योजनेअंतर्गत नोंदणीकृत कामगार व त्याच्या कुटुंबांना गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.
कामगार हे आर्थिक दृष्ट्या गरीब असतात त्यांच्या जवळ कुटुंबाच्या सर्व गरज पूर्ण करणे शक्य नसते त्यामुळे त्यांना स्वतःच किंवा आपल्या कुटुंबाचा विमा उतरवणे शक्य होत नाही. आणि जेव्हा कामगार किंवा त्याच्या कुटुंबातील एखादा सदस्य गंभीर आजाराला बळी पडतात तेव्हा त्याला उपचार करणे शक्य होत नाही आणि पैशांसाठी खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो त्यामुळे कामगारांचे हित लक्षात ठेवून कामगार महामंडळाने कामगारांसाठी सदर योजना सुरु केली आहे.
योजनेचे उद्दिष्ट
- कामगार किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याला गंभीर आजाराच्या उपचारासाठी आर्थिक सहाय्य करणे.
- कामगार व त्याच्या कुटुंबाला विमा संरक्षण देणे.
योजनेचे वैशिष्ट्य
- योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी लाभार्थी कामगाराच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
योजनेचे लाभार्थी
- कामगार तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्य
योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य
- या योजनेअंतर्गत नोंदणीकृत कामगार व त्याच्या कुटुंबांना गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.
योजनेचा फायदा
- या योजनेअंतर्गत कामगार तसेच त्याच्या कुटुंबाला विमा संरक्षण मिळेल.
- कामगार किंवा त्याच्या कुटुंबातील एखादा सदस्य आजारी पडल्यास त्याला पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही किंवा कोणाकडून पैसे कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता
- अर्जदार कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
Maharashtra Kamgar Yojana च्या अटी
- योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
- अर्जदार कामगार हा नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
- सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गंभीर आजार असल्याबाबत दिलेले प्रमाणपत्र
- वैद्यकीय उपचार विषयक कागदपत्रे
अर्ज करण्याची पद्धत
- कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनांचे अर्ज | |
योजनेचा अर्ज 1 | डाउनलोड |
योजनेचा अर्ज 2 | डाउनलोड |
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्ता | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |