कामगारांच्या पाल्यांना परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती

या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण परदेशात पूर्ण करण्यासाठी 50 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

बहुतांश स्वतःचे उच्च शिक्षण परदेशात पूर्ण करण्यासाठी उत्सुक असतात परंतु बांधकाम क्षेत्र तसेच इतर क्षेत्रात काम करणारे कामगार हे आर्थिक दृष्ट्या गरीब असल्याकारणामुळे त्यांची मिळकत कमी असते आणि त्यामुळे ते आपल्या पाल्याना शिक्षणासाठी परदेशात पाठविण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे विद्यार्थी परदेशात शिक्षण पूर्ण घेण्यापासून वंचित राहतात त्यामुळे कामगारांच्या या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने कामगारांच्या पाल्यांना परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.

पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणासाठी तसेच पीएच.डी.साठी परदेशात गेलेल्या कामगार पाल्यांना 50 हजार रुपये एकदाच शिष्यवृत्ती देण्याची योजना आहे. सदर परिपत्रकात नमुद दोन वर्षाच्या शैक्षणिक खंडाची अट शिथीत करण्यात येत आहे. त्यामुळे कामगार पाल्यांच्या शिक्षणात खंड पडला असला तरी विद्यार्थ्यास सदर योजनेचा लाभ विहित अटींच्या अधिन राहून देण्यास मान्यता व मंजुरी देण्यात येत आहे.

विभागीय कार्यालयांनी आपल्या स्तरावर अर्थसंकल्पिय तरतुदीच्या अधिन राहून लाभार्थी संख्या निश्चित केली जाईल. लाभार्थीची गुणवत्ता यादी तयार करताना पुढील कालमर्यादेचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल.

कार्यवाहीचा तपशीलअंतिम मुदत
केंद्रांत अर्ज स्वीकारणे.ऑक्टोबर अखेरपर्यंत
केंद्रांनी गट कार्यालयाकडे अर्ज पाठवणे.नोव्हेंबरचा दुसरा आठवडा
गट कार्यालयाने विभागीय कार्यालयाकडे अर्ज पाठवणेनोव्हेंबर अखेरपर्यंत
विभागीय कार्यालयांनी मंजुरीपत्र निर्गमित करणे.डिसेंबर अखेरपर्यंत
Kamgar Yojna Scholarship

योजनेचे उद्दिष्ट:

  • कामगाराच्या पाल्यांना परदेशात शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे
  • विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
  • विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करणे.

योजनेचे वैशिष्ट्य:

  • योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

योजनेचे लाभार्थी:

  • कामगारांचे पाल्य योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत

आर्थिक सहाय्य:

  • या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण परदेशात पूर्ण करण्यासाठी 50 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

योजनेअंतर्गत होणारा फायदा:

  • कामगारांचे पाल्य परदेशात शिक्षण पूर्ण करण्यासाठी आत्मनिर्भर बनतील त्यामुळे त्यांना शिक्षणासाठी जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची गरज भासणार नाही.
  • विद्यार्थी त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित होतील.
  • विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होईल.

योजनेचे नियम व अटी:

  • शिष्यवृत्ती अर्ज विनामूल्य आहे. मात्र, अर्जदार विद्यार्थीने त्याच्या घराजवळील केंद्राचे समासद होणे बंधनकारक आहे. सभासदत्व स्वीकारलेल्या केंद्रामधूनच शिष्यवृत्ती अर्ज सादर करावा.
  • अर्जदार मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 च्या कक्षेत येणारा कामगार कुटुंबीय असला पाहिजे.
  • पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर परदेशात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश मिळेपर्यंत 2 वर्षाचा शैक्षणिक खंड (गॅप) पडला तरी अर्जदार सदर शिष्यवृत्तीसाठी पात्र राहील.
  • परदेशात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या / पीएच.डी. करणाऱ्या कामगार पाल्यांना या योजनेचा लाभ एकदाच दिला जाईल.
  • विद्यार्थ्यांस मागील वर्षी वार्षिक परीक्षेत किमान 60% गुण असावेत. प्राप्त अर्जात विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार (मेरीट) व मंडळाने निश्चित केलेल्या आर्थिक तरतुदीच्या अधिन राहून शिष्यवृत्ती मंजूर केली जाईल. सर्वांना सरसकट शिष्यवृत्ती मिळणार नाही.
  • अर्जदार परदेशात कोणत्या शाखेचे उच्च शिक्षण घेणार आहे. त्याबाबत संबंधित विद्यापीठ / महाविद्यालय यांच्या दाखल्याची (बोनाफाईड सर्टीफिकेट) झेरॉक्स जोडावी.
  • जूनमध्ये कामगार कल्याण निधी कपात झाल्याची नोंद असलेली पेमेंट स्लीप व आस्थापनेचा दाखला असे दोन्ही कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
  • जूनमध्ये साखर कारखाने बंद असल्याने कामगारांचा जूनमध्ये पगार होत नाही. अशावेळी जूनऐवजी डिसेंबरची वेतनपावती (पे स्लीप) ग्राह्य मानावी व ती अर्जासोबत जोडावी. डिसेंबरच्या वेतन पावतीत कामगार कल्याण निधी कपात झाल्याची नोंद असावी.
  • कंपनी बंद पडली असल्यास आस्थापनेचा कंपनी बंद पडल्याचा दाखला जोडावा. सदर दाखला तीन वर्षांपर्यंत वैध राहील.
  • शिष्यवृत्ती रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यात ऑनलाईन जमा होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्याचे स्वतःचे (किंवा पालकासह संयुक्त) खाते बँकेत असणे बंधनकारक आहे. सदर बँक खाते विद्यार्थ्याने त्याच्या आधार क्रमांकाशी लिंक करुन घ्यावे.
  • विद्यार्थ्याने शक्यतो बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खाते उघडावे तसे शक्य नसल्यास आय.एफ.एस.सी क्रमांक व मायकर क्रमांक असलेल्या राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका व शेड्युल्ड को-ऑप बँकामध्ये खाते उघडावे. मात्र, आय.एफ.एस.सी क्रमांक व मायकर क्रमांक नसलेल्या बँकेत अर्जदाराचे खाते असल्यास अथवा अर्जदाराचे बँक खाते बंद स्थितीत असल्यास शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही व याबाबत कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही.
  • पडताळणी करण्यासाठी लाभार्थी विद्यार्थीचे नाव, बँक खाते क्रमांक, बँकेचा मायकर क्रमांक व आय.एफ.एस.सी. क्रमांक यांची नोंद असलेला बँकेचा कॅन्सल चेक (रद्द चेक) किंवा पासबुकची साक्षांकित प्रत ( झेरॉक्स) अर्जासोबत जोडावी.
  • मुक्त विद्यापीठाचे बहिःस्थ शिक्षण / दूरस्थ शिक्षण घेणारे विद्यार्थी, तसेच अप्रेंटिसशीप, इंटर्नशीप किंवा शिक्षण घेताना मानधन, मेहनताना मोबदला घेणाऱ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.
  • अपंग विद्यार्थीना शासनाच्या धोरणानुसार एकूण शिष्यवृत्ती रकमेच्या तीन टक्के प्रमाणात सरसकट शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येईल. त्यासाठी टक्केवारी व पालकाच्या उत्पन्न मर्यादेचे कोणतेही बंधन असणार नाही.
  • विद्यार्थ्याने अर्ज जमा करताना सर्व कागदपत्रे स्वयं साक्षांकित / साक्षांकित करुन अर्जासोबत जोडल्याची व बँक तपशिल बरोबर भरल्याची खात्री करावी. अर्ज स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्याकडून पोचपावती अवश्य घ्यावी.
  • विद्यार्थ्याने अर्ज जमा करताना सर्व कागदपत्रे स्वयं साक्षांकित / साक्षांकित करुन अर्जासोबत जोडल्याची व बँक तपशिल बरोबर भरल्याची खात्री करावी. अर्ज स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्याकडून पोचपावती अवश्य घ्यावी.
  • शिष्यवृत्तीस पात्र न ठरलेल्या अर्जदारांची स्वतंत्र यादी प्रसिद्ध करण्यात यावी. प्रत्येक अर्जाचे शिष्यवृत्ती न मिळाल्याबाबतचे कारण स्पष्टपणे नमूद करावे.
  • विभागीय कार्यालयांनी मंजुरीपत्रकाची प्रत माहितीस्तव मध्यवर्ती कार्यालयास माहितीस्तव सादर करावी.

महत्वाचे: अर्ज स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्याने साक्षांकीत प्रमाणपत्रे / दाखले तपासून कंसात (V) बरोबरची खुण करावी.

कामगार कल्याण योजना शिष्यवृत्ती अंतर्गत आवश्यक कागदपत्रे:

  • मागील वर्षाची गुणपत्रिका (सेमीस्टर पद्धत असल्यास दोन्ही सेमिस्टरची गुणपत्रिका जोडावी)
  • चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड सर्टीफिकेट
  • पासपोर्ट, व्हीसा, विमान तिकीट
  • रेशनकार्ड / ई.एस.आय.सी./ पालकाचे आधार कार्ड
  • विद्यार्थ्याचे आधार कार्ड
  • कामगार कल्याण निधी कपात दर्शवणारी पालकाची जून महिन्याची वेतन पावती किंवा वेतन पावती नसल्यास आस्थापनेचा दाखला. (मूळ प्रत )
  • किंवा कंपनी बंद पडली असल्यास आस्थापनेचा कंपनी बंद पडल्याचा दाखला जोडावा. सदर दाखला तीन वर्षापर्यंत वैध राहील.
  • बँकेचा कॅन्सल चेक / पासबुक झेरॉक्स (विद्यार्थीचे नाव, अकाऊंट नंबर, मायकर क्रमांक व आय.एफ.एस.सी. कोड यांची नोंद असणे आवश्यक)
  • स्वयंसाक्षांकन केले असल्यास स्वयं साक्षांकन घोषणापत्र. (मूळ प्रत )

योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत:

आम्ही खाली परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती योजना चा अर्ज दिलेला आहे तो डाउनलोड करून अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळात जमा करावा.

योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:

  • अर्जदाराला सर्वात प्रथम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
  • होम पेज वर सभासद मध्ये योजनांसाठी अर्ज वर क्लिक करावं लागेल.
Maharashtra kamagar kalyan mandal portal

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या योजनेसमोर Apply Now बटनावर क्लिक करावे लागेल.
MKKM Apply Now Button

  • आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भर तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट बटनावर क्लिक करा.
MKKM Form

  • अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
अधिकृत पोर्टलयेथे क्लिक करा
दूरध्वनी क्र022-24306717 / 43226825
फॅक्स क्र022-42210019
ई-मेलmlwbpro53@gmail.कॉम
पत्तामका / ग्रंथालय / 17 -18 / 165
हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन,
सेनापती बापट मार्ग,
एलफिन्स्टन, मुंबई 400013
Bandhkam Kamgar Scholarship Formयेथे क्लिक करा

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना

सर्वसाधारण शिष्यवृत्ती
परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती
क्रीडा शिष्यवृत्ती
पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य
MS-CIT अर्थसहाय्य
साहित्य प्रकाशन अनुदान
शिवण मशीन अनुदान योजना
गंभीर आजार उपचार अर्थसहाय्य
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
आत्महत्याग्रस्त कुटुंबास अर्थसहाय्य
कामगार व कामगार कुटुंबियांची लांब पल्ल्याची सहल
वाहन चालक प्रशिक्षण
इंग्रजीसह विदेशी भाषा संभाषण प्रशिक्षण
स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना

सामाजिक सुरक्षा योजना

कामगाराच्या विवाहाच्या खर्चासाठी 30,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसहाय्य
बांधकाम कामगार योजना अंतर्गत मध्यान्ह भोजन योजना
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
अटल पेन्शन योजना लाभ
कामगारांच्या पाल्यांना पाळणाघर सुविधा
कौशल्यवृद्धी योजना लाभ
बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभ
नोंदीत बांधकाम कामगारांकरिता ट्रांझिट कॅम्प ची सुविधा
प्रधानमंत्री आवास (ग्रामीण) योजना
घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना
कामगार व कामगार कुटुंबियांची लांब पल्ल्याची सहल
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड
योजनांचे अर्ज
सामाजिक सुरक्षा योजनांचे अर्ज 1डाउनलोड
सामाजिक सुरक्षा योजनांचे अर्ज 2डाउनलोड

शैक्षणिक योजना

परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती
क्रीडा शिष्यवृत्ती योजना
साहित्य प्रकाशन अनुदान योजना
इयत्ता 1ली ते 7वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 2500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
इयत्ता 8वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
इयत्ता 10वी व इयत्ता 12वी मध्ये किमान 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
इयत्ता 11वी व इयत्ता 12वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी 10,000/- रुपयाचे आर्थिक सहाय्य
कामगाराच्या मुलांना व पत्नीस पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
कामगाराच्या मुलांना व पत्नीस वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य
वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रतिवर्षी 60,000/- रुपये आर्थिक सहाय्य
शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 25,000/- रुपयाचे आर्थिक सहाय्य
नोंदीत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास MS-CIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती
बांधकाम कामगाराच्या आय आय टी वा तत्सम शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
कामगारांच्या पाल्यांना इंग्रजीच्या ट्युशन फीसाठी आर्थिक सहाय्य
बांधकाम कामगाराच्या पाल्यास पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी तसेच परदेशात उच्च शिक्षण घेण्याकरिता शिष्यवृत्ती
सर्वसाधारण शिष्यवृत्ती
कामगाराच्या पाल्यांना शिक्षणासाठी टॅबलेट व लॅपटॉप चे वितरण
बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक उपयोगाची पुस्तके भेट
योजनांचे अर्ज
शैक्षणिक योजनांचे अर्ज 1डाउनलोड
शैक्षणिक योजनांचे अर्ज 2डाउनलोड

आरोग्य विषयक योजना

नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
गंभीर आजार वैद्यकीय उपचार सहायता योजना
शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य (दोन जीवित अपत्यांसाठी)
लाभार्थी कामगार व त्याच्या कुटुंबाला गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1 लाखाचे आर्थिक सहाय्य
एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1 लाख रुपये मुदत ठेव बंद
अपघातात कामगाराला 75 टक्के अपंगत्व किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 2 लाखाची आर्थिक मदत
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ
कामगार दवाखान्यात भरती झाल्यास भरती काळापुरता त्याच्या पत्नीस दर दिवशी आर्थिक सहाय्य
कामगारांना जननी विमा योजनेचा लाभ
नोंदीत बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी
व्यसनमुक्ती करीता निधी
योजनांचे अर्ज
आरोग्य विषयक योजनांचे अर्ज 1डाउनलोड
आरोग्य विषयक योजनांचे अर्ज 2डाउनलोड

आर्थिक योजना

कामगार योजना ५०००
आत्महत्याग्रस्त कामगाराच्या कुटुंबास अर्थसहाय्य
कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 5 लाखाचे आर्थिक सहाय्य
शिवण मशीन अनुदान योजना
बांधकाम कामगार पेटी योजना
कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कायदेशी वारसास 2 लाखाचे आर्थिक सहाय्य
अनोंदीत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास अर्थसहाय्याचा लाभ
अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) अंतर्गत 2 लाखाचे अर्थसहाय्य
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत 2 लाखाचे अर्थसहाय्य
50 ते 60 वयोगटातील कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरिता 10 हजारांचे सहाय्य
कामगाराचा मृत्यू झाल्यास विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस 5 वर्षाकरिता 24 हजाराचे आर्थिक सहाय्य
नोंदीत बांधकाम कामगारांना घर खरेदी किंवा घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य
बांधकाम कामगारांना बोनस सुविधा
बांधकाम कामगारांना सायकल वाटप
साहित्य खरेदीसाठी आर्थिक सहाय्य
बांधकाम कामगारांना सुरक्षा संच (सेफ्टी किट) चा लाभ
बांधकाम कामगारांना वस्तू संच (Essential Kit) चा लाभ
बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वितरण
कामगार व त्यांच्या कुटुंबियांना स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण योजना
अटल बांधकाम कामगार आवास योजना
वाहन चालक प्रशिक्षण योजना
योजनांचे अर्ज
आर्थिक योजनांचे अर्ज 1डाउनलोड
आर्थिक योजनांचे अर्ज 2डाउनलोड

महत्वाच्या बाबी

कामगार कल्याण योजना
बांधकाम कामगार यादी
बांधकाम कामगार योजना फायदे
बांधकाम कामगार योजना अंतर्गत आवश्यक पात्रता
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे
बांधकाम कामगार योजना आवश्यक अटी व शर्ती
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय
बांधकाम कामगार संपर्क कार्यालय
बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म
बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्रे
Essential Kit Form PDF
Bandhkam Kamgar Safety Kit Form PDF Download
bocw Safety Kit Form PDF Download
Bandhkam Kamgar Nondani Maharashtra

कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे

बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो?
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची?
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का?
असंघटित कामगार म्हणजे काय?
कामगार कल्याण योजना काय आहेत?

बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी

बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा

बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण

आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा

बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा

उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन

कामगार योजना लिस्ट