी किट) चा लाभ
बांधकाम कामगारांना वस्तू संच (Essential Kit) चा लाभ
बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वितरण
कामगार व त्यांच्या कुटुंबियांना स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण योजना
अटल बांधकाम कामगार आवास योजना
वाहन चालक प्रशिक्षण योजना
योजनांचे अर्ज
आर्थिक योजनांचे अर्ज 1डाउनलोड
आर्थिक योजनांचे अर्ज 2डाउनलोड

महत्वाच्या बाबी

कामगार कल्याण योजना
बांधकाम कामगार यादी
बांधकाम कामगार योजना फायदे
बांधकाम कामगार योजना अंतर्गत आवश्यक पात्रता
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे
बांधकाम कामगार योजना आवश्यक अटी व शर्ती
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय
बांधकाम कामगार संपर्क कार्यालय
बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म
बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्रे
Essential Kit Form PDF
Bandhkam Kamgar Safety Kit Form PDF Download
bocw Safety Kit Form PDF Download
Bandhkam Kamgar Nondani Maharashtra

कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे

बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो?
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची?
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का?
असंघटित कामगार म्हणजे काय?
कामगार कल्याण योजना काय आहेत?

बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी

बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा

बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण

आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा

बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा

उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन

कामगार योजना लिस्ट